‘आय पॅच’ हा शब्द ऐकून आपल्या डोळ्यांसमोर समुद्री चाच्यांच्या गोष्टीतला एकाच डोळ्याला काळा आय पॅच लावलेला माणूस आला तर नवल नाही! पण आज आपण पाहणार आहोत तो आय पॅच मात्र वेगळा आहे. हा आहे सौंदर्यप्रसाधनांमधला खास आय पॅच. डोळ्यांचं सौंदर्य आणि आरोग्य सांभाळण्यासाठी मदत करणारा हा आय पॅच आहे. काही जण यालाच ‘आय मास्क’सुद्धा म्हणतात, पण त्याची घडण पाहाता आय पॅच हेच नाव अधिक योग्य.

आणखी वाचा : गौतमी पाटील ‘१०० टक्के’ चुकलेली नाही!

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

‘सूदिंग हायड्रोजेल आय पॅच’ कसा वापरतात ते पाहू

हा आय पॅच कुयरीच्या किंवा बीनच्या आकाराचा असतो. दोन्ही डोळ्यांसाठीच्या आय पॅचेसचा एक सॅशे, अशा पद्धतीनं या आय पॅचेसच्या सॅशेजचा सेट बाजारात विकत मिळतो. दुसऱ्या प्रकारात लहान गोल डबीत आय पॅचेसची चळत असते आणि वापरण्यासाठी ते एक-एक करून बाहेर काढता यावेत म्हणून आय पॅच उचलायला छोटा स्पॅच्युला दिलेला असतो. हे पॅचेस डोळ्यांच्या खालच्या बाजूस वापरण्यासाठी असतात. जागरण झाल्यावर, जास्त ताण असल्यावर आपले डोळे थकलेले दिसतात किंवा कधी डोळ्यांच्या खाली काळसर वर्तुळं दिसतात, डोळ्यांच्या खालचा भाग जरा सुजलेला (पफी) दिसतो, अशा गोष्टींवर हे आय पॅच वापरले जातात आणि ते ‘स्मूदिंग आणि सूदिंग इफेक्ट’ देतात, असा सौंदर्यप्रसाधन उत्पादकांचा दावा असतो.

आणखी वाचा : हिवाळ्यासाठी तंतूमय पदार्थ आवश्यक

सर्वसाधारणपणे या आय पॅचेसमध्ये ‘हायड्रोजेल’ वापरलेलं असतं. वापरायची पद्धतही सोपीच. केवळ सॅशे उघडायचा आणि पॅचच्या कुयरीचं टोक आतल्या बाजूस अशा पद्धतीनं डोळ्यांच्या खाली आय पॅच चिकटवून द्यायचा. हे आय पॅच साधारणपणे १५ ते २० मिनिटं ठेवतात. त्यामुळे डार्क सर्कल्सना अटकाव होईल, डोळ्यांवरचा थकवा, डोळ्यांखालचा पफीनेस कमी होईल आणि डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरकुत्यांनाही अटकाव होईल, असं सांगितलं जातं. ते कितपत खरं, हे ज्याच्या त्याच्या अनुभवावरच अवलंबून आहे. एक मात्र आहे, की हे आय पॅचेस वापरून डोळ्यांना ताजंतवानं नक्की वाटेल. अधिक ‘कूलिंग इफेक्ट’ मिळण्यासाठी काही जण अशा प्रकारच्या आय पॅचेसचा सॅशे वापरण्यापूर्वी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवतात. बाजारात आणि ऑनलाईन ॲप्सवरही विविध कंपन्यांचे ‘सूदिंग आय पॅचेस’ उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’चे रूग्णांना सहाय्यकारी संशोधन (उत्तरार्ध)

‘आय पॅच’चा उपयोग मेकअपमध्येही-
मेकअपपूर्वी चेहरा ताजातवाना दिसावा म्हणून आय पॅच वापरला जातो, पण हा त्याचा केवळ एक उपयोग झाला. मेकअप आर्टिस्टस् आणखी एका कारणासाठी हे आय पॅच वापरतात. मेकअप करताना जेव्हा आयशॅडो लावलं जातं (-विशेषत: पावडर किंवा चमकीचं आयशॅडो) तेव्हा जर डोळ्यांच्या खाली आय पॅचेस चिकटवले, तर आयशॅडोचे पडणारे कण हायड्रोजेल आय पॅचवरच सांडतील आणि डोळ्यांच्या खाली किंवा गालावर आयशॅडोचे कण दिसणार नाहीत.

आणखी वाचा : नातेसंबंध : विवाहबाह्य आकर्षण वाटतंय?

विविध गुणकारी घटकांचा वापर-
आय पॅचेसचा गुणकारीपणा वाढवण्यासाठी उत्पादक त्यात विविध खास घटक वापरतात. रेटिनॉल, ‘क’ जीवनसत्त्व, कॅफिन, हायाल्युरोनिक ॲसिड, ग्लिसरिन, निआसिनामाइड याबरोबर कॉर्नफ्लॉवर (एक निळ्या रंगाचं फूल) वॉटर, हेम्प सीड ऑईल अशा विविध घटकांचा समावेश असतो. काही आय पॅचेस पूर्णपणे ‘व्हेगन’ घटकांपासून बनवलेले असतात.
काही आय पॅचेसमध्ये सुगंध वापरलेला असतो, तर काहींमध्ये अल्कोहोल कंटेंट असतो, असे आय पॅचेस मात्र सर्वजण वापरू शकतीलच असं नाही. उदा. अतिसंवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्ती किंवा गर्भवती असे आय पॅचेस वापरणं टाळतात. इतरही सर्वच आय पॅचेस सर्वांना चालतील असं नसतं, त्यामुळे आपल्याला काय ‘सूट’ होतंय ते पाहाणं गरजेचं आहे. त्वचा संवेदनशील असणाऱ्या व्यक्तींसाठी खास आय पॅचेस मिळतात.