नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण करणे सोपे नाही. अनेक वेळा उमेदवारांना एक, दोन किंवा तीन वेळा प्रयत्न करूनही या परीक्षेत यश मिळत नाही. सततच्या अपयशामुळे उमेदवाराच्या मनात निराशा निर्माण होते अन् अनेक उमेदवार या निराशेपोटीच प्रयत्न करणे थांबवतात. पण, काही असेही उमेदवार असतात जे सतत अपयश मिळूनही हार मानत नाही. जिद्द व प्रयत्नांच्या जोरावर ते आपलं स्वप्न पूर्ण करतातच.

हेही वाचा- मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म ते आज ४१.०७ कोटींच्या कंपनीच्या अध्यक्ष, फोर्ब्सच्या यादीतील सोमा मंडल कोण?

The selection process for foreign education scholarships is slow Nagpur
शैक्षणिक सत्र बुडण्याची शक्यता! परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची निवडप्रक्रिया संथगतीने
Paramita Malakar UPSC success stories
“… तो निर्णय ठरला गेम चेंजर!” तब्बल पाच वेळा UPSC मध्ये अपयश पचवूनही नेटाने मिळवले यश! पाहा
patrachal residents, Winners of MHADA 2016 draw, Await Possession , Occupancy Certificate, Delay Persists, mumbai news, mhada, mhada mumbai, patarachal, patrachal news, marathi news,
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा लांबली, घरे तयार, पण भोगवटा प्रमाणपत्राअभावी ताबा रखडला
Gujarat student gets 212 out of 200 in primary exam
गुजरातमधील प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप; विद्यार्थ्याला २०० पैकी २१२ गुण; उत्तरपत्रिका पाहून व्हाल लोटपोट
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – नागरिकशास्त्र प्रश्न विश्लेषण
hybrid fund, hybrid fund types, share market, stock market, conservative hybrid fund, aggressive hybrid fund, sebi, investment in stock market, new investor in stock market, pros and cons of hybrid fund,
‘हायब्रिड’च्या निमित्ताने …
MPSC Mantra Non Gazetted Services Joint Prelims Exam Analysis of geography questions
MPSC मंत्र: अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; भूगोल प्रश्न विश्लेषण
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?

आज आपण अशाच एका IAS महिला अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने एक-दोन तीन नाही तर तब्बल पाच वेळा यूपीएससी परीक्षेत अपयशाचा सामना केला. मात्र, या अपयशानंतरही आपले प्रयत्न थांबवले नाहीत अन् सहाव्या प्रयत्नात आपलं IAS बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. प्रियांका गोयल असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

प्रियांका गोयल ही दिल्लीची रहिवासी आहे. पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडेल स्कूलमधून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. प्रियांका गोयलने एकूण सहा वेळा यूपीएससी परीक्षा दिली आहे.

हेही वाचा- १५ चित्रपटांमध्ये काम करून UPSC साठी सोडली फिल्म इंडस्ट्री, पाच अपयशानंतर झाली IAS अधिकारी

सुरुवातीला प्रियांकाला यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल पूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात ती पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करू शकली नव्हती. दुसऱ्या प्रयत्नात तिचे केवळ ०.७ गुणांनी कट ऑफ लिस्टमध्ये स्थान हुकले. तिसर्‍या प्रयत्नात ती यूपीएससीच्या मुख्य परीक्षेपर्यंत पोहचली, मात्र मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण करू शकली नाही. करोना काळात तिने पाचव्यांदा ही परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस तिच्या आईची तब्येत बिघडली. तिच्या आईचे फुफ्फुस ८० टक्के खराब झाले होते. या सगळ्या प्रकारामुळे ती यूपीएससीची पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करू शकली नाही.

हेही वाचा- रेडिओ जॉकी ते मिझोरामच्या सगळ्यात तरुण महिला आमदाराचा मान; जाणून घ्या बेरिल व्हॅनीहसांगी यांचा प्रेरणादायी प्रवास

दरम्यान, घरात तिच्या लग्नाची चर्चाही सुरू करण्यात आली होती. नातेवाईकांकडून तिच्यावर लग्नाचा दबाव वाढत चालला होता. प्रियांकाकडे यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी शेवटची संधी होती. या संधीचं सोनं करत तिला आपलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. अखेर प्रियांकाच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् २०२२ साली दिलेल्या यूपीएससी परीक्षेत प्रियांकाने ३६९ वा नंबर मिळवत आपलं IAS बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.