नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करणं सोपे नाही. अनेक वेळा उमेदवारांना एक, दोन किंवा तीन वेळा प्रयत्न करूनही या परीक्षेत यश मिळत नाही. सततच्या अपयशामुळे उमेदवाराच्या मनात निराशा निर्माण होते अन् अनेक उमेदवार या निराशेपोटीच प्रयत्न करणं थांबवतात. पण, काही असेही उमेदवार असतात जे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण करतात. हेही वाचा- राजकुमारी ते उपमुख्यमंत्री- राजस्थानच्या दिया कुमारी यांचा प्रवास आज आपण अशाच एका IAS महिला अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत, जिनं पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षेत टॉप केलं होतं. आपली मेहनत व जिद्दीच्या जोरावर वयाच्या २२ व्या वर्षी IAS बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. सृष्टी जयंत देशमुख असं त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. २०१८ साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत सृष्टीने संपूर्ण भारतात पाचवा क्रमांक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली होती. हेही वाचा- साक्षी ‘तो’ गड्यांचाच खेळ गं! स्टेशन ते ऑफिस अगदी घरीही आम्ही हाच लढा देतो, आपलं चुकतं इतकंच.. सृष्टीचा जन्म १९९५ साली मध्यप्रदेश राज्यातील भोपाळमधील कस्तुरबा नगरमध्ये झाला. लहानपणीच सृष्टीने आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. सृष्टीने भोपाळमधील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. शाळेमध्ये ती हुशार विद्यार्थिनी होती. बारावीमध्ये तिला ९३.४ टक्के गुण मिळाले होते. सृष्टीला भारतातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग (IIT) मधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. मात्र, जेईई परीक्षेत तिला कमी मार्क पडल्यामुळे तिचं हे स्वप्न भंगलं. अखेर तिनं भोपाळमधील लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. हेही वाचा- IIT मधून केले एमबीए, IAS होण्यासाठी सोडली लाखो रुपये पगाराची नोकरी; वाचा मुंबईकर मुलीची यशोगाथा… इंजिनिअरिंगच्या परीक्षेबरोबरच यूपीएससीची तयारी सृष्टीने अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षापासून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यूपीएससीची तयारी करत असताना सृष्टी रोज सहा ते सात तास अभ्यास करायची. यासाठी तिनं पुस्तकांव्यतिरिक्त ऑनलाइन स्रोतांचीही मदत घेतली. यूपीएससी परीक्षेसाठी तिनं कोचिंग क्लासही लावले होते. हेही वाचा-पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक; कोण आहेत डॉ. सवेरा प्रकाश? यूपीएससी परीक्षेची तयारी करताना सृष्टीनं स्वत:ला सोशल मीडियापासून लांब ठेवलं होतं. सृष्टीच्या मते माणसाचं मन जितकं शांत आणि योग्य दिशेला असेल तितके अधिक फायदे मिळतात. तुमची ऊर्जा योग्य दिशेने खर्च करणं महत्त्वाचे आहे. यशासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीदरम्यान मन विचलीत होऊ नये, यासाठी सृष्टीनं सोशल मीडियावरील तिचे सगळे अकाउंट डिलीट केले होते. हेही वाचा- छोट्याशा गावात जन्मलेली सावी ठरली बेस्टसेलर लेखिका; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह पुस्तकाचं अनेक भाषांमध्ये भाषांतर! यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सृष्टी दोन सल्ले आवर्जून देते. सृष्टीच्या मते नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एक दिवस सात-आठ तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी दोन तास अभ्यास करा किंवा सोडून द्या, असे करू नका. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ठरवले तेवढे तास दररोज अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासात सातत्य आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी काहीही बोललं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता.