कालपासून वटपौर्णिमेची हुरहूर होती. प्रत्येक बाईला असते तशीच. तसं म्हणायला गेलं तर कोणत्याच बाईला हा नवरा सात जन्म मिळावा असं वाटत नाही. पण तरीही नटायला सजायला मिळतं. कोडकौतुक होतं म्हणून बायका हौसमौज करून घेतात. रोजच्या धावपळीत थोडासा विरंगुळा, थोडसं नटणं-मुरडणं होतं म्हणून बायका वडाची पूजा करतात. तसंच माझंही काहीसं होतं. गेले ५-६ वर्षे नित्यनियमाने वडाची पूजा करतेय. दरवर्षी नवऱ्याची सातजन्माची साथ मागते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करते. पण हे सर्व करताना मला प्रश्न पडायचा की आपल्याला जसं नवरा दीर्घायुषी व्हावा, त्याची साताजन्माची साथ मिळावी असं वाटतं तसंच, पुरुषांनाही वाटत असेल का? आणि वाटत असेल तर त्यासाठी ते काय करत असतील? पण हे प्रश्न मला प्रत्येक वटपौर्णिमेला पडतात आणि प्रत्येकवेळी हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. तसंच, हे प्रश्न मागे सारले आणि पटपट घराच्या दिशेने पावलं टाकू लागले.

घरी आले आणि उद्याची म्हणजेच वटपौर्णिमेची तयारी सुरू केली. साडी कोणती नेसायची, फळं, काळ्या मण्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं. आजचा दिवस संपला. दिवसभराचा थकवा असल्याने पडल्याच क्षणी डोळा लागला. गुडूप अंधारात मस्त गाढ झोपी गेले. दुसऱ्या दिवशी नवरा भल्यापहाटेच उठला होता बहुतेक. त्यानं उठून आधी स्वयंपाक केला. वरण – भात, पोळी-भाजी, खिर असं पंचपक्वान सकाळी ९ वाजेपर्यंत तयार होतं.

Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
pregnancy, family planning surgery,
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा राहू शकते?
live-in relationship,
लिव्ह-इन नात्याची वैधता आणि वारसाहक्क…
Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय
Savitribai Khanolkar Marathi name for designing the Param Vir Chakra award
सावित्रीबाई खानोलकर… परमवीर चक्र पुरस्काराचं डिझाईन करणारं मराठमोळं नाव
Seven girls from a normal family will now study in IIT
सामान्य घरातील ‘त्या’… आता शिकणार ‘आय.आय.टी.’त!
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
What do you mean our relationship is a little beyond friendship
आमचं नातं ‘मैत्रीच्या थोडंसं पुढचं’ आहे म्हणजे काय?

हेही वाचा >> “पापी माणसांच्या पोटी मुलगी जन्माला येते”, असं म्हणणाऱ्यांच्या घरात मुलगी जन्माला आली, अन्….

स्वंयपाक झाल्यावर ओटा स्वच्छ पुसूनही ठेवला. आठवड्याभराचे राहिलेले कपडे मशिनला लावून घरात केरकचरा काढला. फरशी पुसून लख्ख केली. माझी साडी, ब्लाऊज, परकरही बेडरुममध्ये व्यवस्थित एका जागी ठेवलं. सणावाराला घालायचे दागिने लॉकरमधून काढून एका जागी नीट ठेवले. मेकअपचं साहित्यही व्यवस्थित लावून ठेवलं. मला या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं. नवरा एवढा कसा काय सुधारला? उगीच आपण आपल्या जोडीदाराला नावं ठेवत बसलो असं वाटलं. मी आपली आयती साडी नेसून मेकअप करून वडाची पूजा करायला खाली उतरले. माझ्या गळ्यातील दागिने पाहून इतर बायकांनाही हेवा वाटला. दागिन्यांपेक्षाही माझ्याबरोबर माझा नवरा वडाची पूजा करायला आला हे पाहून त्या हरखूनच गेला. सगळं काही दृष्ट लागण्यासारखं घडत होतं. मला एका क्षणाला वाटलं घरी जाऊन आधी नवऱ्याची दृष्ट काढावी. असा नवरा पुढची सात जन्म मिळाला तर माझं भाग्य फळफळेल. याच्यावर अशीच कृपादृष्टी ठेव असं देवाकडे मनोमन इच्छा व्यक्त केली.

वडाची पूजा करून आल्यावर नवराच म्हणाला की, “आता जरा आराम कर. मी स्वयंपाक करून ठेवलाय. वेदांतला मी जेवण वाढतो. तू हवंतर एक झोप काढ. तुझ्यासाठी काही फराळ करू का? भूक लागली असेल नै!” साधा चहाही स्वतःच्या हाताने कधीच न घेणारा नवरा आज एवढी सेवा का करत असेल असा प्रश्न पडला. पण त्याच्या वागण्यात कुठेच संशयास्पद काही जाणवलं नाही. तो जे काही करतोय ते अगदी मनापासून करतोय असं वाटलं. त्यामुळे त्याच्या वागण्यावर संशय घ्यायचा म्हणजेच आपण आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. म्हणून मी फक्त त्याची हालचाल डोळ्यांत साठवून ठेवू लागले. त्याने वेदांतला जेवणं वाढलं, स्वतःचंही जेवण वाढून घेतलं. वेदांतला तो भरवू लागला. आतापर्यंत त्याने फार कधी वेदांतला भरवलं नव्हतं. पण, आज प्रेमाने जवळ घेऊन तो वेदांतलाही भरवत होता. हे सगळं डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखं होतं.

हेही वाचा >> पत्नीची आई झाल्यानंतर नवऱ्याने जोडले विवाहबाह्य संबंध, पतीच्या दुसऱ्या लग्नाआधीच असे तोडले बाशिंग!

हे सगळं सुरू असतानाच अचानक दारावची बेल वाजली. बराच वेळ बेल वाजत राहिली. माझं लक्षच नव्हतं. मग अचानक जाग आली आणि पाहिलं तर आजूबाजूला सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. वेदांत आणि नवराही झोपून होता. लगबगीने दार उघडलं तर शेजारच्या ताई वडाची पूजा करायला जाण्यासाठी बोलवायला आल्या होत्या. त्यांनी माझं बुरसं तोंड पाहून, “बाई गं, हिला माहित नाही की काय आज वटपौर्णिमा आहे. ९ वाजले तरी झोपतेस कसली? आता आवरून सगळं कधी आणि कसं करणार आहेस?” अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मला काहीच सुचत नव्हतं. कान्या डोळ्याने किचनकडे पाहिलं तर तिथंही काहीच नव्हतं. नवऱ्याने जे काही करून ठेवलेलं ते स्वप्नात केलेलं. मी त्या दिव्यस्वप्नातून बाहेर आले, शेजारच्या ताईंना म्हटलं, “तुम्ही पुढे व्हा, मी आलेच लगेच.”

ताई गेल्यावर भानावर आले. नवऱ्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. दीर्घायुष्य आणि साताजन्माची साथ मिळावी म्हणून आपणच राबराब राबायला हवं. नवऱ्यांना मात्र असं काही वाटत नाही. आणि वाटलं तरीही बायकोला आराम मिळावा म्हणून ते स्वतःची झोपमोड करून मदतीला काही येणार नाहीत! त्यामुळे नवऱ्याला घरकामं करताना पाहण्यासाठी स्वप्नच पाहावी लागणार आहेत! मनातल्या मनात अशीच काहीबाही कीरकीर करत नवऱ्याची साताजन्माची साथ मिळावी म्हणून वडाची पूजा एकदाची उरकून आले. पण स्वप्नात पाहिलेला नवरा हवा गं बाई अशी इच्छाही वडाजवळ व्यक्त केली!

-अनामिका