Vinesh Phogat : गावची खेळाडू सून राजकीय आखाड्यात; विनेश फोगटच्या सासरची मंडळी म्हणतात, “तिच्या लग्नावेळी…”

Vinesh Phogat : हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बलाली गावातील मूळ रहिवासी असलेल्या फोगटने २०१८ मध्ये सोमवीर राठी यांच्याशी लग्न केलं. सोमवीर यांचे वडील राजपाल राठी हे माजी सैनिक असून ते २००० ते २००५ या काळात गावचे सरपंच होते.

Vinesh Phogat Fielded in Hariyana Julana Constistency
विनेश फोगटला उमेदवारी मिळाल्यानंतर ग्रामस्थांकडून जल्लोष ( (Express photos by Amit Mehra & Jasbir Malhi)

Vinesh Phogat VidhanSabha Election : हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघात कुस्तीपटू विनेश फोगटला काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातील बख्ता खेरा गावात तिचं सासर आहे. त्यामुळे तिच्या उमेदवारीमुळे तिच्या सासरच्या लोकांमध्ये प्रचंड आनंद अन् उत्साह संचारला आहे. विनेश फोगटमुळे महिलांना राजकारणात येण्यासही प्रोत्साहन मिळेल असं येथील महिला सांगतात. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने या गावात फेरफटका मारून ग्रामस्थांशी चर्चा केली.

हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बलाली गावातील मूळ रहिवासी असलेल्या फोगटने २०१८ मध्ये सोमवीर राठी यांच्याशी लग्न केलं. सोमवीर यांचे वडील राजपाल राठी हे माजी सैनिक असून ते २००० ते २००५ या काळात गावचे सरपंच होते. कुस्तीचा सराव करता यावा म्हणून त्यांच्या कुटुंबाने काही वर्षांपूर्वी शेजारच्या सोनीपत जिल्ह्यातील खारखोडा शहरात नवे घर घेतले होते. पण त्यांचं मूळ गाव बख्ता खेरा हेच आहे. जाट बहुल पट्ट्यात वसलेलं या गावात फक्त २५०० लोकसंख्या आहे. या छोट्याशा गावातील सूनेने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारल्याने गावातील लोकांना तिचा प्रचंड आदर आणि अभिमान आहे. ती आज या गावाला भेट देणार असल्याने तिच्या भेटीसाठी सर्वच ग्रामस्थ आतुर झाले आहेत.

china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा…
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
Who is Alvarado gill
Who is Marie Alvarado-Gil : दोनवेळा झाला कर्करोग, विशेष गरजा असलेल्या मुलांची आई; सहकऱ्याकडून लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या मेरी अल्वारिडो गिल कोण?
Indian-born entrepreneur linked to deadly pager blasts in Lebanon
Who is Rinson Jose: लेबनान पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन! भारतीय वंशाचा ‘हा’ नागरिक चर्चेत येण्याचं कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!

हेही वाचा >> Vinesh Phogat Join Congress: विनेश फोगट, बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशामुळे सत्ताधारी भाजपाला धक्का; हरियाणात सत्तांतार होणार?

राठी समुदायाकडून मिळणार सुवर्ण पदक

“विनेश फोगटची एक झलक पाहण्यासाठी मी आधीच एक जागा निश्चित करून ठेवलीय”, असं ७० वर्षीय बिमला देवी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. आजींच्या या उत्साहातूनच विनेशबद्दलचा आदर स्पष्ट होतोय. या भेटीत राठी समुदायाकडून फोगटला १०० ग्राम सुवर्ण पदक देऊन सन्मानित करणार आहेत. तर चौगामा समुदायाकडून तिला १.८१ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

बख्ता खेरा येथील सरपंच पूनम राणी यांच्या घरी महिलांचा एक गट जमला होता. त्यावेळी पूनम म्हणाल्या की, “विनेश आमदार झाली तर खेड्यातील मुली आणि महिलांना एक संदेश जाईल की त्याही खेळ आणि शिक्षणाव्यतिरिक्त राजकारणात येऊ शकतात. यामुळे महिलांना नवा आत्मविश्वास मिळेल. बख्ता खेरा गाव आधी कोणीही ओळखत नव्हते. पण आता संपूर्ण देशाला कळलंय की हे गाव हरियाणाच्या नकाशावर आहे. हे सर्व विनेशमुळेच शक्य झालंय.”

तिच्या अपात्रतेचा बदला घ्यायचाय

गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी तिच्या अंतिम सामन्यापूर्वी फोगट अपात्र ठरली होती. ५० किलो वजनी खेळात तिचं १०० ग्रॅम अधिक वजन वाढल्याने तिला अंतिम सामना खेळता आला नव्हता. याबाबत तिचा पती सोमवीर राठी म्हणाले, “विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले होते. आता मतदारांना त्याचा बदला घ्यायचा आहे.”

ती राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं

फोगटच्या उमेदवारीबाबत तिचे सासरे राजपाल राठी म्हणतात, तिच्या लग्नाच्या वेळी आम्हाला वाटले होते की ती आता एक दिवस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकेल. पण ती राजकारणात उतरून नाव कमवेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. स्वच्छ राजकारणावर आमचा विश्वास आहे.

जुलाना मतदारसंघाची पार्श्वभूमी काय?

ग्रामीण जुलाना मतदारसंघ हा चौटालांचा बालेकिल्ला आहे. २००९ आणि २०१४ मध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या नेतृत्त्वाखालील INLD ने या जागेवर विजय मिळवला होता. २०१९ मध्ये INLD फुटल्यानंतर फुटलेल्या JJP गटाने मतदारसंघावर कब्जा केला. २००० आणि २००५ मध्ये काँग्रेसने ही जागा शेवटची जिंकली होती. आता विनेश फोगटच्या निमित्ताने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, हरियाणात ५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinesh phogat village player daughter in law in the political arena says vinesh phogats in laws sgk

First published on: 08-09-2024 at 11:01 IST

संबंधित बातम्या