यशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन | Surekha yadav`s journey A farmer's daughter to a railway engine motorwoman | Loksatta

यशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन

पहिली इंजिन ड्रायव्हर म्हणून नाव कमावलेल्या सुरेखा यादव यांच्या आयुष्याची ट्रेन या संधीनंतर सुसाट सुटली असली तरी अडचणींचे काही स्टेशन्स, काही सिग्नल त्यांना पार करावेच लागले. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास.

Surekha Yadav, Indian Railway, Engine Driver, farmer's daughter, railway engine motorwoman
यशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन ( छायाचित्र सौजन्य – सुरेखा यादव )

रेल्वे इंजिन ड्रायव्हर : सुरेखा यादव

मी साताऱ्यातल्या शेतकरी कुटुंबातली थोरली मुलगी. करिअरची मोठमोठी स्वप्नं पाहावी अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी रेल्वे इंजिन ड्रायव्हर होणं हे खरंच विधिलिखित असावं. कारण इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमधला डिप्लोमा घेतला त्याच वेळी वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात पाहिली. ती होती रेल्वेतील असिस्टंट ड्रायव्हर या पदाची. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, की २४ तासांत कधीही ड्युटी करावी लागेल, मात्र मला आकर्षित करणारं पुढचं वाक्य होतं, की या पदासाठी स्त्रिया अर्ज करू शकतात.

मी खूश झाले. कारण तत्पूर्वी सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मला नोकऱ्या नाकारल्या होत्या; अभियांत्रिकीची पदवी असतानासुद्धा! त्यामुळे रेल्वेत ‘असिस्टंट इंजिन ड्रायव्हर’ या पदावरील कामाची पूर्वकल्पना नसतानाही मी अर्ज केला. लेखी परीक्षा, मुलाखत, शारीरिक आणि मानसिक तपासणीत मी पास झाले आणि रेल्वेमध्ये ‘असिस्टंट इंजिन ड्रायव्हर’ या पदावरील पहिली स्त्री असा बहुमान मिळवला.

इथवर सर्व ठीक झालं. खरी कसोटी तर पुढेच होती. मी पहिली स्त्री इंजिन ड्रायव्हर. त्यामुळे लॉबीत स्त्रियांसाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या. साधं महिला प्रसाधनगृहसुद्धा नव्हतं. त्यात आमची ड्युटी वेगवेगळ्या स्टेशनवर! कधी इगतपुरी कधी पुणे. ड्युटीची वेळ २४ तासांतली कोणतीही असते. कधी पहाटे, कधी भर दुपारी, तर कधी मध्यरात्री. वेळेप्रमाणे ‘साइन इन’ करायचं. आपल्या हाती सुपूर्द केलं गेलेलं इंजिन नीट तपासायचं. ते ताब्यात घेतलं की सर्वप्रथम मोबाइल बंद करून व्हीएचएफ यंत्रणा सुरू करायची. त्यानंतर पुढचे पाच ते सहा तास संपूर्ण एकाग्रतेने अवघं लक्ष समोरच्या सिग्नल्सवर द्यायचं. दर सिग्नलला हात उंचावून सिग्नलचा रंग (हिरवा, लाल) मोठ्याने उच्चारत गाडी चालवायची. नियोजित स्थानकावर पोहोचलं की ‘साइन ऑफ’ करून थेट घर गाठायचं. इतर कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क नसतो. मित्र-मैत्रिणी व सहकाऱ्यांशी हास्यविनोद अथवा गप्पागोष्टी नसतात. पण तरीही मी हे काम अतिशय आनंदाने करते.

या क्षेत्रात एकही स्त्री नसताना रेल्वे प्रशासनाने मला पहिली संधी दिली. माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल भारतीय रेल्वे प्रशासनाची मी अत्यंत ऋणी आहे. आज माझा सेवाकाल तीस वर्षांहून अधिक आहे. या संपूर्ण काळात मला मालगाडी असो की लोकल ट्रेन सर्व प्रकारच्या गाड्या चालवण्याची संधी माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने दिली गेली. मीसुद्धा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. याचं कारण या संपूर्ण प्रवासात मला मार्गदर्शन करणारे, मला मानसिक व भावनिक आधार देणारे आणि प्रोत्साहन देणारे अनेक मार्गदर्शक रेल्वे प्रशासनात मला वेळोवेळी भेटले. माझ्या यशाचं खरं श्रेय या अनेक मेंटॉर्सनाच आहे.

या जबाबदारीच्या पदासाठी जो निडरपणा लागतो, तो मला माझ्या कुटुंबाकडूनच मिळाला. कसं ते सांगते तुम्हाला. माझे वडील साताऱ्यातील एक साधेसे शेतकरी; पण ते इतके आधुनिक विचारांचे होते, की त्यांनी त्या काळात मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचं शिक्षण दिलं. मुलगी म्हणून माझ्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत. मी खो-खो, कबड्डी यांसारखे खेळ खेळत असे. सातारासारख्या ठिकाणी राहत असूनही, शॉर्टस व टी-शर्ट घालून मॅरेथॉनमध्ये भाग घेत असे. त्यांना नातलगांनी अनेकदा टोकलं, की कशाला मुलीला इंजिनीयर बनवतोस? इतकं स्वातंत्र्य का देतोस? तर ते ठणकावून सांगत, की आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी एक स्त्री आहेत. मग माझ्या मुलीला तिचं कर्तृत्व दाखवायची संधी नको द्यायला?

ते नुसतं बोलत नसत. तर तसे वागतही. मला ते नेहमी शेतातलं डिझेल इंजिन चालू करायला पाठवत. म्हणत, हा पाच लिटर डिझेलचा डबा उचल. ते ओत इंजिनमध्ये. मी इथे थांबतो. मी तेल ओतून इंजिन चालू करायचं. ते अनेक वेळा मला रात्रीबेरात्री शेतावर पाठवायचे. आईनेसुद्धा मला कधी स्वयंपाकात अडकवलं नाही; पण घरातली सगळी कामं करायला लावली. त्यामुळे माझी शारीरिक क्षमता खूप वाढली. इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करताना त्याचा मला खूप उपयोग झाला. रेल्वे स्टेशनवर इंजिनच्या डब्यात चढणं आणि उतरणं तुलनेने सोपं! पण कारशेडमध्ये वजनदार बॅग घेऊन चढणं- उतरणं म्हणजे मोठं दिव्य! शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारं! मासिक पाळी असू दे की गरोदरपण मी हे हिमतीने केलं. करू शकले ते केवळ आई-वडिलांनी मला कष्टांची सवय लावली म्हणूनच!

माझे पती पोलीस दलात होते. त्यांना माझ्या वेळीअवेळी कराव्या लागणाऱ्या ड्युटीची पूर्ण कल्पना होती. त्यांनी आणि सासूबाईंनी मला खूप सहकार्य केलं. तीस वर्षांपूर्वी मी ही नोकरी स्वीकारली, तेव्हा एका खूप मोठ्या पदावरील वरिष्ठांनी एक गोष्ट मला सांगितली होती. ते म्हणाले होते, “सुरेखा, तुला जर यशाचं अंतिम टोक गाठायचं असेल तर कोणत्याही सवलतीची अपेक्षा करायची नाही, तक्रार करायची नाही. जास्तीत जास्त काम करण्याची क्षमता वाढवायची. तू या क्षेत्रातली पहिली स्त्री आहेस. पायोनियर आहेस. जर तू यशस्वी झालीस, तरच पुढील काळात या क्षेत्रात अधिकाधिक स्त्रिया येतील.

मी साताऱ्यातल्या शेतकरी कुटुंबातली थोरली मुलगी. करिअरची मोठमोठी स्वप्नं पाहावी अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी रेल्वे इंजिन ड्रायव्हर होणं हे खरंच विधिलिखित असावं. कारण इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमधला डिप्लोमा घेतला त्याच वेळी वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात पाहिली. ती होती रेल्वेतील असिस्टंट ड्रायव्हर या पदाची. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, की २४ तासांत कधीही ड्युटी करावी लागेल, मात्र मला आकर्षित करणारं पुढचं वाक्य होतं, की या पदासाठी स्त्रिया अर्ज करू शकतात.

मी खूश झाले. कारण तत्पूर्वी सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मला नोकऱ्या नाकारल्या होत्या; अभियांत्रिकीची पदवी असतानासुद्धा! त्यामुळे रेल्वेत ‘असिस्टंट इंजिन ड्रायव्हर’ या पदावरील कामाची पूर्वकल्पना नसतानाही मी अर्ज केला. लेखी परीक्षा, मुलाखत, शारीरिक आणि मानसिक तपासणीत मी पास झाले आणि रेल्वेमध्ये ‘असिस्टंट इंजिन ड्रायव्हर’ या पदावरील पहिली स्त्री असा बहुमान मिळवला.

इथवर सर्व ठीक झालं. खरी कसोटी तर पुढेच होती. मी पहिली स्त्री इंजिन ड्रायव्हर. त्यामुळे लॉबीत स्त्रियांसाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या. साधं

महिला प्रसाधनगृहसुद्धा नव्हतं. त्यात आमची ड्युटी वेगवेगळ्या स्टेशनवर! कधी इगतपुरी कधी पुणे. ड्युटीची वेळ २४ तासांतली कोणतीही असते. कधी पहाटे, कधी भर दुपारी, तर कधी मध्यरात्री. वेळेप्रमाणे ‘साइन इन’ करायचं. आपल्या हाती सुपूर्द केलं गेलेलं इंजिन नीट तपासायचं. ते ताब्यात घेतलं की सर्वप्रथम मोबाइल बंद करून व्हीएचएफ यंत्रणा सुरू करायची. त्यानंतर पुढचे पाच ते सहा तास संपूर्ण एकाग्रतेने अवघं लक्ष समोरच्या सिग्नल्सवर द्यायचं. दर सिग्नलला हात उंचावून सिग्नलचा रंग (हिरवा, लाल) मोठ्याने उच्चारत गाडी चालवायची. नियोजित स्थानकावर पोहोचलं की ‘साइन ऑफ’ करून थेट घर गाठायचं. इतर कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क नसतो. मित्र-मैत्रिणी व सहकाऱ्यांशी हास्यविनोद अथवा गप्पागोष्टी नसतात. पण तरीही मी हे काम अतिशय आनंदाने करते.

या क्षेत्रात एकही स्त्री नसताना रेल्वे प्रशासनाने मला पहिली संधी दिली. माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल भारतीय रेल्वे प्रशासनाची मी अत्यंत ऋणी आहे. आज माझा सेवाकाल तीस वर्षांहून अधिक आहे. या संपूर्ण काळात मला मालगाडी असो की लोकल ट्रेन सर्व प्रकारच्या गाड्या चालवण्याची संधी माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने दिली गेली. मीसुद्धा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. याचं कारण या संपूर्ण प्रवासात मला मार्गदर्शन करणारे, मला मानसिक व भावनिक आधार देणारे आणि प्रोत्साहन देणारे अनेक मार्गदर्शक रेल्वे प्रशासनात मला वेळोवेळी भेटले. माझ्या यशाचं खरं श्रेय या अनेक मेंटॉर्सनाच आहे.

या जबाबदारीच्या पदासाठी जो निडरपणा लागतो, तो मला माझ्या कुटुंबाकडूनच मिळाला. कसं ते सांगते तुम्हाला. माझे वडील साताऱ्यातील एक साधेसे शेतकरी; पण ते इतके आधुनिक विचारांचे होते, की त्यांनी त्या काळात मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचं शिक्षण दिलं. मुलगी म्हणून माझ्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत. मी खो-खो, कबड्डी यांसारखे खेळ खेळत असे. सातारासारख्या ठिकाणी राहत असूनही, शॉर्टस व टी-शर्ट घालून मॅरेथॉनमध्ये भाग घेत असे. त्यांना नातलगांनी अनेकदा टोकलं, की कशाला मुलीला इंजिनीयर बनवतोस? इतकं स्वातंत्र्य का देतोस? तर ते ठणकावून सांगत, की आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी एक स्त्री आहेत. मग माझ्या मुलीला तिचं कर्तृत्व दाखवायची संधी नको द्यायला?

ते नुसतं बोलत नसत. तर तसे वागतही. मला ते नेहमी शेतातलं डिझेल इंजिन चालू करायला पाठवत. म्हणत, हा पाच लिटर डिझेलचा डबा उचल. ते ओत इंजिनमध्ये. मी इथे थांबतो. मी तेल ओतून इंजिन चालू करायचं. ते अनेक वेळा मला रात्रीबेरात्री शेतावर पाठवायचे. आईनेसुद्धा मला कधी स्वयंपाकात अडकवलं नाही; पण घरातली सगळी कामं करायला लावली. त्यामुळे माझी शारीरिक क्षमता खूप वाढली. इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करताना त्याचा मला खूप उपयोग झाला. रेल्वे स्टेशनवर इंजिनच्या डब्यात चढणं आणि उतरणं तुलनेने सोपं! पण कारशेडमध्ये वजनदार बॅग घेऊन चढणं- उतरणं म्हणजे मोठं दिव्य! शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारं! मासिक पाळी असू दे की गरोदरपण मी हे हिमतीने केलं. करू शकले ते केवळ आई-वडिलांनी मला कष्टांची सवय लावली म्हणूनच!

माझे पती पोलीस दलात होते. त्यांना माझ्या वेळीअवेळी कराव्या लागणाऱ्या ड्युटीची पूर्ण कल्पना होती. त्यांनी आणि सासूबाईंनी मला खूप सहकार्य केलं. तीस वर्षांपूर्वी मी ही नोकरी स्वीकारली, तेव्हा एका खूप मोठ्या पदावरील वरिष्ठांनी एक गोष्ट मला सांगितली होती. ते म्हणाले होते, “सुरेखा, तुला जर यशाचं अंतिम टोक गाठायचं असेल तर कोणत्याही सवलतीची अपेक्षा करायची नाही, तक्रार करायची नाही. जास्तीत जास्त काम करण्याची क्षमता वाढवायची. तू या क्षेत्रातली पहिली स्त्री आहेस. पायोनियर आहेस. जर तू यशस्वी झालीस, तरच पुढील काळात या क्षेत्रात अधिकाधिक स्त्रिया येतील.

आज मी अभिमानाने सांगू इच्छिते, की आज गार्ड, स्टेशन अधीक्षक, इंजिन ड्रायव्हर अशा जबाबदारीच्या पदांवर स्त्रिया यशस्वीपणे काम करत आहेत. एक प्रकारे ही माझ्या यशाचीच पावती नव्हे का?

written by: माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:07 IST
Next Story
मासिक पाळीच्या वेदनांनी त्रासला आहात? आता येतोय वेदना संपवणारा ‘बॉडीसूट’!