मधल्या काळात आईचं आजारपण खूप वाढलं. तिची बायपास, किडनीचा आजार, डायबेटिस अशा एक ना अनेक आजारामध्ये ती अडकली. त्या वेळी तिची काळजी घेताना तिला आईची आई झाल्या सारखं वाटलं. बायपासनंतर तिची अन्नावरची उडालेली वासना पाहता एक घास काऊचा… एक घास चिऊचा पासून तिच्या नातवा पर्यंत पोहचला. साडी-ब्लाऊजचा त्रास नको म्हणून तिला घातलेला गाऊन… ‘अगं मला हे खावंस वाटतं’ असं ती सांगायची… तिचं माहेरपण नव्हतं… पण तिचे बालहट्ट पुरवण्यासाठी चाललेली धडपड मला एक सुखद आठवण देत होती…

कधीतरी मोबाईलवर कोणाची तरी पोस्ट वाचली होती- ‘आईचं माहेरपण…’ आई येणार म्हणून मुलीनं कशी तयारी केली होती. तिला आवडता म्हणून पुस्तके खरेदी केली. तिच्या आवडीचं असं बरंच काही… अगदी साध्या शब्दात आईचं माहेरपण मांडण्यात आलं होतं. तिनं विचार केला… हे असं माहेरपण माझ्या आईला कधी अनुभवता येईल? आई माझ्याकडे म्हणजे सासरी आली तर तिला इथली मंदिरं फिरवायची, मस्त पैकी पाणीपुरी नाहीतर भेळीवर ताव मारायचा…

असं बरंच काही ती ठरवत होती. खरं तर तिची आई धरून त्या पाच बहिणी… एकुलता एक भाऊ… सगळी भिस्त त्याच्यावर… तो सारं काही निगुतीनं करायचा, पण वागण्यात एक व्यवहारीपणा… नात्यांची… कर्तव्याची टोटल लागली पाहिजे हे त्यानं पक्कं केलं होतं. आजी- आजोबा असतानाही आणि नसतानाही आईचं माहेरपण हे धुणंभांडी करणं यापलीकडे नव्हतं… फरक एवढाच की मेनरोडवर मुलांसाठी होणारी शॉपिंग माहेरी असताना मुंबईंच्या रेल्वेस्टेशन वा कुठल्या तरी दुकानात होत होती.

वहिनीला आराम म्हणून या पाचही बहिणी माहेरपणाला जात… पुढे वय वाढत गेलं तसं आईचे आई वडील तिच्याकडे राहायला आले आणि तसं तिचं माहेर तुटलं… उलटपक्षी हिचं घर सगळ्यांसाठी माहेर बनलं… सगळ्यांनी फर्माईशी सोडायच्या आणि हिनं राबायचं… ना तक्रार ना खंत… ना कुरकुर… आई वडिलांमुळे माहेरपणाशी असणारा धागा त्यांच्या जाण्यानं तुटला… असं आईचं माहेरपण अनुभवलेली मी… लग्नानंतर मात्र माझं माहेरपण पुरेपुर अनुभवलं… ऐरवी काम कर असा भुंगा मागे लावणारी आई ‘‘अगं राहु दे…’’ असं सतत सांगायची… तुझ्या हाताला लाटणं आणि काम हे नेहमीचंच… मूळ मुद्दा हा आईचं माहेरपण तिच्यासारखं झालंच नाही… ही संधी कधी मला मिळणार? हा प्रश्न मला सतत पडायचा…

मधल्या काळात आईचं आजारपण खूप वाढलं. तिची बायपास, किडनीचा आजार, डायबेटिस अशा एक ना अनेक आजारामध्ये ती अडकली. त्या वेळी तिची काळजी घेताना तिला आईची आई झाल्या सारखं वाटलं. बायपासनंतर तिची अन्नावरची उडालेली वासना पाहता एक घास काऊचा… एक घास चिऊचा पासून तिच्या नातवा पर्यंत पोहचला. साडी-ब्लाऊजचा त्रास नको म्हणून तिला घातलेला गाऊन… ‘अगं मला हे खावंस वाटतं’ असं ती सांगायची… तिचं माहेरपण नव्हतं… पण तिचे बालहट्ट पुरवण्यासाठी चाललेली धडपड मला एक सुखद आठवण देत होती… तिनं आईला काही दिवसांसाठी घरी बोलावलं… तिला मनसोक्त झोपू दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरातील कामाला हात न लावू देता तिला काय हवं-नको ते पाहत होती. तिचं सुख म्हणजे तिच्या आवडत्या मालिका… तिच्या रोजच्या कामातून सुट्टी… तिला जमेल तसं तिच्या हातात देण्याचा प्रयत्न मी करत होते. पण हातातून काही निसटतंय असं वाटत होतं… ‘‘आई आवडलं ना गं?’’ हा बालिश प्रश्न आणि तिचं माझ्या भरल्या घराकडे अप्रुपतेनं पाहणं… प्रत्येक वस्तूवर, भिंतीवर प्रेमानं हात फिरवणं… जणू हे घर तिच्याशी बोलत होतं… ‘‘अगं छान झोप होते गं माझी… तू काही करू देत नाहीस’’ हे तिच वाक्य मला आनंद देऊन जात होतं. अखेर दोन दिवसाच्या बोलीवर आलेली ती निघताना मात्र तिच्या नातवंडाना जवळ घेतलं… अंगणातला कढीपत्ता घेऊन भरल्या डोळ्यानं, पण तृप्त मनानं ती घरी गेली… तिच्या काही दिवसांच्या सहवासानं मला मात्र वाटलं की, आई स्वप्नातच येऊन गेली की काय…