आसने करत असताना प्रयत्नांची सहजता प्राप्त करणे, संपादन करणे आणि अनंताच्या ठिकाणी समापत्ती म्हणजे तन्मयता/अनुसंधान ठेवणे या उपायांनी आसनाच्या स्थितीत स्थिरता आणि सुखमयता प्राप्त होते. अर्थात हे साधणे अजिबात सोपे नाही. आसने करीत असताना सुरुवातीस तरी कुणातरी तज्ज्ञ व्यक्तीची देखरेख हवी. कुठे तरी स्नायू/बंध ताणला जाऊन इजा होऊ शकते. असे झाल्यास फायद्याऐवजी नुकसानच अधिक होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगमार्ग : पवनमुक्तासन २

सुखमयता साधण्यासाठी सहजता हवी. कष्ट नको, कष्टाने सहजता साध्य करता येत नाही. भौतिक गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनाची शांती प्रयत्न रहीत असते. उदाहरणार्थ, झोप आपोआप लागते. प्रयत्नाने येत नाही. योगासनांचे उद्दीष्ट थकवा येणे नसून उत्साह संचार करणे आहे. म्हणूनच योगासनांचा नीट सराव केल्यावर दोन्ही नाकपुड्यांनी नीट श्वास घेत असल्याची जाणीव होते. खूप छान वाटते.

आज आपण द्रोणासनाचा सराव करू.


द्रोणासनाचा सराव करण्यासाठी शरीराची योग्य ती स्थिती – शयन स्थितीत विश्रांती घ्या. आता दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात शरीराच्या बाजूला घ्या.
आता एका वेळी दोन्ही पाय व दोन्ही हात जमिनीपासून वर उचला. साधारण १० ते १५ सेमी पेक्षा अधिक उचलू नका. वर उचलताना दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. हात व पायची बोटे जमिनीपासून वर एका पातळीवर स्थिर ठेवा. साधारणपणे ३ ते ५ आकडे मनात मोजून अंतिम स्थितीत स्थिर रहा. शरीराचे संतुलन नितंब/पार्श्वभागावर नीट होते ना याकडे लक्ष ठेवा.

Yoga for Women : योगमार्ग : महिलांसाठी योगासने

सावकाश पुन्हा हात व पाय खाली आणा आणि श्वास घ्या. अशा प्रकारे ३ ते ४ आवर्तने करा. अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना या आसनाचा सराव खूप उपयुक्त ठरू शकतो…

More Stories onयोगाYoga
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple work from home dronasan yoga exercises for women nrp
First published on: 18-08-2022 at 06:00 IST