चैताली कानिटकर

“Impossible is the word only found in dictionary of fool!” अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात आढळतो. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट नेहमी म्हणत असे की, अशक्य हा शब्द माझ्या कोशात नाही.कोणतीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी शक्य होतेच. याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे, टेनिस जगतावर अधिराज्य गाजवणारी टेनिसपटू सेरेना विल्यम्स!

Priyanka Chopra
“त्यानंतर प्रियांकाच्या खूप तक्रारी आल्या”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला देसी गर्लबरोबर काम करण्याचा अनुभव
marathi actress Prajakta Gaikwad
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला ‘मराठी’ची भुरळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते, “ओटीटीच्या स्पर्धेत मराठी…”
Prosenjit Chatterjee recalls working with Aishwarya Rai
“ती खूप…”, ऐश्वर्या रायबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; दोघांनी २१ वर्षांपूर्वी ‘या’ सिनेमात केले होते रोमँटिक सीन
meezaan jaffrey anant radhika wedding
‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…
only 90s kid can understand magic of this song shaktiman
फक्त 90’s ची मुले समजू शकतात! “शक्ति-शक्ति-शक्तिमान..” तरुणांनी गायले नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गाणं
Kuldeep Yadav Marriage
कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
Sonakshi sinha reacts on pregnancy rumors
गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…”
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?

“मला निवृत्ती हा शब्द आवडत नाही , पण इतर महत्त्वपूर्ण गोष्टींना वेळ देण्यासाठी आता हा निर्णय घेत आहे” असे तिनं व्होग या नियतकालिकासाठी लिहिलेल्या लेखांत म्हटलं आहे. सर्वोत्कृष्ट टेनिसपटू , लोकप्रिय मॉडेल, काळजीवाहू आई, कर्तव्यदक्ष पत्नी या साऱ्या भूमिका नेटाने निभावणारं अव्वल टेनिसप्रवीण क्रीडापटू व्यक्तिमत्त्व म्हणजे सेरेना!

२६ सप्टेंबर, १९८१ रोजी सेरेना नावाचे कन्यारत्न रिचर्ड विल्यम्स व ओरॅसीन प्राइस यांच्या पोटी जन्माला आले. सेरेनाच्या जन्माच्या काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांनी एक स्वप्न पाहिले होते. आपल्या पाच कन्यांपैकी एक तरी टेनिसस्टार व्हावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच ते स्वतः हा खेळ शिकले व मुलींनाही प्राथमिक शिक्षण घरी देण्याचीच सोय त्यांनी केली. तरूण सेरेनाने साडेचार वर्षांची असतानाच ज्युनियर स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली व अनेक स्पर्धा जिंकल्या. पुढे तिचे प्रशिक्षक रिक मॅकी यांनी तिच्या खेळाला पैलू पाडण्याचे काम केले. तसेच काही काळ अँडी रॉडिक यांच्यासोबतही प्रशिक्षण सुरू होते. अधिकाधिक सराव, मेहनत यामुळेच सेरेना जिवंतपणीच एक दंतकथा ठरली यात शंकाच नाही.

आणखी वाचा : पारंपरिक-आधुनिक शैलींचा मेळ, गौरींचे ‘ट्रेण्डी’ दागिने

१९९८ साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ग्रँड स्लॅम मुख्य ड्रॉमध्ये पदार्पण केले; त्यावेळी सेरेना विल्यम्स अवघी 16 वर्षांची होती. २०१६ मध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये सेरेनाने अंतिम फेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा पराभव करून ऑपन एरामधील २२ ग्रॅण्ड स्लॅम एकेरी विजेतेपदाच्या स्टेफी ग्राफच्या विक्रमशी बरोबरी केली. पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून सेरेनाने हा विक्रम पूर्णपणे आपल्या नावे केला. अनेकांना हे माहीत नाही की तेव्हा सेरेना दोन महिन्यांची गर्भवती होती. प्रसूती रजेनंतर तिचा कोर्टातील कमबॅक पाहून क्रीडारसिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

खरंच, यूएस ओपन २०२२नंतर आपण निवृत्त होऊ असे जरी सेरेना यांनी जाहीर केलेले असले तरीही या निर्णयाचा ती फेरविचार करत आहेत. जिद्द, चिकाटी, अखंड परिश्रम, ध्यास हे जिथे आहे, तिथे वयही फिके पडते. हे पटवून देण्यासाठी सेरेना हेच मोठे प्रेरणादायी व्यक्तिमत्व अनेक क्रीडापटू, क्रीडाशौनिकांसाठी आहे. वयाच्या ४०व्या वर्षी पहिल्याच फेरीत मॉंटेनेग्रोच्या दाका कोविनीच हिला ६-३, ६-३ अशी त्यांनी मात दिली. सुरुवतीच्या दिवसात कृष्णवर्णीय म्हणून तिला अन्याय सोसावा लागला. पण नंतर स्वकर्तृत्वावर तिने वर्णभेदालाही अलविदा केलं.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : प्राजक्ता माळी म्हणते, “‘तू फक्त लढ’ म्हणणारा आश्वासक मेन्टॉर महत्त्वाचा”

स्त्री वर्गाला आजही काही ठिकाणी कमी लेखलं जातं, ह्याविषयी सेरेनाच्या मनात खंत आहे. महिलांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आज तिच्या नावावर आहे. २३ वेळाल ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकून ती महिलांमध्ये अग्रस्थानावरही पोहोचली होती. वडिलांनी तिच्यासाठी पाहिलेलं स्वप्न तिनं पूर्णत्वास नेलं. सेरेनाने पहिल्या यूएस ओपन दरम्यान तिचे वडील रिचर्ड विल्यम्स यांनी तिचे छायाचित्र टिपले होते. आज तब्बल २३ वर्षानंतर सेरेनाची पाच वर्षांची मुलगी ऑलिम्पियाडच्या हाती कॅमेरा होता. उत्साह, जिद्द, सफाईदार खेळ, अफलातून सर्व्हिस ही सेरेनाच्या खेळतील वैशिष्ट्ये. “ मी खेळलेली प्रत्येक फायनल माझी फेव्हरिट आहे” असे सेरेना नेहमीच म्हणते.

भाग्य, नशिब, मेहनत यामध्ये नेहमीच मेहनतीचा वाटा मोठा असतो. शब्दांकडे नीट पाहिल्यावरच हे जाणवते. लक हा शब्द दोन अक्षरी, भाग्य हा अडीच अक्षरी, नशीब हा तीन अक्षरी तर मेहनत हा शब्द पूर्ण चार अक्षरांचा आहे. २३व्या ग्रँड स्लॅम वर मोहोर उमटविणाऱ्या सेरेनाच्या खेळातून याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. सेरेना नेहमीच म्हणते, “लढत रहा, कितीही संघर्ष करावा; तरीही हार मानू नका.” टेनिसच्या खेळात चमकदार कामगिरी दाखवणाऱ्या सेरेना विल्यम्सला मनःपूर्वक सलाम!

chaitalikanitkar1230@gmail.com