परवा डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा प्रवास एसी लोकलने करत होतो, सकाळी लवकरची लोकल असल्यामुळे गर्दी फारशी नव्हतीच, विंडो सिट मोकळी होती. जाऊन निवांत बसलो आणि हेडफोन्स लावून गाणी ऐकत कधी डुलकी लागली ते समजलंच नाही. ठाणे गेल्यानंतर अचानक दोन मुलींचे खिदळण्याचे आवाज ऐकू आले आणि लोकलमधल्या डुलकीचं खोबरं झालं. जरा डोळे वर करून पाहिलं तर बाजूला दोन मुली एक कॉलेजमधली आणि एक नोकरी करणारी म्हणजे साधारण २५ – ३२ या वयोगटातील असतील, त्या एकमेकींशी अगदी खिदळून गप्पा मारत होत्या.

अर्थात हे सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याने इथे कुणाला काही शिकवायला जायचं नाही हा चंग आधीपासूनच मनाशी बांधला होता आणि त्यातून स्त्रियांना तर शिकवायला अजिबात जायचंच नाही. त्या दोघींनी त्यांचा तो वार्तालाप ट्रेनमध्ये चढल्यावर जो सुरू केला तो पाहता माझ्या लक्षात आलं की यामध्ये आपली झोपही व्हायची नाही आणि गाणीदेखील धड ऐकता येणार नाहीत त्यामुळे मी गुपचूप हेडफोन काढून ठेवले आणि त्या दोन युवतींच्या गप्पा मी एक प्रामाणिक श्रवणीय श्रोता म्हणून ऐकू लागलो.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

आणखी वाचा : ती वेडी तर नाही ना?

ते ऐकताना खरंच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, स्त्रिया या कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकतात आणि त्यांचे विषयसुद्धा इतक्या चटकन बदलतात की आपल्याला याआधी सुरू असलेला विषय कुठे संपला आणि नवीन विषय कुठे सुरू झाला तेदेखील कळत नाही. अर्थात मी या गोष्टीकडे एक चांगला गुण म्हणूनच पाहातो. यामध्ये कोणत्याही स्त्रीला स्टेरिओटाइप करायचा माझा हेतू नाही. माझ्या निरीक्षणात जी गोष्ट आली तीच फक्त मी मांडतो आहे. दोन माणसांना जोडणारा मुख्य दुवा असतो तो म्हणजे संभाषण आणि यामध्ये स्त्रियांचं पारडं चांगल्या अर्थाने कायम जड असतं आणि राहील. एकमेकींची चौकशी करण्यापासून थेट एकमेकींच्या लांबच्या नातेवाईकांच्या खासगी आयुष्याबद्दल तितका रस घेऊन त्याविषयी चर्चा करणं आणि त्यावर आपले अनुभव मांडणं एवढा अवाका पुरुषांच्या बाबतीत अजिबात नाही.

तुम्ही कधीही निरखून ट्रेन किंवा बस मधून प्रवास करणारे दोन मित्र आणि दोन मैत्रिणी यांच्यातला संभाषणाचा पॅटर्न बघा. त्याच्यात बरीच तफावत तुम्हाला जाणवेल. दोन पुरुष जेव्हा गप्पा मारतात तेव्हा ते फारफार तर १५ ते २० मिनिटं बोलतात त्यातही ते बऱ्याचदा थांबतात, आजूबाजूच्या वातावरणाचा आढावा घेतात. त्यांचे विषय हे नोकरी, घरदार, संसार इथपासून थेट देशाचं अर्थकारण, लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग इथवर पोहोचतात. पण यातल्या एकाही विषयावर ते सलग १५ मिनिटंही बोलत नाहीत. जेव्हा दोन स्त्रिया गप्पा मारतात तेव्हा त्यांचं विश्व जरी आपल्याला छोटं वाटत असलं तरी त्यात त्यांच्याकडे बोलायला बरंच काही असतं. त्यांचं विश्व हे त्यांच्यापुरतंच मर्यादित असलं तरी त्यावर चौफेर नजर फिरवून विचार करून बोलणं हे फक्त तुम्हाला दोन स्त्रियांच्या संभाषणातच जाणवेल. अर्थात त्यामागे कारणंही तशीच आहेत. घरातली एखादी स्त्री ही एकावेळेस फक्त घर नाही तर त्या घराला घरपण देणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघत असते. म्हणूनच आपल्याला जरी ती क्षुल्लक गोष्ट वाटत असली तरी त्यावर बोलणं किंवा व्यक्त होणं ही त्यांची मानसिकता आहे. आपण सरसकट त्याला गॉसिप म्हणून लेबल चिकटवतो. ही गोष्ट स्त्रियांना उपजतच परमेश्वराने दिली आहे असं माझं ठाम मत आहे, कारण आपल्याला निरर्थक वाटणाऱ्या त्या गप्पा हीच त्यांच्यासाठी एक थेरपी असते. यामध्ये खरंतर सगळ्याच स्त्रिया आल्या. नोकरदार स्त्री असो, गृहिणी असो किंवा कॉलेजवयीन तरुणी असो त्यांच्यासाठी ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे जितकी पुरुषांसाठी एकांत किंवा शांतता.

आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

अर्थात हे माझं मत झालं. नियमाला अपवाद असतो तसंच ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत लागू होईलच असं नाही. याच्याही उलट टिपिकल स्त्रिया, आपल्या भाषेत ‘गॉसिप’ करणाऱ्या स्त्रियाही आपल्याला पाहायला मिळतात. मी फक्त मला आलेल्या अनुभवावरून दोन स्त्रियांच्या गप्पांमागचं हे निरीक्षण मांडायचा प्रयत्न केला. पोटभरून गप्पा झाल्यानंतर त्या दोघी एका स्टेशनला उतरल्या आणि त्यांच्या तिसऱ्या मैत्रिणीला भेटल्या, गप्पा अखंड सुरूच होत्या आणि मग गाडी सुटल्यावर मी पुन्हा डुलकी काढायचा प्रयत्न केला पण त्या २० – २५ मिनिटांत माझी झोप पूर्णपणे उडाली होती. ‘अगंबाई अरेच्या’मधल्या संजय नार्वेकरने जे अनुभवलं आहे ते मी तेवढ्या कालावधीत अनुभवलं आणि खरंच या गोष्टीत धन्यता मानली की पुरुषांना बायकांच्या मनातलं कळत नाही किंवा ऐकू येत नाही ते एकाअर्थी बरंच आहे.