श्रुणाली रानडे, जपान
जपानमध्ये येऊन मला सात वर्षे झाली आहेत. मी अजूनही एबारा कॉर्पोरेशनमध्येच काम करते आणि मला इथं काम करायला आवडतं. पूर्वीपेक्षा कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या असून त्या मी सक्षमपणं निभावत आहे. इथं मी डिझाईन अँड डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम करते. यंदाच्या इंटिग्रेटेड रिपोर्टमध्ये नाव, फोटो आणि तांत्रिक कामाच्या स्वरुपाची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येक उद्योगाकडून एका नावाची निवड केली जाते. फ्लुईड अँड मिशनरी क्षेत्रातून हजारो कर्मचाऱ्यांपैकी माझी निवड करण्यात आली. जेएलपीटी (Japanese Level Proficiency Test) ही तेव्हा एनथ्री पास होते, आता एनटू पास झाले आहे. आतापर्यंत जपानमधल्या ४७ जिल्ह्यांपैकी ३३ जिल्ह्यांत फिरले आहे. अगदी छोट्या मुलांपासून ते वयस्करांपर्यंत अनेकांसोबत ट्रिप केल्या असून त्या खूप एन्जॉय केल्या आहेत. हॉस्टेलपासून ते फॅन्सी हॉटेल्समधलं रहाणं, स्थानिक पदार्थ चाखणं वगैरे सहलीच्या शास्त्रात मोडणाऱ्या गोष्टी आवर्जून केल्या. त्यामुळं मित्रमंडळी आणि ओळखीचे, त्यांच्या सहली आखताना माझा सल्ला आवर्जून घेतात. मलाही ते आवडतं. त्याच त्या कामाच्या चौकटीपासून दूर जाऊन मन उल्हासित करायचं असेल तर छोटी-मोठी सहल ही हवी. शिवाय मला छायाचित्रणातही रस आहे. मी हौशी फोटोग्राफर असले तरी फक्त फोटोग्राफीसाठी म्हणून फोटोग्राफर मित्रमंडळींसोबत काही ट्रिप्सना गेले आहे.

आणखी वाचा : Gujarat Election : १६२१ उमेदवार; त्यातील महिला फक्त १३९!

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

दरम्यान, माझं लग्न अक्षय पुणतांबेकरशी झालं. तोही गेली आठ वर्षं जपानमध्ये राहतो आहे. एका कॉमन फ्रेण्डमुळं आमची टोकियोमध्ये भेट झाली होती. कोविडच्या थैमानामुळं आम्ही दोन वर्षं भारतात येऊ शकलो नाही. त्यामुळं आम्ही जपानमध्येच नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. पुढं भारतात आलो, तेव्हा बरोबर वर्षानं त्याच तारखेला आमचं विधींनुसार लग्न झालं. तेव्हाही लॉकडाऊनचे नियम लागू होते. तेव्हा केळीची पानं आणि झेंडूच्या फुलांची सजावट केली होती आणि नंतर त्यांचा शेतात खत म्हणून वापर केला गेला. लग्नपत्रिकेतून आमच्या लग्नाची गोष्ट उलगडली होती. मेहंदीत जपानी भाषा वापरली होती. आजीची आठवण म्हणून मी तिचे दागिने घातले होते आणि लग्नाआधीच्या सोहळ्यांत माझ्या आईच्या लग्नातल्या साड्या मी नेसले होते. आमच्या दोघांच्या घरच्यांच्या अथक धावपळीमुळं दोन आठवड्यात नियोजन करून ही लगीनघाई पार पडली. भारताच्या संदर्भातली एक आठवण सांगते, टोकियोत २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी भारतीय दूतावासानं मला निमंत्रण दिलं होतं. तो एक वेगळा अनुभव ठरला.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?

‘टोकियो ऑलिंपिक २०२०’ मध्ये माझा स्वयंसेवक म्हणून सहभाग होता. यासाठीची पात्रता म्हणजे १८ वर्षांच्या पुढच्या व्यक्तींना सहभागी होता येतं. एरवी इतर देशांतले कार्यकर्तेही असतात पण या वेळी करोनामुळं इतर देशांतले कार्यकर्ते येऊ शकले नाहीत. डिसेंबर २०१८ मध्ये आम्ही या ऑलिंपिकमध्ये स्वयंसेवक होण्यासाठी फॉर्म भरले होते. अर्थात तेव्हा या सगळ्यात कोविडसारखी भयावह गोष्ट घडेल, असा स्वप्नातही कुणी विचार केला नव्हता. पण हळूहळू गोष्टी निवळल्या आणि शेवटी २३ जुलै २०२१ मध्ये या स्पर्धा प्रत्यक्षात सुरू व्हायची वेळ आली. टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या बीच व्हॉलीबॉलची मी स्वयंसेवक होते. स्पोर्टस् इन्फॉर्मेशन डेस्क टीममध्ये १० दिवस काम केलं. मॅचच्या आधी खेळाडूंना रिपोर्टिंग करणं, मिटिंग रुममधलं त्यांचं वेळापत्रक आखणं, त्यांच्या लॉकर्ससह प्रॅक्टिस बॉलची व्यवस्था बघणं, मॅचच्या संदर्भातला आवश्यक तो अधिकृत डिजिटल डेटा त्यांना सांगणं आदी कामं मी केली. खेळाडू, कोच (मार्गदर्शक) आणि ऑलिंपिक समितीचं व्यवस्थापन यांच्यामधला दुवा म्हणून आमची टीम काम करत होती. या कामामुळं मला एरवी अशक्य वाटणारी संधी मिळाली. मला जागतिक स्तरावरच्या, ऑलिंपिकमध्ये पोहचलेल्या खेळाडू आणि कोच यांच्याशी संवाद साधता आला. टोकियोमधल्या असह्य उन्हाच्या झळांची तमा न बाळगता देशासाठी खेळण्याची भावना अर्थात देशप्रेम आणि खेळाप्रतीची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. सुदैवानं मला इतर स्वयंसेवकांशी कनेक्ट व्हायची संधीही मिळाली. त्यांचे विविध अनुभव ऐकून, त्यांच्या विस्मयकारक वाटणाऱ्या धडपडीमुळं मलाही थोडी प्रेरणा मिळाली. जपान, मंगोलिया, इंडोनेशियामधल्या काहीजणांशी माझी मैत्री झाली.

आणखी वाचा : उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

स्वयंसेवक म्हणून काम करतानाच मला ऑलिंपिकमधल्या पुरुषांच्या बीच व्हॉलिबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी लाईव्ह पाहायची संधी मिळाली. आत्ताही आठवतंय की, घामाच्या धारांनी निथळत होते तरीही खिलाडु वृत्तीनं भारलेली, अटीतटीची ती स्पर्धा संपूच नये असं वाटत होतं. ऑलिंपिक समितीच्या आयोजक समितीतर्फे आम्हा स्वयंसेवकांना आमच्या चांगल्या कामासाठी प्रोत्साहनपर म्हणून अनेक चांगल्या भेटी देण्यात आल्या. आणखी एका बाबतीत मी नशीबवान ठरले. स्वयंसेवक म्हणून मला काही बॅचही मिळाले. त्यापैकी एकावर इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बच यांची सही होती. केवळ भेटवस्तूच नव्हे तर अनेक अविस्मरणीय आठवणींचा कायमचा ठेवा मिळाला. स्वतः हसतमुख रहायचं आणि खेळाडूंच्याही चेहऱ्यावर हसू फुलवून त्यांना टोकियोमधल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या चांगल्या आठवणींची अमूर्त भेट द्यायची, हे जणू आम्हा स्वयंसेवकांचं अलिखित ध्येय होतं. सांगायला आनंद वाटतो आहे की, हे ध्येय आम्ही गाठलंदेखील. त्यामुळं स्पर्धेदरम्यान शक्यतो सर्वदूर आनंद आणि उत्साह दिसत होता.

आणखी वाचा : प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…

माझ्या आयुष्यात मागं पडलेला खेळ अर्थात क्रिकेट पुन्हा प्रवेश करता झाला आणि मग खेल खेल में मैं खो गयी… जपान क्रिकेट असोसिएशनच्या नॅशनल वुमेन्स क्रिकेट टीममध्ये २०२२ मध्ये माझी निवड झाली. प्रत्येक वर्षी सीझन सुरू होताना खेळाडूंची निवड केली जाते. माझ्या कावासाकी नाईट राईडर्सतर्फे (KKR) विनय अय्यर या माझ्या कोचनी २०२२ च्या निवड फेरीसाठी जायला प्रोत्साहन दिलं. खरंतर तर मी कॉलेजमध्ये क्रिकेट खेळायचे. पण नंतर सहा वर्षांच्या गॅपनंतर जपानमध्ये २०२१ मध्ये पुन्हा क्रिकेटशी नाळ जुळली ती जे- बॅश सोशल या इव्हेंटमुळं. तेव्हाचा माझा खेळ पाहून मला जपान वुमन्स नॅशनल टीम प्लेअर्सच्या मॅचमध्येही खेळायची संधी मिळाली. त्या मॅचमध्ये मी एक कॅचही घेतला होता. त्यानंतर माझा जपानमधल्या क्रिकेट टीमचा प्रवास सुरू झाला. मी जपान वुमेन्स नॅशनल टीममध्ये निवड झालेली पहिली भारतीय स्त्री खेळाडू आहे. २४ ऑगस्ट २०२२ मध्ये टोकियोमध्ये आलेल्या टीट्वेन्टी वर्ल्ड कप क्रिकेट चषकाचं वलय अनुभवायची संधीही मिळाली. जपानमधील भारतीय दूतावास आणि जपान क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजलेल्या ‘कर्टन रेझर’साठी मला आमंत्रण मिळालं होतं. भारतीय राजदूत, जेसीएचे अध्यक्ष, आयसीसीचे जपानमधले अध्यक्ष आदी मान्यवर तेव्हा उपस्थित होते.
सध्या वीकडेजना ऑफिस आणि वीकएण्डला महिन्यातून दोनदा क्रिकेट खेळायला जाते. नॅशनल कॅम्प (नॅशनल टीमच्या प्रॅक्टिसचं ठिकाण) माझ्या घरापासून तीस तासांवर आहे. पण क्रिकेटवरच्या माझ्या प्रेमापोटी या अंतराचा त्रास होत नाही. माझ्या आणि अक्षयच्या स्वप्नपूर्तीसाठी दोन्ही घरांचा भक्कम पाठिंबा मिळतो. खेळासाठी मला ऑफिसचं खूप सहकार्य मिळालं आहे. माझी नॅशनल टीममध्ये निवड झाल्याची बातमी कंपनीनं प्रसिद्ध केली होती. कंपनीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझं वैयक्तिक भेटून अभिनंदन केलं. ऑफिसमध्ये स्पोर्ट्साठी सुट्ट्या नव्हत्या. काम आणि सुट्टी यांत उडणारी माझी तारांबळ बघून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना विशेष रजा मंजूर करायचा नियम आखला. म्हणून आता मला सुट्टीचा विचार न करता स्पर्धा खेळता येऊ शकतात. आम्ही दोघं सध्या तरी काही काळ जपानमध्येच राहणार आहोत. इथलं सुरक्षित वातावरण, सहृदयी लोकांमुळं आणि इतकी वर्षं राहिल्यामुळं हा आपलाच देश वाटायला लागला आहे. यंदाचा क्रिकेटचा सीझन जवळपास संपल्यात जमा आहे. पुढच्या वर्षीच्या सीझनसाठी तयारी सुरू आहे. विश मी लक!