डॉ. उल्का नातू – गडम

आसनांचे विविध प्रकार पहाताना ध्यानात्मक गटातील आसनांचा उल्लेख आपण केला होता. त्या गटातील एक अत्यंत महत्त्वाचे आसन म्हणजे पद्मासन. पद्म – म्हणजे कमळ या आसनास कमलासन असेही संबोधतात.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Uttar pradesh kruti raj
अन् तिने चेहरा लपवून केला पर्दाफाश, आरोग्य केंद्रातील दूरवस्थेची महिला IAS अधिकाऱ्याकडून झाडाझडती!
food products marathi news, price continuously increasing marathi news
खाद्यवस्तूंच्या चढ्या किंमती रिझर्व्ह बँकेचीही डोकेदुखी

शरीराचा त्रिकोणी आकृतीबंध, त्यामध्ये भक्कम आणि स्थिर असा पाया आणि वर निमुळते होत जाणारे शरीर असा हा आकृतीबंध आहे.

आणखी वाचा : योगमार्ग : अर्धपद्मासन

करायला थोडे अवघड परंतु खूप लाभदायक असे हे आसन आहे. इतर अनेक आसनांचे प्राथमिक आसन म्हणूनही पद्मासन केले जाते.

आता आपण कृती पाहू या. प्रथम स्थितीत विश्रांती अवस्था घ्या. हात दोन्ही पायाजवळ शरीराला काटकोनात समोर एकमेकांना जोडून घ्या. आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवी टाच डाव्या जांघेमध्ये आणा.

आता डावा पाय गुडघ्यात दुमडून डावी टाच उजव्या जांघेत ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले असतील. पाठकणा समस्थितीत असेल दोन्ही हात गुडघ्यांवर सानमुद्रा, अथवा ध्यानमुद्रा अथवा द्रोणमुद्रेमध्ये ठेवा. हात कोपऱ्यात दुमडलेले असावेत. तिथे ताठरपणा नको. त्याला कायाशैथिल्य म्हणतात. शरीर ताठ / कडक ठेवल्यास हात कोपरात एकदम सरळ ठेवल्यास त्याला कायाकाठिण्य असे म्हणतात.

अंतिम स्थितीत डोळे मिटून प्राणधारणा अथवा श्वासावर लक्ष केंद्रित करावे.

(सर्व फोटो – सचिन देशमाने)

आणखी वाचा : योगमार्ग : अर्धपद्मासन

आता दुसरे आवर्तन करताना प्रथम डावा पाय दुमडावा व पुढे अंतिम आसनस्थितीकडे वाटचाल करावी.

या आसनाचा नियमित सराव केल्यास मनातील विचार कमी होण्यास मदत होते. ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पचनसंस्था व पुनरुत्पादन संस्थांचे आरोग्य सुधारते. प्राणायाम, प्रत्याहार, धारणेसाठी हे आदर्श आसन आहे. उदरश्वसन होत असल्याने नाडीची गती मंदावते. खूप शांत वाटते.

ulka.natu@gmail.com