Premium

गच्चीवरची बाग : फुलांची बाग

गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई-जुई, शेवंती, अबोली, झेंडू वगैरे रोपांची लागवड घरच्या कुंड्यांमध्ये होऊ शकते. मात्र फुलझाडांची रोपे किंवा कलम लावल्यावर ते लागेपर्यंत जास्त लक्ष द्यावे लागते.

Terrace Garden Flower garden
गच्चीवरची बाग : फुलांची बाग (image – pixabay/loksatta graphics)

फुलांचे अगणित प्रकार आहेत. एकाच प्रकारची परंतु थोडासा फरक असणारीच बरीच फुलझाडे आहेत. उदा. झेंडू, शेवंती, जास्वंद, कन्हेर, गुलाब. जाई-जुई, मोगरा, तगर, दूधमोगरा, रातराणी वगैरे. या सगळ्यांची कलमं लागतात. तयार रोपे लावल्यास जमिनीत किंवा कुंड्यांत लवकर रुजतात. या सर्व फुलांबरोबर, फळ येण्याअगोदर फळांच्या वेलींना किंवा झाडांना फुले यायला लागतात. ती फुलेपण सुंदर आकर्षक रंगांची असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई-जुई, शेवंती, अबोली, झेंडू वगैरे रोपांची लागवड घरच्या कुंड्यांमध्ये होऊ शकते. मात्र फुलझाडांची रोपे किंवा कलम लावल्यावर ते लागेपर्यंत जास्त लक्ष द्यावे लागते. कलम करून रोपे तयार केल्यास विक्रीही करता येऊ शकते. कर्दळीचे कंद लावल्यास छान फुले येतात व पानांचाही उपयोग होतो.

हेही वाचा – झोपू आनंदे: घोरासुराचा वध (उपाय)

जास्वंद – सर्वाना सुपरिचित असं हे फुलझाड. साधारण दीड ते पावणेदोन मीटर उंचीपर्यंत वाढतं. जास्वंदीचे अनेक प्रकार आहेत. विविध रंगांची उधळण आणि फुलांचे विविध प्रकार तेही जवळजवळ बारमाही ही त्याची वैशिष्ट्ये. जास्वंदीची लागवड जून फांद्यांनी होते.

घाणेरी – बागकामशास्त्रात ‘लँटाना’ या नावाने परिचित असलेलं फुलझाड बागेत असल्याशिवाय बागेला पूर्णत्व येणार नाही असं म्हटलं तरी चालेल. पांढरा, लाल, गुलाबी, जांभळा, दुरंगी अशा अनेकविध रंगांच्या खुज्या जाती फुलपाखरांना खुणावीत असतात. अर्धा ते पाऊण मीटर उंची गाठणारं हे फुलझाड आपल्या परसबागेत शोभून दिसते.

फुलांबरोबर घरच्या कुंड्यांमध्ये तुळस, गवती चहा, आलं, लसूण, हळद हेसुद्धा लावता येतात. गवत म्हणजे दुर्वा, हरळी राखल्यास त्याचा उपयोग गणपतीस वाहण्यासाठी करू शकतात. जमिनीवरील हिरवळ म्हणून चांगली दिसते. एखादा किलोमीटर हिरवळीवर रोज चालल्यास पायातील उष्णता कमी होते. हरळीलाही सुंदर पिवळी फुले येतात. या अफाट जगात निसर्गाच्या सान्निध्यात असताना मन ताजे राहते, प्रसन्न वाटते.

हेही वाचा – विवाह समुपदेशन: जोडीदार – कल्पनेतील आणि वास्तवातील!

पालेभाजी : पालक, मेथी, चुका, कोथिंबीर, अंबाडी, चवळी, अळू, घोळाची भाजी आपण घरी पिकवू शकतो. पालेभाज्या बांबू बास्केटमध्ये लावाव्यात. मातीच्या रक्षणासाठी तळाशी हिरवा जाळीचा कपडा टाकावा. पाणी झारीनेच द्यावे. बाजारात या सगळ्या भाज्यांची बियाणे मिळतात. घरच्या घरी घेतलेल्या पालेभाज्यांचा आस्वाद काही औरच लागतो.

फळे : मोठे छिद्र असलेल्या मातीच्या कुंडीच्या तळाशी छोटे दगड किंवा विटांचे तुकडे टाकून माती भरावी. ज्यात शेणखत किंवा गांडूळखताबरोबर थोडी वाळू घालता येईल व त्यावर फळझाडे लावावीत. पेरू, चिकू, आंबा, अंजीर, पपई, लिंबू, केळी यांची लागवड करू शकतो. केळीच्या लागवडीनंतर फळ जरी लागले नाही तरी त्याची पाने आणि कंदाचा उपयोग करता येतो. रोपांची विक्रीही होऊ शकते. प्रत्येक झाडाची वाढ छाटणीने नियंत्रित करावी. झाड लावताना रोप मातीसकट लावावे व लगेच पाणी द्यावे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 18:33 IST
Next Story
झोपू आनंदे: घोरासुराचा वध (उपाय)