संदीप चव्हाण

सावकाश विरघळणारी घन स्वरूपातील खते झाडांना वरचे वर देणे गरजेचे आहे. तसेच बागेतील रोपांना द्रावणयुक्त खतेही देणे महत्त्वाचे व गरजेचे असते. कारण ती ताबडतोब लागू होतात. विशेषत: फळे, फुले धरण्यासाठी, फुलगळती होऊ नये यासाठी ही द्रावणयुक्त खते गरजेची आहेत. ही फक्त द्रव नसून ते झाडांसाठी संजीवनी देणारी आहेत, म्हणून त्यास संजीवक असे म्हणतात. त्याद्वारे मातीची उपजावू क्षमता वाढते. म्हणजे मातीत जीवाणू संख्या ताबडतोब वाढते तसेच उपयुक्त जीवाणू कार्यरत होतात. कालांतराने नष्ट होतात. व त्यांचेच अतिसूक्ष्म स्वरूपात जैव खत तयार होते. या नैसर्गिक चक्रामुळे झाडांना वेळोवेळी पोषण मिळते व झाडे टवटवीत होतात, बहरतात. ही संजीवके घरच्या घरी व साध्या-सोप्या पद्धतीने तयार करता येतात.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?

खरकट्या पाण्याचे आबंवण

– खरकटे अन्न, हिरवा कचरा, खरकटे पाणी (साबण लावण्यापूर्वी भांडी धुण्याचे पाणी) हे आवश्यक तेवढ्या प्रमाणात ३ ते ५ दिवस एका डस्टबिनमध्ये साठवून ठेवावे. त्यावर झाकण ठेवणे आवश्यक आहे. तिसऱ्या दिवसापासून यास आंबट वास येतो अर्थात ते फरमेंट होते. जसे आपण इडली, अनारसेसाठी तांदूळ भिजवतो तसा सौम्य आंबट गंध येतो. त्यातील जाडाभरडा कचरा, काड्या काढून ते एखाद्या कुंडीत, वाफ्यात वरचेवर टाकता येतो. तो रोपांना मिल्चग म्हणून उपयोगात येतो. या पाण्यात आणखी तेवढेच साधे पाणी मिसळून ते द्रावण झाडांना द्यावे. या आंबट द्रावणास एन्जाईम असे म्हणतात. हे अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे ५ ते १० कुंड्यांपासून मोठ्या बागेसाठीही तयार करता येते. यात मसाल्याच्या रस्सेदार भाज्या, वरण, पिठले, ताक, तिखट, सुकी भाजीही मिक्स करता येते. त्याने मातीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. मातीतील गांडुळासाठी अन्न म्हणूनही त्याचा उपयोग होतो. एन्जाईम हे जमिनीच्या पचन क्षमतेनुसार द्यावे. म्हणजे सुरुवातीस अर्धा कप, पेलाभर, तांब्याभर असे प्रमाण दर आठवडा-पंधरा दिवासांतून एकदा देता देता त्याचे प्रमाण वाढवत जावे. हे आंबट द्रावण गरजेनुसारही तयार करता येते. हे पाणी म्हणजे गायीच्या शेणयुक्त द्रावणास (स्लरीस) उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा >>> आहारवेद: उत्साहवर्धक नारळ

भाजीपाला उत्पादनात पिकाची वाढ ही बाब महत्त्वाची आहे. म्हणून पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी जशी संजीवके उपयोगी पडतात त्याप्रमाणे वाढीचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतात म्हणून त्यांना झाडाची वाढ नियंत्रके, असें संबोंधलें जाते.

पिकांच्या वाढीवर आणि अतर्गत क्रियेवर नियंत्रणठेवण्याचे कार्थ ही संजीवके करतात. संजीवके हो नैसर्गिकरीत्या पिकामध्ये सूक्ष्म प्रमाणात असतात; परतु बाह्य वापरामुळे हे प्रमाण वाढविता येते. असे केल्यास त्याचे दृश्य परिणामत: पिकांची जोमदार वाढ इत्यादीमध्ये दिसून येते. पिकांवर संजीवके केव्हा वापरली आहेत, याची नोंद ठेवावी.

sandeepkchavan79@gmail.com