सुचित्रा प्रभुणे
वायनाडमध्ये सध्या चर्चेत असलेले ‘स्तनपान’ कोणतीही सामाजिक मोहीम नसून, वायनाड मदतकेंद्रात स्तनपान करून तेथील अनेक तान्हुल्या बाळांची भूक शमविणाऱ्या भावनाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

नुकत्याच झालेल्या वायनाड भूस्खलन घटनेने देशाला फार हादरवून टाकले आहे. आजची रात्र ही काळरात्र ठरणार आहे याची पुसटशी कल्पनाही तेथील गावकऱ्यांना नव्हती. सारे गावकरी गाढ झोपेत असतानाच रात्री होत्याचे नव्हते झाले. भूस्खलन झाले नि कित्येक माणसे त्यात गाडली गेली. मरण पावली. या घटनेची वार्ता समजताच तातडीने शोध कार्यास सुरुवात झाली. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन सरकार बरोबर अनेकांनी या मदतकार्यास आर्थिक व भौतिक पातळीवर मदत केली असेल. पण जी तान्हुली बाळे आहेत त्यांचे काय? त्यांना कोण खाऊ-पिऊ घालणार? महत्त्वाचे म्हणजे मातेचे दूध पुरविणार तरी कसे? तेलंगणा राज्यातील इडूकी जवळील उपुथारा येथे राहणाऱ्या भावना यांच्या मनात हा विचार आला आणि तिची घालमेल वाढू लागली. तिला स्वत:ला चार महिन्याचे बाळ असून चार वर्षांची मुलगीदेखील आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊन तेथील आई हरविलेल्या बाळांसाठी स्तनपान दिले तर त्या बाळांना खूप फायदा होईल असा विचार या तरुण माऊलीच्या मनात आला.

Ratan Tata's Nephew Maya Tata is an inspirational woman
रतन टाटांची पुतणी सांभाळतेय डबघाईला आलेला व्यवसाय; नव्या जनरेशनला प्रेरणादायी ठरलेल्या माया टाटा कोण?
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Vinesh Phogat Final Match Paris Olympic
Vinesh Phogat Olympics : विनेश फोगटची संघर्षमय कहाणी; आई ३२ व्या वर्षी विधवा, कर्करोग आणि समाजाशी एकटीने दिला लढा
Many women away from the Ladaki Bahine scheme as they are unable to complete the paperwork
…आम्ही योजना लाभापासून दूरच!
only child, parenting, parents, child,
दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!
about Kumud flowers of course Rajas lotus
निसर्गलिपी : कमोदिनी काय जाणे परिमळ
Paris Olympics 2024: From Manu Bhaker to Simone Biles, 5 women who defied the odds New era for women in sport
Paris Olympics 2024: बाईपण भारी देवा! कुणी गरोदर, तर कुणाचं तान्हं बाळ; ऑलिम्पिकमध्ये ‘या’ महिलांच्या कामगिरीमागचा संघर्ष एकदा वाचाच…
mukesh ambani reliance company total of 98 employees availing maternity leave from the previous year
Reliance: मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये २१ टक्के महिला कर्मचारी, तर ‘इतक्या’ महिलांनी घेतला मॅटर्निटी लिव्हचा फायदा; नव्या कर्मचाऱ्यांमध्येही तरुणींचा सहभाग अधिक

हेही वाचा : Paris Olympics 2024: बाईपण भारी देवा! कुणी गरोदर, तर कुणाचं तान्हं बाळ; ऑलिम्पिकमध्ये ‘या’ महिलांच्या कामगिरीमागचा संघर्ष एकदा वाचाच…

आई हरविलेल्या बाळांच्या काळजीने भावनाची झालेली अवस्था पाहून तिच्या नवऱ्याने- साजिनने वायनाड मदत केंद्रात संपर्क साधला आणि आपण कोणत्या प्रकारची मदत करण्यास उत्सुक आहोत हे सांगितले. त्यांचे ते काम ऐकून त्यांना ताबडतोब तिथे येण्यास सांगितले. आपल्या गावापासून ते वायनाड पर्यंतचा ४०० किमी.चा टप्पा स्वत:च्याच जीपने पार करून भावना व साजिन आपल्या मुलांसह मेपेडी येथे पोहचले. तिथे गेल्यावर त्यांनी तेथील कॅम्प आणि वस्तीगृहांना भेट दिली आणि सहा महिन्यांपेक्षा लहान असलेल्या बाळांना तिने स्तनपान दिले. काही बाळांच्या माता जखमी अवस्थेत होत्या. जो पर्यंत या माता बऱ्या होऊन येत नाहीत, तोपर्यंत तिने त्या बाळांना आपले स्तनपान देत होती. इतकेच नाही तर ज्या ज्या बाळांना देखभालीची गरज होती, त्यांची देखभालदेखील हे दाम्पत्य अत्यंत आपुलकीने करीत होते.

भावना सध्या जरी गृहिणी म्हणून कार्यरत असली तरी लग्नाच्या आगोदर ती एका नर्सरीमध्ये कार्यरत होती आणि त्यानंतर तिने काही काळ पब्लिक स्कूलमध्ये काम केले होते. शिवाय पदरी दोन लहान मुले असल्यामुळे मुलांची मानसिकता काय असते याची तिला जाणीव होती. वायनाड दुर्घटनेचे वर्तमानपत्रातून फोटो पाहिल्यानंतर, त्यातही लहान बाळांचे फोटो पाहिल्यानंतर अचानक तिला जाणविले की, इतरांना अन्न-पाणी मिळू शकते, पण या बाळांचे काय? या बाळांसाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा होती. आपण यांना स्तनपान देऊ शकतो, हा विचार तिच्या मनात आला आणि तसा तो तिने नवऱ्याला बोलून दाखविला. त्यालादेखील तिचा विचार पटला आणि ताबडतोब त्यांनी वायनाड मदतकेंद्राला संपर्क साधून आपण कोणत्या प्रकारची मदत करण्यास उत्सुक आहोत हे सांगितले. त्यांची ही आगळी-वेगळी, पण खरोखरीच उपयुक्त असलेली मदत लक्षात घेऊन त्यांना ताबडतोब तिथे येण्यास सांगितले. साजिन हे स्वत: पिक-अप चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ते स्वत:ची जीप घेऊनच वायनाड येथे पोहचले.

हेही वाचा : अचूक लक्ष्यवेध साधणाऱ्या ‘त्या तिघीं’च्या संघर्षाची कहाणी

भावना आणि साजिन या तेलगु दाम्पत्यांची ही मदत निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. कारण फक्त पैसे देऊनच मदत करता येते, हा भ्रम या निमित्ताने दूर झाला. तसे पहिले तर हे दाम्पत्य सर्व सामान्य कुटुंबासारखेच आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती ओढविते, तेव्हा बऱ्याच संवेदनशील माणसांच्या मनात तेथील मदतकार्यात सहभागी होण्याची इच्छा असते. पण बऱ्याचदा आपल्याकडे तितका पैसा नाही म्हणून किंवा आपण काय करू शकतो असा विचार करतच मदत करण्याचा विचार बारगळतो. पण भावना आणि साजिनने मात्र इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो, याचे उदाहरण आपल्या अनोख्या कृतीतून समजासमोर ठेवले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आणि तितकेच प्रेरणादायी आहे.