यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवस-रात्र कठोर परिश्रम घेत असतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक उमेदवार आहेत, जे वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतात पण उराशी त्यांनी आयपीएस किंवा आयएएस बनण्याचे स्वप्न बाळगलेलं असतं. याचा अर्थ असा होत नाही त्यांचे क्षेत्र चुकलेले असते. पण, दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घेऊनही ते आपलं स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अशाच एका आयएएस महिला अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवी घेतली पण उराशी आयपीएस बनण्याचे स्वप्न बाळगलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंशिका वर्मा असे त्या आयपीएस अधिकारीचे नाव आहे. अंशिका उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. अंशिकाचे प्राथमिक शिक्षण नोएडा येथे झाले. त्यानंतर तिने गलगोटिया कॉलेज, नोएडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. २०१८ मध्ये तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंशिकाने २०१९ मध्ये प्रयागराज येथे UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

हेही वाचा- मॉडलिंगची झगमगती दुनिया सोडली, फक्त दहा महिने केला अभ्यास, ऐश्वर्याने पहिल्याच प्रयत्नात मिळवला आयएएसचा मुकूट

आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अंशिकाने यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. २०१९ मध्ये अंशिकाने पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र, तिला यामध्ये यश मिळाले नाही. परंतु, या अपयशामुळे ती खचली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर २०२० मध्ये तिने दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिने संपूर्ण भारतात १३६ वा क्रमांक मिळवला आहे.

यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी अंशिकाने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. स्व-अध्ययानाच्या जोरावर तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली. अंशिका आपल्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडिलांना देते. अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड (UPEL) मधून निवृत्त झाले आहेत, तर आई गृहिणी आहे. लेकीला आयपीएस बनल्याचे बघून अंशिकाच्या आई-वडिलांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

हेही वाचा- वयाच्या २२ व्या वर्षी कॅन्सरशी लढून, भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत मिळवले स्थान! पाहा,’कनिका टेकरीवाल’चा प्रवास

अंशिका २०२१ च्या बॅचची उत्तर प्रदेश केडरची अधिकारी आहे. सध्या ती गोरखपूरच्या एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त) म्हणून कार्यरत आहे. सोशल मीडियावर अंशिका मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या अधिक आहे. इन्स्टावर अंशिकाचे २५७ के फॉलोवर्स आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc success story meet ips anshika verma who cracked upsc in 2nd attempt without coaching dpj
First published on: 20-02-2024 at 17:48 IST