१९८७ सालच्या IAS अधिकारी सुजाता सौनिक या रविवारी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. त्यांनी निवृत्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. या सगळ्यात योगायोग म्हणजे निवृत्त होणाऱ्या नितीन करीर यांनी हे पद सुजाता सौनिक यांच्या पतीकडून म्हणजेच मनोज सौनिक यांच्याकडून संभाळण्यासाठी घेतले होते. सुजाता सौनिक या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. आता सुजाता या १९६० सालापासून राज्य अस्तित्वात आल्यानंतरच्या महाराष्ट्राच्या ४५ व्या सीएस [CS] ठरणार आहेत. हेही वाचा : एकोणिसाव्या वर्षी झाली ‘CA’! गिनीज बुकातदेखील नोंद! कोण आहे ही तरुणी ते घ्या जाणून…. मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर केंद्र सरकारने निवृत्त होणाऱ्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. दरम्यान, सुजाता सौनिक यांच्यासह अधिकारी राजेश कुमार व आय. एस. चहल हेदेखील या सचिव पदाच्या शर्यतीत होते. मागच्या आठवड्यात सुजाता यांना सचिव पदावर नियुक्त करण्यात आल्यामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक ठरल्या आहेत. राज्याच्या सीएस म्हणून त्यांचीच निवड करण्याशिवाय सरकारकडे कोणताही पर्याय नसल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळाली आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख दोन पदांव, म्हणजेच मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) या पदांवर आता महिला अधिकारी कार्यरत आहेत. वरिष्ठ आयपीएस [IPS] अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या DGP पदाचा पदभार स्वीकारला. या पदावर नियुक्त झालेल्या त्यादेखील पहिल्या महिला अधिकारी होत्या. गेल्या १० वर्षांमध्ये सौनिक यांनी सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास, प्रशासन यांसारख्या विविध विभागांमध्ये राजस्तरीय पातळीवर कामे केली आहेत. हेही वाचा : मातृभाषेत पुस्तक लिहून कमावले ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक!’ पाहा कसा होता गीतांजली श्री यांचा प्रवास…. राज्यस्तरीय कामांव्यतिरिक्त सुजाता यांनी परदेशांतही उत्तम कामगिरी बजावली आहे. सुजाता या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंट अभ्यासाचा एक भाग होत्या; ज्यामध्ये दोन प्रमुख सरकारी विभागांच्या एकंदरीत परिणामांवर लक्ष दिले जायचे. त्यामध्ये महिला, बालक आणि शालेय शिक्षणाच्या कामकाजाचा समावेश होता. तर, फेडरल स्तरावर सुजाता यांनी कंबोडिया आणि कोसोवो येथे UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये महिला, बालक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागासाठीसुद्धा काम केले असल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसवरून मिळते. सुजाता सौनिक यांच्या शालेय जीवनाबद्दल सांगायचे झाले, तर सुजाता या मूळच्या हरियाणाच्या आहेत. त्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण चंदिगडमधून पूर्ण केले आहे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पंजाबमधून इतिहास या विषयातून आपले एमएचे [MA] शिक्षण घेतले. इतकेच नाही, तर सुजाता या विद्यापीठातून प्रथम आल्या होत्या आणि त्यांनी सुवर्णपदकही मिळविले होते.