डॉ. उलका नातू – गडम

कुठलेही आसन करताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. माझे गुरू योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे म्हणत, कुठल्याही साधनेस कधीही एकदम सुरुवात करू नये. प्रथम एका जागी शांत बसा. डोळे मिटून घ्या. लक्ष श्वासावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आपली श्रद्धा असेल तर गुरुंना, आईवडिलांना प्रत्यक्ष अथवा मनोमन वंदन, प्रार्थना, ओम्चे तीन वेळा वाचिक व एकदा मानसिक उच्चारण करून साधनेस सुरुवात करा. आवडत असेल तर पेटीसमोर घ्या, तंबोरा लावा, शुद्ध स्वर सा, प छेडा. असे केल्याने मनातले विचार कमी होतात. साधनेसाठी मन अनुकूल होते. परिणाम अधिक चांगले दिसून येतात.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आसने करताना अतिशय संथ गतीने, झटके न देता करा. आसने हा जिममधील एखादा व्यायाम प्रकार असल्याप्रमाणे करू नका. आसनांचा परिणाम मनाच्या प्रसन्नतेत दिसून आला पाहिजे.

आज आपण एक एकदम सोपे आसन करूयात. त्याला नाव आहे सुखासन. ज्या आसनात सुख मिळते ते सुखासन म्हणजे साधी मांडी घालून खाली बसणे!

अर्थात वाटते तितके हे सोपे नाही बर का! कारण आजच्या जीवनशैलीमध्ये आपण खाली बसणे विसरून गेलो आहोत. त्यातही अतिरिक्त चरबी, गुडघ्यांमधील, घोट्यातील कठीणपणामुळे खाली बसणे कठीण होते. मांडी घालताना एक पायाचा घोटा दुसऱ्या पायाच्या मांडीखाली ठेवा. दोन्ही हातांची दोन्ही गुडघ्यांवर चिन्मुद्रा अथवा साममुद्रा अथवा द्रोणमुद्रा अथवा ध्यानमुद्रा करा.

कठीण वाटत असेल, तर एका पायाचे पाऊल दुसऱ्या पायाच्या पुढे लावून ठेवा. मराठीत आपण त्याला ‘फतकल’ मारून बसणे असा शब्दप्रयोग करतो. सावकाश डोळे मिटा. मिटल्या डोळ्यांनी श्वासावर लक्ष एकाग्र करा. पाठकणा समस्थितीत ठेवा. या स्थितीत शक्य असल्यास महामृत्युंजय अथवा गायत्री मंत्राची शक्य होतील तितकी आवर्तने मनातल्या मनात करा. काही काळ तरी मन: शांती मिळते, प्रसन्नता वाटते.

ulka.natu@gmail.com