थायलंडचे राजे वजिरालोंगकॉर्न यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी राजकुमारी नारीरताना हिची सैन्यात मेजर जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. राजकुमारी सिरिवन्नावरीच्या नियुक्तीमुळे अनेक लोक नाराज आहेत. तिच्याकडे कोणताही लष्करी अनुभव नसतानाही सैन्यात एवढे मोठे पद दिल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण सिरिवन्नावरी नेमकी करते काय? घ्या जाणून

हेही वाचा-पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी केली क्रॅक अन् बनली IPS अधिकारी; काम्या मिश्राची ‘ही’ रणनीती वापरुन तुम्हीही करा आभ्यास

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
In Jammu And Kashmir, PM Modi Assures All Promises Will Be Fulfilled
सर्व आश्वासने पूर्ण करणार! बोगद्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांची जम्मूकाश्मीरच्या जनतेला ग्वाही
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”

सिरीवन्नावरी नारीरतना ही थायलंडचे राजे वजिरालॉन्गकोर्न व त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुजारीनी विवचरावोंगसे यांची एकुलती एक मुलगी आहे. सिरिवन्नावरीचा जन्म ८ जानेवारी १९८७ रोजी झाला. तिला चार भावंडे आहेत. १५ जून २००५ रोजी तिचे आजोबा राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या शाही आदेशानंतर सिरीवन्नावरीला राजकुमारीचा दर्जा देण्यात आला.

हेही वाचा- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ते KKR ची जबाबदारी! शाहरुख खानचा सगळा कारभार सांभाळणारी पडद्यामागची हिरो पूजा ददलानी आहे तरी कोण?

राजकुमारी सिरिवन्नावरीने चुलालॉन्गकॉर्न विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. तसेच फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील प्रसिद्ध फॅशन इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर सिरिवन्नारीने काही काळ फॅशन डिझायनर म्हणून कामही केले. तिने स्वतःचा ब्रँड सिरिवन्नावरी लॉन्च केला. सिरिवन्नावरीला फॅशन डिझायनिंगमध्ये नेहमीच रस होता आणि म्हणूनच तिने या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.

हेही वाचा- फातिमा बिवी! न्यायक्षेत्रात लिंगभेद छेदणारी, सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आशिया खंडातील पहिली महिला न्यायाधीश

राजकुमारी सिरिवन्नावरी थायलंडमधील सर्वात ग्लॅमरस महिला म्हणून ओळखली जाते. फॅशन डिझायनर होण्यापूर्वी ती बॅडमिंटनपटूही होती. २००५ साली दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. सिरीवन्नावरी घोडेस्वारीचाही आवड आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून तिने घोडस्वारी करण्यास सुरुवात केली. २०१३ आणि १०१७ साली झालेल्या एसईए क्रिडा स्पर्धेत सिरिवन्नावरीने थाई घोडस्वार क्रिडा संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

हेही वाचा- मिस युनिव्हर्सची पहिली प्लस साइज मॉडेल! सुंदर दिसण्यासाठी वजन महत्त्वाचं नाही सांगणाऱ्या जेन दीपिका गॅरेटविषयी जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, सिरीवन्नावरी जगातील सगळ्यात श्रीमंत राजकुमारींपैकी एक आहे. तिच्याकडे एकूण ३६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच तिच्याकडे अनेक दुर्मिळ हिरे आणि रत्नाचा साठा आहे. सिरिवन्नावरीचे वडील थायलंडचे राजा, वजिरालोंगकॉर्न हे देखील जगातील सर्वात श्रीमंत राजेंपैकी एक आहेत, त्यांची एकूण संपत्ती ३० अब्ज डॉलर ते ७० अब्ज डॉलर दरम्यान आहे.

Story img Loader