scorecardresearch

Premium

गच्चीवरची बाग: पापडीची लागवड

किचन गार्डनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा पावटा आणि वाल लावायचे असतील तर ते निरनिराळ्या कुंड्यांतून लावा, एकाच कुंडीत लावल्यास त्यांची वाढण्याची पद्धत आणि मातीतून अन्नद्रव्य शोषून घेण्याची पद्धत सर्वसाधारणपणे सारखीच असल्यामुळे वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

terrace garden cultivation field beans kitchen garden
पापडीची लागवड (Photo Courtesy- Freepik)

कांचन गंधे

गुजराती ‘उंधियो’मध्ये लागणारी सुरती पापडीही याच प्रकारात मोडते. ही झुडपासारखी वाढते आणि एका वेळेस अनेक चपट्या शेंगा येतात. एकदा शेंगा काढल्या की तिथेच पुन्हा पांढरी फुले येतात, त्यामुळे शेंगा बरेच दिवस येत राहतात. वालपापडी किंवा चपटी पापडी हिला फील्ड बीन असेही म्हणतात. अलीकडे काही जातींची लागवड जास्त प्रमाणात करतात. किचन गार्डनसाठी जास्तीत जास्त सात-आठ बिया लागतात.

Heart Attack At Gym
जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
article about benefits of exercise
आरोग्याचे डोही : व्यायाम नव्हे; उत्सव!
traditional methods prevents specs early age
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: लहान मुलांचा चष्मा
food
त्याच-त्या भाज्यांना ‘इंटरेस्टिंग’ रूप द्यायचंय?…मग या टिप्स वाचाच!

दसरा, दिवाळी, कंकणभूषण, फुले गौरी हे प्रकार जास्त लोकप्रिय आहेत. यात शेंगा जांभळट, पांढरट-दुधी हिरव्या किंवा पांढरट हिरव्या असतात, तर त्यांच्या बिया दुधी रंगावर काळे ठिपके, तांबड्या किंवा हिरव्या रंगाच्या आहेत, पण हे सर्व प्रकार भाजीसाठी उपयुक्त आहेत. सुरती पापडीला वालवर असेही म्हणतात. याच्या शेंगा लहान, बाकदार, चपट्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. वालपापडीच्या शेंगा थोड्या मोठ्या, चपट्या आणि पातळ असतात, तर बिया मऊ, नाजूक असल्यामुळे याच्या शेंगांची भाजी करतात.

हेही वाचा… शासकीय योजना: विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान

हल्ली ‘रुबी मून’ ही जांभळ्या रंगाची शेंग असलेली जातही लोकप्रिय आहे. किचन गार्डनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा पावटा आणि वाल लावायचे असतील तर ते निरनिराळ्या कुंड्यांतून लावा, एकाच कुंडीत लावल्यास त्यांची वाढण्याची पद्धत आणि मातीतून अन्नद्रव्य शोषून घेण्याची पद्धत सर्वसाधारणपणे सारखीच असल्यामुळे वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पावटा, वाल यांच्या मुळांना ‘दोरजंत’ म्हणजे ‘निमॅटोड्स’चा त्रास होऊ शकतो, पण त्यावर कोणतेही कीडनाशक मारू नका, त्याऐवजी त्या कुंडीत झेंडूची तीन-चार रोपे लावा. त्यांच्या मुळांमधून जो द्राव बाहेर पडतो, तो दोर जंतांना मारून टाकतात.

kanchan.gandhe@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrace garden cultivation of field beans in kitchen garden dvr

First published on: 23-09-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×