प्राची पाठक

स्वयंपाकघरात जरा डोकावून बघू या. एरवी स्वयंपाकघराचं इंटेरिअर चकाचक केलेलं असतं, पण ज्यावर अन्न शिजवलं जातं, तो गॅस मात्र सर्व बाजूंनी अतिशय चिकट आणि काळपट पडलेला असतो. गॅसवर बदाबद पाणी आणि भसाभस साबण न ओतता तो नीट स्वच्छ करता येणं ही एक कला असते. ते एक तंत्रसुद्धा असतं. इतर वस्तू जशा सरसकट घासून काढल्या जातात, तसं ते करायचं नसतं, याचं भान अनेक स्त्री-पुरुषांना नसतं. म्हणूनच गॅसची केवळ वरवरची सफाई केली जाते. त्यातून एखादा पार्ट लूज होतो, तुटतो. गॅसचं लीक सुरू होऊ शकतं- जे अतिशय धोकादायक असू शकतं. जुन्या पद्धतीचा गॅस असेल तर त्याच्या फ्लेमच्या छिद्रांमधून गॅस बाहेर येण्यात घाणीचे अडथळे तयार होऊ शकतात. चालत्या कामात अशा साफसफाईच्या निमित्ताने खीळ बसू शकते. हेही एक कारण होऊन जातं, त्याची स्वच्छता न करायचं. गॅसच्या दर्शनी भागातच इतकी घाण असते, की तो खालून, पाठून वगैरे स्वच्छ करणं दूरचीच गोष्ट! पुन्हा अशा सर्व स्वयंपाकघरातील स्वच्छतेला एक लिंगभेददेखील अजूनही जोडला गेलेला आहे. स्वयंपाकघर स्वच्छ करणं ही जणू घरातल्या स्त्रियांची पिढीजात जबाबदारी होऊन गेलेली असते. स्वयंपाकघर अस्वच्छ असेल तर त्या घरातल्या बाईची परीक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो. आपलं घर स्वयंपाकघरासकट स्वच्छ असणं ही एकूणच त्या घरातल्या सर्वांची जबाबदारी असते. घराची साफसफाई हा काही एकट्या स्त्रियांचा प्रांत नसतोच!

Natural Ways To Dissolve Gall bladder Stones
पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
Loksatta Chatura What is the importance of this fast in terms of health
स्त्री आरोग्य: उपवास करताय? करा, पण आरोग्य सांभाळून…
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
Dermatologists approached high court to stop dentists from performing skin related surgeries
सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांवरून दंतरोग तज्ज्ञ आणि त्वचा रोग तज्ज्ञांमध्ये का जुंपली? हा मुद्दा वादाचा का ठरतोय?
Is surgery necessary for the problem of uterovaginal prolapse
स्त्री आरोग्य : ‘अंग’ बाहेर येणं समस्येसाठी शस्त्रक्रिया करावीच लागते का?

आजकाल लोक लागेल-लागेल करत इंडक्शन कुकरसुद्धा घेऊन ठेवतात. त्याचा पृष्ठभागदेखील असाच कळकट्ट झालेला असतो. स्वयंपाकघरातल्या खिडक्यांवर वर्षांनुवर्षांची धूळ साठलेली असते. आजकालची घरं मोठाली असतात, बाथरूम्स मोठाले असतात. परंतु ज्या स्वयंपाकघरात आपल्याला जास्तीतजास्त वेळ आपली पोटापाण्याची सोय पूर्ण करत घालवायचा असतो, ती स्वयंपाकघरं मात्र अतिशय छोटी असतात. दोन-तीन माणसं तिथे धडपणे उभी राहू शकत नाहीत, इतकी कमी जागा तिथे असते. एकेकदा साधा पंखासुद्धा स्वयंपाकघरात बसवलेला नसतो. पंखा असलाच तर तोही फोडण्यांच्या कृपेने चिकट धुळकट झालेला असतो. पूर्वीच्या अनेक घरांमध्ये एक्झॉस्ट पंखे नसत. हळूहळू नवीन बांधकामात त्यांची सोय केली जाऊ लागली. हे पंखेसुद्धा एकदा बसवून घेतले की त्यांची धूळ साफ करायला सहसा कोणीही जात नाही. तिथेही एक काळपट कोपरा तयार झालेला असतो. मायक्रोवेव्ह ओव्हनदेखील भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अगदी अलीकडेच ठाण मांडून बसू लागले आहेत. त्यांचे हॅन्डल्स, त्यांच्या आतलं वातावरण यात अनेक वर्ष काय काय शिजलं, काय काय ओसंडून वाहिलं, कसं-कसं, काय-काय सांडलं याच्या खुणा दिसून येतात. तीच कथा मिक्सर आणि फूड प्रोसेसर्सची. मुळात अनेक घरी मिक्सर्स आणि फूड प्रोसेसर्स यांच्या पूर्ण फंक्शन्सची माहिती करून घेतली जात नाही. ठरावीक अशी दोन-चारच फंक्शन्स जास्त करून वापरली जातात. ज्या उत्साहात फूड प्रोसेसर्स आणि ज्यूसर्स घेतले जातात, तितक्या उत्साहाने आणि सातत्याने त्यांचा वापर कालांतराने होत नाही. ती भांडी तशीच पडून राहतात घरात.

नेहमीच्या वापरातले साधेसे मिक्सर आणि त्याची भांडी बघू या! या भांडय़ांवरच नव्हे, तर जिथे मिक्सर ठेवलेला असतो, त्याच्या मागच्या फर्निचरवर, भिंतीवर काहीतरी सांडल्याचे डाग पडलेले असतात. अनेक घरांमध्ये हे चित्र दिसून येतं. अशी विशिष्ट प्रकारे चिकट झालेली, डागाळलेली जागा म्हणजे मिक्सरच असणार इथे, हे ताडण्यासाठी कोणत्या विशेष स्किलची गरज नसते. स्वयंपाकघरातली दिव्यांची बटणंदेखील विशेष प्रकारे कळकट, चिकट झालेली असतात. त्यांची स्वच्छता सहसा होत नाही. ती स्वच्छता करणं तसं जोखमीचंच काम असतं. शॉक न बसवून घेता, त्या बटनांमध्ये पाणी न जाऊ देता आणि त्यांचे प्लॅस्टिक- जे मुळातच फारसे चांगल्या दर्जाचे दणकट नसते, ते थेट तोडूनच न ठेवता त्यांची स्वच्छता करावी लागते. एरवी महागडी किचन वेअर सामग्री असणाऱ्या, भरपूर पैसे खर्च करून इंटेरिअर केलेल्या अनेक स्वयंपाकघरांमध्ये अशा अनेक बारीकसारीक गोष्टी तपासल्या तर वर्षांनुवर्षांची चिकट धूळ, डाग यांचे भरपूरच पुरावे सापडतील.