भारताच्या महिला राष्ट्रीय फुटबॉल टीमच्या पहिल्या फळीतील खेळाडू संध्या रंगनाथन चेन्नईमधील होमग्राऊंडवर नेपाळ विरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यासाठी मैदानात उतरली त्यावेळी तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. या सामन्याप्रसंगी संध्याने आईसोबत फोटो घेतला आणि दोन मुलींना वाढवताना ‘सिंगल मदर’ असलेल्या आईने किती संघर्षयातना झेलल्या त्याच्या आठवणींनाही तिने वाट मोकळी करून दिली. तिने या संदर्भात केलेल्या ट्विटनंतर तर क्रीडाप्रेमीही भावूक झाले आणि आई व मुलगी दोघींवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला!

आणखी वाचा : INDW vs IREW: धोनी, कोहली आणि रोहितला मागे टाकत हरमनप्रीत कौरने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटपटू

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

‘जवाहरलाल नेहरू स्टेडिअमवर नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये मला खेळताना पाहून आईला नक्कीच अभिमान वाटला असेल.’असे ट्विट संध्या रंगनाथनने केले आणि या सामन्यानंतर नारिंगी रंगाची जर्सी परिधान केलेला आईसोबत अतिशय हसतमुख फोटो ट्विटरवर शेअर केला. आपला आनंद व्यक्त करताना संध्या म्हणते, ‘मी आज जी काही घडले आहे, नाव मिळवते आहे त्यामागे माझ्या आईचे कष्ट आहेत. आम्हां दोन मुलींना ‘एकल आई’ (सिंगल मदर) म्हणून वाढवताना, संगोपन करताना तिचं आयुष्य अतिशय खडतर असंच गेलं. तरीही आम्हांला सर्वोत्तम आयुष्य मिळावं, यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तिचं सर्व लक्ष याच गोष्टीवर केंद्रीत झालं होतं. तिने मला देशासाठी खेळताना पाहिलं यातच मला आनंद आणि अभिमानही आहे. माझ्यासाठी माझी ‘सिंगल मदर’ आई हिच हिरो आहे. माझा खंदा समर्थक, पाठिराखा, प्रेरणा तिच आहे.’

आणखी वाचा : सॅलीला सॅल्यूट! …एक धाव मदतकार्यासाठी!

संध्या रंगनाथनच्या या ट्विटवर फुटबॉलप्रेमींच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. तिला शुभेच्छा देणारे जसे क्रीडाप्रेमी आहेत तसेच तिच्या आईचं आणि तिचंही सुपरस्टार म्हणून कौतुक करणारेही बरेच आहेत. एक क्रीडाप्रेमीने तर “तुम्हां दोघींचं हार्दिक अभिनंदन आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”, अशी कमेंट लिहिली आहे तर आणखी एका चाहत्याने म्हटलं आहे, की “आईने लेकीला देशासाठी खेळताना पाहणं, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.” “मी चेन्नईमध्ये यापूर्वी अनेक सामने खेळले असले, तरीही या शहरातून भारतासाठी आजवर कधीही खेळले नव्हते,” असे नेपाळविरूद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यापूर्वी संध्या रंगनाथन म्हणाली. संध्याचे पितृछत्र अगदी लहानपणीच हरपल्याचे आणि हॉस्टेल जीवनापासूनच फुटबॉल तिचे जीवन झाल्याचे एआयएफएफ या वेबसाईटने म्हटले आहे. २०१८ साली संध्याने स्पेनमध्ये सीओटीआयएफ कप सामने खेळताना मोरक्कोविरूद्ध चांगली कामगिरी केली होती.

आणखी वाचा : शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

संध्या रंगनाथन ही तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील आहे. एसएएफएफ विमेन्स चॅम्पियनशीप २०१९ मध्ये काठमांडू, नेपाळच्या पोखरा येथील १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत तिने देदिप्यमान कामगिरी केली होती. यावेळी प्रतिस्पर्ध्यांवर दोन गोल करत भारताला चॅम्पियन ठरविण्यात तिचा मोलाचा सहभाग होता. मार्चमध्ये भारताने एसएएफएफ किताब पटकावला त्यावेळीही तिने गोल नोंदवले होते. बांगलादेशविरूद्धच्या उपान्त्यपूर्व सामन्यामध्ये तिच्या योगदानामुळे भारताला विजय मिळाला होता. इंडियन विमेन लीगमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा सन्मानही तिच्या नावावर आहे. २०२० सालीही आयडब्ल्यूएल टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक गोल करणारी दुसरी फुटबॉलपटू म्हणूनही संध्या रंगनाथन चर्चेत राहिली होती.

आणखी वाचा : ‘ती’ आई आहे म्हणुनि…

भारतासारख्या देशामध्ये पतीच्या निधनानंतर दोन मुलींना केवळ वाढविणे नव्हे तर त्यांना ज्या मार्गाने जायचे आहे, त्यात काहीही कमी पडू न देता त्यांचे संगोपन करणे, सातत्याने प्रेरणा देणे आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यासाठी महिलांच्या अंगी पराकोटीचे धैर्य लागते. असे अतुलनीय धैर्य दाखविल्याबद्दल संध्याच्या आईवरही क्रीडाप्रेमींनी कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षावर करत आई- मुलीची ही जोडगोळी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आदर्श असल्याचे म्हटले आहे.