scorecardresearch

Premium

वडिलांचा हजारो कोटींचा व्यवसाय नाकारला, अन् स्वबळावर उभारली १५० कोटींची कंपनी; कोण आहेत सिमरन लाल?

Simran Lal Success Story : सिमरन लालने स्वतःचा वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आणि प्रस्थापित कौटुंबिक व्यवसायापासून विभक्त झाली. सिमरन लाल यांनी आपल्या आईने तयार केलेली एक छोटी कंपनी पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

who is Simran Lal
(फोटो क्रेडिट- ट्विटर)

Simran Lal Success Story : आयशर मोटर्सचे नाव तुम्ही ऐकले असेलच. एक ट्रॅक्टर उत्पादक कंपनी जिनं कालांतरानं आपले संपूर्ण लक्ष मोटारसायकलकडे वळवले. त्यांच्या बुलेटचे ब्रँड नाव रॉयल एनफिल्ड आहे. आयशर मोटर्स ही ८० हजार कोटी रुपयांची बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. तिची संपूर्ण जबाबदारी सिद्धार्थ लाल यांच्या खांद्यावर आहे. आयशर मोटर्स ही त्यांना वारशाने मिळालेली कंपनी आहे. मात्र, आपले संपूर्ण लक्ष रॉयल एनफिल्ड या बाइकवर केंद्रित करून त्यांनी कंपनीला पुनर्जन्म दिला आहे. विशेष म्हणजे सिड लाल हा या वारशाचा एकमेव मालक नाही. त्याला एक बहीण देखील आहे जिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सिमरन लाल असे तिचे नाव आहे.

एकीकडे सिड लाल हा एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहे, जो वारशाने मिळालेल्या कंपनीला नवीन उंचीवर नेत आहे. दुसरीकडे सिमरन लालने स्वतःचा वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आणि प्रस्थापित कौटुंबिक व्यवसायापासून विभक्त झाली. सिमरन लाल यांनी आपल्या आईने तयार केलेली एक छोटी कंपनी पुढे नेण्याचा निर्णय घेतला. गुडअर्थ असे या कंपनीचे नाव आहे. त्या कंपनीची स्थापना १९९६ मध्ये झाली. आज सिमरन लाल यांनी एकट्याने ही कंपनी १५० कोटी रुपयांची केली. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, गुडअर्थ हे सिमरन लाल यांचे आजोबा मोहनलाल यांच्या कंपनीचेही नाव होते, जी कंपनी जर्मनीची असून, आयशर भागीदारीत भारतात आली होती. नंतर मोहनलाल यांचा मुलगा आणि सिमरन अन् सिडचे वडील विक्रम लाल यांनी आयशरचा ताबा घेतला आणि ती पूर्णपणे भारतीय कंपनी बनवली.

Meeting RBI Monetary Policy Committee decision interest rates announced friday
व्याजदर बदलण्याची शक्यता शून्यच! रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू; शुक्रवारी निर्णय
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
ajit pawar, devendra fadnvis, ncp, bjp, muslim reservation
स्वत:चे वेगळेपण जपण्याचा अजित पवारांचा प्रयत्न
Nitin Gadkari tax on diesel vehicles
विश्लेषणः गडकरींकडून डिझेल वाहनांवर १० टक्के जीएसटी लावण्याचा उल्लेख अन् यू टर्न; डिझेलला पर्याय काय?

२००२ मध्ये आईच्या कंपनीत रुजू झाली

सिमरन २००२ मध्ये गुडअर्थशी जोडली गेली होती. सीईओ होण्यापूर्वी त्यांनी कंपनीत कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आणि विविध विभाग पाहिले. त्यांनी कंपनीला देशातील सर्वात यशस्वी लक्झरी लाइफस्टाइल ब्रँड बनवले. कंपनी फॅशन, घर आणि आरोग्याशी संबंधित वस्तू विकते. सीईओ म्हणून त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली तेव्हा महसूल ५ कोटी रुपये होता. २०१६-१७ मध्ये ती वाढून १५० कोटी झाली. यानंतर कंपनीची आर्थिक आकडेवारी उपलब्ध नाही. २०१७ मध्ये तिने तिचा पती राहुल राय यांच्यासोबत निकोबार नावाचा दुसरा जीवनशैली ब्रँड सुरू केला.

सिमरन लाल हिने बंगळुरू विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले

सिमरन लाल हिने बंगळुरू विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर ती फॅशनचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली गुडअर्थने मुंबईत पहिले फ्लॅगशिप स्टोअर उघडले. यानंतर त्यांनी दिल्लीतील पॉश एरिया खान मार्केटमध्ये त्यांचे पुढील स्टोअर उघडले. २०१३ मध्ये त्याने आपला व्यवसायही ऑनलाइन केला, सिमरन लाल पती आणि दोन मुलांसह दिल्लीत राहते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Simran lal success story rejected 80 thousand crore business and established a 150 crore company on his own who is simran lal vrd

First published on: 05-09-2023 at 14:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×