स्त्रिया म्हटलं की खरेदी, बार्गेनिंग या गोष्टी आपसूकच येतात. खरेदी करण्याची आवड नसलेल्या आणि बार्गेनिंगची कला अवगत नसणाऱ्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला शोधून सापडतील. त्यात साडी म्हटलं की स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. माहरेची साडी असो अथवा लग्नातील शालू…प्रत्येक साडीबरोबर महिलांची काही ना काही एक विशेष आठवण नक्कीच जोडलेली असती. त्यांच्या खणातील प्रत्येक साडीला तिची तिची अशी एक इमोशनल स्टोरी असते. ते म्हणतात ना…Every Saree Tells A Story…तसंच काहीसं.


पदरावर पिसारा फुलवून नाचणारा मोर असलेली पैठणी, जरीचा काठ असलेली काठपदर साडी, बनारसी शालू…महिलांच्या कपाटात साड्यांचं असं कलेक्शन असतंच असतं. गोदावरी नदीच्या काठी पैठण परिसरात विणली जाणारी पैठणी महाराष्ट्राची शान आहे. तर काशी तीर्थक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी वाराणसी नदीच्या परिसरात तयार होणारी बनारसी साडी तर अनेक महिलांना प्रिय आहे. महिलांच्या कपाटात या साड्यांना विशेष स्थान आहे. मग ती महिला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहणारी असो. साड्यांच्या कलेक्शनमध्ये पैठणी आणि बनारसी साडी असावी, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. एवढंच काय, नेहमी स्कर्ट टॉपमध्ये फिरणाऱ्या परदेशी महिलांनाही साडी भूरळ घालते. त्यामुळे साडी व महिलांचं एक खास कनेक्शन आहे, हे नाकारणं अशक्य आहे. पण अत्यंत प्रिय असलेल्या या साडीचाच महिलेने त्याग केला तर?

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

१९९६ सालातील गोष्ट. इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती आजी-आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकट्याच काशी यात्रेला निघाल्या. सुधा मूर्तींच्या आजी-आजोबांना काशीला जाण्याची फार इच्छा होती. परंतु तेव्हाच्या काळात काशी यात्रा करणं अजिबात सोपं नव्हतं. पुरेशा सोयी-सुविधा आणि प्रवासाची साधने उपलब्ध नसल्यानं काशी यात्रा करणं फार अवघड होतं. परप्रातांतून आल्याने अनेकदा स्थानिक लोकांकडून त्यांची फसवणूक केली जायची. तेव्हाच्या काळात काशी यात्रेसाठी गेलेली कित्येक मंडळी घरी परतायचीही नाहीत. त्यामुळे काशी यात्रेवरून परत येणं फार भाग्याचं समजलं जायचं. वयामुळे आलेलं म्हातारपण आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे सुधा मूर्तींच्या आजी-आजोबांना काशी यात्रेला जाण्याचा योग आला नाही.
काशी या तीर्थस्थानाबद्दल सूधा मुर्तींनी त्यांच्या आजी-आजोबांकडून फार ऐकलं होतं. त्यांच्या आजीची काशी विश्वनाथावर श्रद्धा होती. आजीच्या निधनानंतर सुधा मूर्तींच्या वाचनात आलेल्या काही पुस्तकांमधून वाराणसी शहाराबद्दल बरीच माहिती त्यांना कळली, त्यामुळे काशी यात्रेला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली. १९९६ च्या फेब्रुवारी महिन्यात सुधा मूर्ती एकट्याच काशी यात्रेला निघाल्या. वाराणसी शहरात जागोजागी असणारं घाणीचं साम्राज्य पाहून सुधा मूर्तींना खरं तर उबग आला होता. परंतु देशभरातून येणाऱ्या लोकांची श्रद्धा व भक्ती पाहून त्या भारावून गेल्या.

आणखी वाचा>> काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

काशी विश्वनाथाचे दर्शन व वाराणसी शहरात फेरफटका मारल्यानंतर एके दिवशी पहाटे उठून त्या गंगा नदीच्या घाटापाशी आल्या. “काशी यात्रेला गेल्यानंतर गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळ पाण्याचं अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द पाळणं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही. आपल्या आवडत्या गोष्टीचा आपण कायमचा त्याग केला, तर जेव्हा जेव्हा ती गोष्ट आपल्याला दिसते, तेव्हा तेव्हा आपल्याला काशीची आठवण येते”, हे आजोबांचे शब्द त्यांना आठवले. गंगेच्या पाण्यात उतरून त्यांनी डुबकी मारली. पाण्याची पहिली ओंजळ त्यांनी आजी-आजोबांच्या वतीनं गंगेला अर्पण केली. दुसऱ्या ओंजळीनं त्यांनी भारतमातेच्या भूमीत जन्म घेतल्यानं कृतज्ञता व्यक्त केली. तिसऱ्या ओंजळीतून त्यांना आवडणारी एक गोष्ट गंगेला अर्पण करून तिचा आयुष्यभरासाठी त्याग करायचा होता.

आणखी वाचा>> उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

आजवर काशीला जाऊन लोकांनी त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या पदार्थांचा त्याग केलेला ऐकला आहे. कोणी प्रिय असणाऱ्या जिलेबीचा त्याग केला तर कोणी आवडत्या भाजीचा. पण सुधा मूर्तींनी मात्र साडी खरेदीचा त्याग केला. इतर महिलांप्रमाणेच सुधा मूर्तींचंही साडीवर विशेष प्रेम आहे. निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या, दरवर्षी ट्रेण्डमध्ये येणाऱ्या विविध डिझाइन्सच्या साड्या खरेदी करणं सुधा मूर्तींना आवडायचं. अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टीचा त्याग करायचा म्हणून सुधा मूर्तींनी साडीच्या स्व-खरेदीचा त्याग केला. तेव्हापासून सुधा मूर्ती कोणत्याही प्रकारची साडी खरेदी करत नाहीत. नेहमी साडीत दिसणाऱ्या सुधा मूर्ती जवळच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून भेट स्वरुपात येणाऱ्या साड्या नेसतात. गंगा नदीला अर्पण केलेल्या त्या शेवटच्या पाण्याच्या ओंजळीनं सुधा मूर्तींचं आयुष्य बदलून टाकलं आहे.

(सुरुवातीला वर्षातून एकदा त्यांच्या काही जवळच्या व्यक्ती त्यांना साड्या भेट द्यायचे. परंतु नंतर त्यांना या भेटी स्वीकारणंही नकोसं वाटू लागलं. त्यामुळे आता मला कुणीही काही देऊ नका, असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे.)