डॉ. पद्मा श्रीवास्तव, स्त्रीरोगतज्ज्ञ
सेकंड हॅंड स्मोकिंगनेही महिला आणि त्यांच्या कुटुंबांना, विशेषतः मुलांना हानी पोहोचू शकते. धूम्रपान करण्याची सवय प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. धूम्रपानामुळे प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि अकाली रजोनिवृत्तीदेखील होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणाऱ्या महिलांना अकाली प्रसुती, कमी वजनाचे बाळ आणि बाळाला विकासात्मक समस्या यांसारख्या गुंतागुंतीच्य समस्या उद्भवू श्कातात. धूम्रपानामुळे स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. म्हणूनच, महिलांसाठी धूम्रपान टाळणे गरजेचे आहे.
धूम्रपान करणे प्रत्येक व्यक्तीसाठी धोकादायक आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलावर्गास धूम्रपानाचा अधिक धोका आहे. प्रजनन समस्यांपासून ते हृदयरोगापर्यंत महिलांच्या शरीरावर धूम्रपानाचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे तसेच अधिक गंभीर होऊ शकतात. धूम्रपान टाळणे, धूम्रपान करणाऱ्यांपासून दूर राहणे आणि आपल्या फुफ्फुसांचे रक्षण करणे आणि वंधत्व टाळणे ही काळाची गरज आहे.
पुरुष आणि महिलांमधील धूम्रपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही जण समवयस्कांच्या दबावामुळे धूम्रपान करतात, तर काही ताणतणावामुळे धुम्रपानाच्या आहारी जातात. धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी), हृदयरोग आणि स्ट्रोक यासारख्या अनेक आरोग्य समस्यांशी उद्भवतात. महिलांच्या शरीरावर धूम्रपानाचा परिणाम पुरुषांपेक्षा अधिक घातक ठरतो.
सिगारेटमधील निकोटिन आणि इतर रसायनांमुळे फुफ्फुस, हृदय आणि प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. धूम्रपानामुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण घटते, अंडाशयांवर दुष्परिणाम होतो आणि प्रजनन क्षमतेत घट येते. धूम्रपान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. धूम्रपानाचा महिलांच्या त्वचेवरही विपरित परिणाम होतो. त्वचा निस्तेज व्हायला लागते, सुरकुत्या पडतात आणि केस पातळ होतात. कालांतराने हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.
सेकंड हॅंड स्मोकिॅगनेही महिला आणि त्यांच्या कुटुंबांना, विशेषतः मुलांना हानी पोहोचू शकते. धूम्रपान करण्याची सवय प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. धूम्रपानामुळे प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि अकाली रजोनिवृत्तीदेखील होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणाऱ्या महिलांना अकाली प्रसुती, कमी वजनाचे बाळ आणि बाळाला विकासात्मक समस्या यांसारख्या गुंतागुंतीच्य समस्या उद्भवू श्कातात. धूम्रपानामुळे स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. म्हणूनच, महिलांसाठी धूम्रपान टाळणे गरजेचे आहे.
धूम्रपानाची सवय कशी सोडाल?
धूम्रपान सोडण्यासाठी थेरपीचा पर्याय निवडू शकता. धूम्रपान सोडण्याची तारीख निश्चित करा आणि तुमच्या आजूबाजूला कुठेही सिगारेट हाती लागणार नाही याची खबरदारी घ्या. अल्कोहोलचे सेवन टाळा किंवा तणावासारखे ट्रिगर्स टाळा- ज्यामुळे तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होते. सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास शुगर फ्री च्युईंग गम चघळणे किंवा फळं खाणे यांसारख्या निरोगी पर्यायांनी निवडा. कुटुंब, मित्र परिवाराकडूम धुम्रपान सोडण्यासाठी प्रोत्साहन मिळवा. सक्रिय राहा आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्हा हायड्रेटेड राहाल. धूम्रपानाचे व्यसन लावून घेऊ नका, धूम्रपानाची सवय सोडा आणि तुमचे प्रजनन आरोग्य सुधारा. कोणतेही असामान्य लक्षण आढळल्यास विलंब न तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धूम्रपानामुळे ताणतणावातून तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
