संदीप चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बागेतील रोपांना द्रावणयुक्त खतेही देणे महत्त्वाचे व गरजेचे असते. कारण ती ताबडतोब लागू होतात. ही खते फक्त द्रव नसून ते झाडांसाठी संजीवनी देणारे आहेत म्हणून त्यास संजीवके असे म्हणतात. घरच्या घरी व साध्या सोप्या पद्धतीने तयार करता येणारी संजीवके.

गोमूत्र : देशी, गावरान गायीचे शेण हे जसे उपयुक्त आहे तसेच गोमूत्र हे बागेसाठी सर्वोत्तम आहे. गोमूत्र मानवी आरोग्यास जसे लाभदायक आहे. तसेच ते बागेच्या एकूणच शेतीच्या भूआरोग्यासही उपयुक्त आहे. वातावरणात पसरलेले गोमूत्र हे मनुष्याची श्वसनक्षमता वाढवण्यास मदत करते. गोमूत्राची तीव्रता, त्याची प्रत प्रत्येक प्रदेशानुसार बदलत राहते. साधारणत: २०० ते २५० मिली गोमूत्रात पाच लिटर पाणी टाकून ते झाडांना आठवड्यातून एकदा याप्रमाणे झाडांच्या आवश्यकतेनुसार द्यावे. गोमूत्रात खारटपणा तीव्र असल्यामुळे मातीत मिसळल्याने गांडुळांसाठी ही माती चविष्ट बनते. तसेच ते बुरशीनाशक असल्यामुळे रोपांना मूळ कुजक्या रोगांपासून संरक्षण करता येते. बाल्यावस्थेतील रोपे, फांद्या नव्याने लागवड करताना त्यास या द्रावणात भिजवून घेतल्यास त्याचे संरक्षण करता येते. गोमूत्र हे जसे संजीवक आहे तसे ते फवारणीसाठीसुद्धा योग्य आहे. गोमूत्र हे दीर्घकाळ संग्रहित करता येते. ते जितके जुने तेवढे त्याचे गुणधर्म वाढीस लागतात. गावात गोमूत्र मिळणे तितकेसे अवघड नाही. तर शहरी भागातही ते अनेक ठिकाणी विकत मिळते.

हेही वाचा >>>टॅम्पॉन कर म्हणजे काय ? महिलांच्या आरोग्यासाठी टॅम्पॉन का महत्त्वाचे आहेत?

शेणाची स्लरी : बरेचदा ठिकठिकाणी बायोगॅसचे सयंत्र बसवले जातात. यातून बाहेर पडणारी स्लरी वा द्रावण बागेसाठी उपयुक्त असते. त्यात अधिकचे पाणी मिसळून ते बागेस पुरवले जाते. पण छोट्या प्रमाणातही असे द्रावण आपण घरच्या घरी बनवू शकतो व ते बागेस देऊ शकतो. शक्यतो देशी गायीचे ताजे शेण वापरावे. एक किलो ताज्या शेणात २० लिटर पाणी तयार करता येते. साध्या पाण्यात शेण चुरून टाकावे. हे द्रावण कुंडीतील बारीक छिद्र बुजवण्याचे अर्थात भरून काढण्याचे काम करते. त्यामुळे कुंडीस पाणी दिल्याबरोबर वाहून जाण्यास अटकाव होतो. शेणातील सूक्ष्म फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ ओलावा टिकवून धरण्याचे काम ही स्लरी करते. अशा द्रावणासाठी ताजेच शेण वापरावे. त्यात जिवाणूंची संख्या अधिक असल्यामुळे माती सुदृढ होण्यास मदत होते. या द्रावणामुळे गांडुळांची संख्या वाढते तसेच ते सशक्त होतात. २ ते ३ दिवस पुरवून पुरवून वापरता येते. त्यानंतर त्यास दुर्गंधी येते. शहरात भटकणाऱ्या गायीचे शेण वापरू नये, त्या बरेचदा शिजवलेले अन्न खातात. त्यामुळे त्यांच्या शेणास कुबट वास येतो. असे शेण वापरण्याचे टाळावे. देशी गायीच्या शेणाची स्लरी ही कुंडीतील जैवभार कुजवण्यासही मदत करतात. हा सराव पंधरा दिवसांतून एकदा किंवा गरज भासल्यास करावा.

sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace garden home grown organisms amy
First published on: 26-05-2023 at 13:29 IST