आपल्यापैकी बहुतेकांनी केसांत कोंडा होणं म्हणजे काय, याचा अनुभव घेतलेलाच असतो. त्यात डोक्याच्या स्काल्पवर रुक्ष त्वचेचे बारीक बारीक तुकडे (फ्लेक्स) दिसतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाजही येते. अनेकांचा असा समज असतो, की केसांची स्वच्छता नीट न ठेवल्यामुळे कोंडा होतो. मात्र सारखा सारखा शाम्पू केल्यानंतरही कोंडा होऊ शकतो. चांगल्या प्रतीचा अँटी-डँड्रफ शाम्पू वापरल्यामुळे, तसंच स्काल्प निरोगी व्हावा यासाठी उपचार केल्यामुळे ही समस्या नाहीशी होऊ शकते. याबाबत ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं दिलेल्या काही टिप्स पाहू या.

शाम्पूच्या बाटलीवरचा मजकूर वाचा!
डँड्रफ शाम्पू आणि साधा शाम्पू अर्थातच वेगळे असतात. डँड्रफ शाम्पू जर योग्य पद्धतीनं वापरला गेला, तर त्याचा परिणाम आणखी चांगल्या प्रकारे मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही जो अँटी-डँड्रफ शाम्पू निवडलेला असेल, त्याच्या बाटलीवर त्याच्या वापराबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत का, हे जरूर पाहावं. प्रत्येक अँटी-डँड्रफ शाम्पूमध्ये विशिष्ट घटक असतात. काही प्रकारचा अँटी डँड्रफ शाम्पूस्काल्पवर लावल्यानंतर काही मिनिटं (उदा. ५ मिनिटं) तसाच ठेवायचा असतो आणि मग धुवून टाकायचा असतो. काही अँटी-डँड्रफ शाम्पू मात्र अशा प्रकारे स्काल्पवर राहू देण्याची गरज नसते. ते लगेच धुतले तरी चालतात. हे नियम तुम्हाला शाम्पूच्या बाटलीवरच वाचून समजतील.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

आणखी वाचा : नवरा गमावला, वडिलांचंही निधन झालं, पण माझं पुढे कसं होणार याची चिंता तुम्हाला का?

आपल्याला चालणाराच शाम्पू निवडा-
बाजारात विविध प्रकारचे अँटी डँड्रफ शाम्पू मिळतात. मात्र कुणाला कुठल्या अँटी डँड्रफ शाम्पूचा उपयोग होईल हे व्यक्तिगणिक बदलतं. त्यामुळे आपल्याला चालणारा वा आपल्यासाठी परिणामकारक ठरणारा अँटी-डँड्रफ शाम्पू कोणता, हे प्रत्येकाला स्वत:लाच पडताळून पाहावं लागतं. त्यासाठी तुम्ही तुम्हाला योग्य असा शाम्पू सापडेपर्यंत वेगवेगळे अँटी-डँड्रफ शाम्पू वापरून तुलना करून पाहू शकता. शाम्पू निवडताना आपल्या केसांचा पोत काय आहे, डोक्याची त्वचा तेलकट आहे की कोरडी? ती रुक्ष, अतिसंवेदनशील आहे का? या गोष्टीही ध्यानात घ्यायला हव्यात.

आणखी वाचा : स्रियांमधील रक्तक्षय व कंबरदुखीवर उपयुक्त- खजूर

तुमच्या शाम्पूत ‘कोल टार’ आहे का?
काही अँटी-डँड्रफ शाम्पूमध्ये ‘कोल टार’ हा घटक असतो. हा घटक असलेला शाम्पू वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. तुमचे केस हलक्या रंगाचे असतील (उदा. राखाडी वा पांढरे केस), तर अशा शाम्पूमुळे ते रंगहीन होण्यास चालना मिळू शकते. परदेशी लोकांच्या ‘ब्लाँड’ रंगाच्या केसांवरही या शाम्पूचा असाच परिणाम दिसून येऊ शकतो. अशा लोकांना कोल टार नसलेला अँटी-डँड्रफ शाम्पू निवडायला सांगितलं जातं. शिवाय कोल टार असलेले शाम्पू वापरल्यानं डोक्याची त्वचा सूर्यप्रकाशाला अधिक संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शाम्पूत कोल टार असेल, तर उन्हात बाहेर पडताना केस आणि डोकं झाकणं आवश्यकच आहे.

आणखी वाचा : थंडीमध्ये केसांची घ्या, अशी काळजी…

बहुसंख्य लोकांना केसांत कोंडा होण्याबाबत खास वैद्यकीय उपचार घेण्याची गरज भासत नाही. अँटी डँड्रफ शाम्पूचा वापर करण्याबरोबरच शरीरमनाचं आरोग्य आणि त्याबरोबर केसांचं आरोग्य चांगलं राखणं, केसांची उत्तम निगा राखणं, यामुळे अनेकांचा कोंडा होण्याचा प्रश्न सुटतो आणि त्यानंतर साधा शाम्पू-कंडिशनर वापरून चालतं. पण काही लोकांना मात्र केसांत कोंडा होण्याचा खूपच त्रास होतो- उदा. रुक्ष त्वचेचे पापुद्रे मोठ्या प्रमाणात केसांवर आणि स्काल्पमध्ये दिसतात किंवा डोक्याला खूपच खाज येते. अशा वेळी विशिष्ट प्रकारची त्वचेशी निगडित समस्या असू शकते. उदा. सेबो-हेइक डर्माटायटिस, सोरियासिस, डोक्याच्या त्वचेवर झालेला बुरशीचा संसर्ग किंवा एक्झेमासारखी समस्या. तेव्हा अँटी डँड्रफ शाम्पू वापरून आणि केसांची निगा राखूनही कोंडा होण्याच्या समस्येत फरक पडत नसेल, तर मात्र त्वचारोगतज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या समस्येचं योग्य निदान व उपचार होऊ शकतील.