Urfi Javed पूर्वाची सकाळची लोकल नेहमीप्रमाणे लेट आली, जवळजळ धावतच तिने ती पकडली. दरवाजामध्ये हवा खाणाऱ्या बायकांशी “चढायला द्याल की नाही” म्हणून पूर्वाने तावातावाने भांडायला सुरुवात केली. तिसऱ्या सीटवरून नेहाने मोबाइलमधून डोकंवर काढत,“पूर्वा, जाऊ दे तुझं भांडण… बस इथे, ऐक, हे भांडण ट्रेंडिंग आहे. उर्फी जावेद विरुद्ध चित्र वाघ… लेटेस्ट डेव्हलपमेंट, चित्राताईंनी उर्फीला साडीचोळी ऑफर केली आणि नाही स्वीकारली तर थोबाड फोडीन ही धमकीपण फ्री.”

पूर्वाला मॅटर फार माहीत नव्हते. म्हणून नेहाने इत्यंभूत पण मसाल्यासकट, ट्रेनमध्ये भरगर्दीत ट्विटरवर सुरु असलेली ही धमाकेदार पेज थ्री न्यूज सांगायला सुरुवात केली, “उर्फीने स्वतःचा बोल्ड फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला त्यावर चित्राताईंनी ‘तिला सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंघटपणा केल्याबद्दल पोलिसांनी बेड्या ठोकायला हव्यात’ असं ट्विट केलं कारण ‘ती समाजात विकृती पसरवते आहे!’ चित्राताईंनी पोलीस आयुक्तांना याबद्दल पत्रही दिलय! मग हे प्रकरण एक स्टेप वर गेलं, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलंय, पुढची पायरी सुषमा अंधारे… त्यांनी अमृता फडणवीस, कंगना राणावत आणि केतकी चितळे यांच्या बोल्ड कपड्यांवर चित्राताई का आक्षेप घेत नाहीत असाही जाब विचारलाय. हल्लीच वादात सुप्रियाताई सुळेही पडल्यात आणि लेटेस्ट न्यूज अजित दादा यांनी आम्ही स्त्रियांना राजकारणात संधी दिली आहे. त्याचे त्यांनी सोने करावे किंवा राख करावी हे त्यांच्याच हातात आहे अशा उलट्या कानपिचक्या दिल्या… एल ओ एल!”

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आणखी वाचा : लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!

पूर्वा थोडं विचार करून म्हणाली.“काय म्हणून हा वाद सुरु आहे? संस्कृती वाचवण्यासाठी? उर्फी जावेदने असं काय कार्य केलं आहे की तिची कोणीही नोंद घ्यावी? कोणी काय कपडे घालावे ही सद्सद्विवेकबुद्धी प्रत्येकाकडेच असायालाच हवी.” “नाही समजत तर चांगलंच खडसावलं पाहिजे.” बाजूच्या आज्जी ऐकत नव्हत्या, नेहा म्हणाली,“अहो आज्जी! उर्फी पडली बॉलीवूडची नटी, त्यांच्या क्षेत्रात दिखाऊपणालाच महत्व आहे. आपण लोकांच्या चर्चेत राहू याचा विचार बॉलीवूड अभिनेत्री करतातच. जे सामान्यांना अयोग्य वाटत ते त्यांना सेन्ससशनल वाटत.” नेहातली पत्रकार म्हणाली. समोरच्या काकूंनी मत मांडले,“आणि आता तर काय तुम्ही अशी टीकेची झोड उठवली तर उर्फीला एवढी पब्लिसिटी मिळेल की तिचे सिनेमे हिट!” खिडकी पकडलेल्या वकिलीणबाईंनी आपले मत मांडले, “पोलिसात लेखी तक्रार झाल्याशिवाय तिच्या केसालाही कोणाला हात लावता यायचा नाही. थोबाडीत वगैरे तर दूरची बात. या कायदेशीर गोष्टी चित्राताईना ठाऊकही नाहीत याचेच मला आश्चर्य वाटते. दुःख याचं की आपणच निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींना उर्फी जावेदने घातलेले किंवा न घातलेले कपडे हा प्रश्न का अटीतटीचा वाटतो आहे?”

आणखी वाचा : सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

पूर्वा म्हणाली,“पण ह्या वादाचा उपयोग काय? फक्त गॉसिप? आपण स्त्रियांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो ते यासाठी? आपल्या प्रश्नांसाठी यांच्याकडे संवेदनशीलता आहे का? कालचीच गोष्ट. काल सकाळी मी सोनोग्राफी केली आणि भरपूर पाणी प्यायल्यामुळे लघवीला लागले. थंडीचे दिवस. ऑफिसला जाईपर्यंत कसं कंट्रोल करणार? शेवटी मी नाईलाज म्हणून स्टेशनवरच्या सार्वजनिक शौचालयात गेले. त्याची अवस्था अतिशय दारुण होती. त्या आठवणीनेही मला शिसारी येतेय. रेल्वेस्टेशनवरची टॉयलेट्स किंवा हायवेवरची टॉयलेट्स हा किती महत्वाचा प्रश्न! आपल्यासारख्या कितीतरी स्त्रियांवर ही वेळ येत असेल पण कोणत्याही लोकप्रतिनिधींना कधी हा प्रश्न समजला का ?”

आणखी वाचा : “उर्फीलाही नाचवा…” म्हणत चित्रा वाघ व उर्फी जावेदमधील वादावर अमृता फडणवीसांनी बोलणं टाळलं

“हो ना, परवा भाइंदरला स्टेशनला पोचल्यावर मला समजले की पिरिअड्स सुरु झाले पण सॅनिटरी पॅड नव्हतं आणि स्टेशनवर मेडिकल शॉपही नव्हते. परत स्टेशनच्या बाहेर जाऊन घेऊन आले तर उशीर होणार त्यात शौचालये गलिच्छ.वापरणार तरी कसं? शेवटी दीड तासाने ऑफिसला पोहोचले तेव्हाच पॅड वापरता आले.” सगळ्यांचीच सेम स्टोरी. पूर्वा म्हणाली, “हे आपले प्रश्न लोकप्रतिनिधींकडे कोणत्या ना कोणत्या स्त्रीने नक्कीच मांडले असतील. स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांनीच सोडवायला हवेत. पण दुर्दैवाने या आपल्या व्यथा वेदनांना समजून घेण्यासाठी संवेदनशीलताच आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे नाही. आणि तसे असेल तर आपण यांना का निवडून द्यावे?”

“हे तर अगदी रोजच्या आयुष्यात उद्भवणारे प्रश्न… पण त्याहूनही गंभीर असे, घरकाम करणाऱ्या स्त्रियांचे शोषण, डान्सबार बंदी, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या, कार्यालयातील स्त्रियांचे लैंगिक शोषण, एकट्या राहणाऱ्या वृद्ध स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लघुउद्योग करणाऱ्या स्त्रियांना आर्थिक मदत.. कितीतरी प्रश्न आहेत. तुम्ही जर फक्त उर्फीच्याच मागे लागाल तर हे प्रश्न कोणी सोडवायचे?” वकील पोटतिडकीने म्हणाली..

आणखी वाचा : Chitra Wagh on Rupali Chakankar: आयोगाच्या नोटीशीवर चित्रा वाघ यांचा संताप

नेहाची अडचण तर वेगळीच होती, “उर्फीबाई मुंबईच्या रस्त्यावर बोल्ड वस्त्रे लेवून अवतरल्या म्हणून आगपाखड होत आहे. पण त्यामुळे संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली मुंबईतील स्त्रियांवरही बंधने येतील. मुंबईने स्त्रियांना स्वातंत्र्य दिले, स्वप्नं दिली, ती पुरी करण्याची हिम्मत दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे आश्वासक सुरक्षितता दिली. आता कपड्यांवरून मुलींच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तर मुंबई आणि इतर शहरे यांच्यात फरक तो काय?”

तेवढ्यात चर्चगेट आलं नेहाच्या डोक्यातून हा विषय जातच नव्हता,तिला वाटलं “आपणही चित्रताईंना पत्र लिहून विनंती करावी की उर्फीसारख्या स्त्रियांना अनुल्लेखाने मारणेच उत्तम आहे. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्रियांना आत्मनिर्भर करणाऱ्या सावित्रीबाईंचे नाव या फुटकळ विषयासाठी घेण्याची खरंच गरज नाही त्यापेक्षा आपल्याला करण्यासारखी बरीच विधायक कार्ये आहेत.

tanmayibehere@gmail.com