अशा अनेक भाज्या आहेत, की त्यांची सालं आणि देठं वापरून निराळे, चवदार पदार्थ करता येतात. अशा काही पदार्थांविषयी-

तांबडा भोपळा/ काशीफळ भोपळा-

तांबड्या भोपळ्याच्या सालीची भाजी करता येते हे तुम्हाला माहित आहे का? आता ही भाजी जवळपास विस्मरणातच गेल्यात जमा आहे. पण ती छान लागते. लाल भोपळा चांगला ताजा, काळे डाग न पडलेला निवडून घ्यावा. तो स्वच्छ धुवून त्याची थोडी जाडसर साल काढून घ्यावी. या सालीचे चौकोनी बारीक तुकडे करावेत आणि ती हरभरा डाळीबरोबर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. नंतर फोडणीस टाकावी. फोडणीत नेहमीच्या पदार्थांबरोबर मेथीचे दाणे घालावेत. भाजीत तिखट, मीठ, चवीपुरता गूळ वा साखर घालावी. वरून कोथिंबीर पेरावी. एरवी आपण ही सालं टाकूनच देतो. पण अशा प्रकारे केलेली सालांची भाजी ‘सालांची’ आहे हे सांगावं लागेल. ही भाजी पौष्टिक असते असं जुने लोक सांगतात. ‘कोंड्याचा मांडा करणे’ या म्हणीचं हे उदाहरण म्हणायला हवं!

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दोडका / शिराळे-

दोडक्याची साल खडबडीत आणि फुगीर, टोकदार रेषा असलेली (ridged) असते. दोडक्याची भाजी करताना आपण त्याची साल काढून दोडका चिरतो. ही साल वायाच जाते. त्यापासून ‘दोडक्याच्या शिरांची चटणी’ नामक एक अतिशय चवदार पदार्थ बनवता येतो. तुम्ही एकवेळ दोडक्याच्या सालीची परतून, मिक्सरवर वाटून केलेली, खोबरं, शेंगदाणे, डाळं घातलेली चटणी पाहिली असेलही, पण दोडक्याच्या शिरांची चटणी फारच कमी केली जाते. ती लागते अगदी खमंग आणि त्याची कृतीही सोपी आहे.

हेही वाचा… मैत्रिणींनो, आर्थिक गुंतवणूक करायचीय?… मग ‘या’ ६ गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं!

एक बारीक किसाची किसणी घ्यावी आणि दोडका त्याला समांतर राहील असा धरून हलक्या हातानं त्याची फक्त साल किसून वेगळी करावी. साल उभ्या दिशेनं किसल्यास सालीचा बारीक, लांब व पातळ कीस मिळतो. दोडक्याचा गर किसू नये.

किसून वेगळी केलेली साल जरा जास्तच तेल घेऊन त्यावर परतायला टाकावी. मंद आचेवर, अधूनमधून ढवळत, साल जळू न देता कुरकुरीत होईपर्यंत परतावं. नंतर या कुरकुरीत सालीत चवीनुसार मीठ, तिखट, चिमूटभर साखर घालावी. थोडे तीळ घालावेत. भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालावं आणि ही भुरभुरीत, कुरकुरीत, खमंग चटणी उतरवावी. ही चटणी नुसतीच इतकी मस्त लागते, की तुम्ही ती चाखता चाखता त्याबरोबर पोळी खायलाही विसरून जाल!

अळूची देठं-

आपण जेव्हा अळूची भाजी करतो, तेव्हा अनेकजण अळूची देठं काढून फेकून देतात, तर काही लोक ही देठं बारीक चिरून अळूच्या भाजीतच घालतात. पण तुम्ही ‘अळूची देठी’ हा पदार्थ खाल्ला आहे का? महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी हा पदार्थ करतात, पण तो सर्वांना माहिती नसतो. भाजीचा अळू चिरताना देठं वेगळी करून तीही एकेक सेंटीमीटर तुकडे होतील अशी चिरतात. वेगळ्या ताटलीत ही देठं थोडं पाणी घालून कुकरमध्ये वाफवून घेतात. वाफवलेली देठं कुस्करून त्यात आवडीनुसार तिखट, मीठ, साखर घातली जाते. वरून मोहरी-जिरे-हिंग व हळदीची खमंग फोडणी देतात आणि जेवायला बसताना त्यात थोडं भाजलेल्या दाण्याचं कूट आणि ताजं दही घालून मिसळून घेतात. ही ‘देठी’ चवीला उत्तम लागते.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: परसबागेतील गाजर

वाया जाणारे पदार्थ वापरून ‘कोंड्याचा मांडा’ करायला शिकवणारे काही विस्मरणात जाऊ पाहणारे पदार्थ तुम्हालाही नक्कीच माहिती असतील. मग ते आम्हाला जरूर कळवा!

lokwomen.online@gmail.com

Story img Loader