श्रेया अगरवाल

फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलीवूड वाइव्ह्जया नेटफ्लिक्स शोच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्याच भागात महीप संधू, सीमाखान,नीलम कोठारी सोनी व भावना पांडेया चौघी मेनापॉजबद्दल जाणून घेण्यासाठी गायनॅकोलॉजिस्टकडे गेलेल्या दाखवल्या आहेत. वयपरत्वे स्त्रियांचा सेक्समधील रस कमी होतो हा विषय चर्चेला आला असता डॉक्टर ‘डिझायनरवजायना’ ही संकल्पना त्यांना सांगतात.अर्थात अनेक स्त्रिया वयामुळे सैल झालेला योनीमार्ग(व्हजायना)टाइट करून घेण्यासाठी येत असल्या तरी आपल्याला ‘डिझायनर व्हजायना ‘ ही संकल्पना पटत नाही, असे स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅपरोस्कोपी सर्जन डॉ.किरण कोएल्हो त्यांना सांगतात.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

डिझायनर व्हजायना म्हणजे नेमके काय?

तर‘लॅबियाप्लास्टी’ नावाच्या सर्जिकल प्रोसिजरसाठी वापरली जाणारी ही फॅन्सी संज्ञा आहे. या प्रक्रियेत, योनी मार्गाच्या मुखाच्या दोन्ही बाजूला असलेल्या लॅबिया मिनोरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्वचेच्या झडपांचे आकारमान कमी केले जाते,” असे अहमदाबाद येथील शॅल्बी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ.स्वाती चिटणीस यांनी सांगितले. लॅबियाच्या उती काढून त्यांचे आकारमान कमी करण्यासाठी व त्यायोगे त्या जागेचे अवघडलेपण कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते,असेही त्या म्हणाल्या.

नारायणा हेल्थ सिटीतील कन्सल्टण्ट प्लास्टिक सर्जन डॉ.मयूर शेट्टी म्हणाले की, बाळंतपण आणि वाढते वय यांमुळे लॅबिया उकलल्यासारख्या, सैल होतात. लॅबिया प्लास्टीमध्ये लॅबियाचेआकारमान कमी केले जाते आणि त्याचबरोबर गरज भासल्यास आम्ही आजूबाजूच्या भागातही मेदाचे प्रत्यारोपण (फॅटग्राफ्टिंग) करून तो पुनरुज्जीवित करतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जरीने (आयएसएपीएस) २०१७साली प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जगभरात होणाऱ्या लॅबिया प्लास्टींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

“२०१९ मध्ये जगभरात झालेल्या लॅबिया प्लास्टींची संख्या १, ६४, ६६७ एवढी होती. २०१८मध्ये झालेल्या शस्त्रक्रियांच्या तुलनेत ही संख्या २४.१ टक्के अधिक होती, तर २०१५ सालाच्या तुलनेत ही वाढ ७३.३ टक्के अधिक होती. २०१९सालात स्त्री रुग्णांवर करण्यात आलेल्या प्लास्टिक सर्जरी प्रक्रियांमध्ये लॅबिया प्लास्टी लोकप्रियतेच्या बाबतीत १५व्या क्रमांकावर होती, असे इंटरनॅशनल जर्नल ऑफ इम्पोटेन्स रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या आणखी एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

लॅबिया प्लास्टी का केली जाते?

लॅबियाप्लास्टी किंवा ‘डिझायनर व्हजायना’चा प्रवाह जगभरात वाढील लागलेला असताना, एका गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो म्हणजे स्त्रिया लॅबिया प्लास्टी का करवून घेतात? पोर्नोग्राफीआणि लैंगिक सुखात वाढ करण्यापासून ते विशिष्ट वैद्यकीय अवस्थेपर्यंत अनेक घटक या शस्त्रक्रियेच्या लोकप्रियतेमागे आहेत. सौंदर्यवर्धन अर्थात कॉस्मेटिक कारणे या सर्जरीच्या केंद्रस्थानी आहेत,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “लॅबिया प्लास्टीमुळे योनीमार्ग अधिक सुंदर दिसतो आणि लैंगिक सुख अधिक मिळते,” असे मिलान हॉस्पिटल्समधील कन्सल्टण्ट स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ.वनजा शिवकुमार यांनी सांगितले.

‘अनेक गर्भारपणे किंवा वाढते वय यामुळे लॅबियामध्ये झालेलेबदल पूर्वपदावर आणण्याची इच्छा असलेल्या स्त्रिया जननेंद्रियांचे पुनरुज्जीवन करून घेतात,’असे डॉ.शेट्टी यांनी सांगितले.

प्राध्यापक रुथ हॉलिडे यांनी त्यांच्या’बॉडी, मायग्रेशन, रिकन्स्ट्रक्टिव सर्जरीज:मेकिंग द जेंडर्ड बॉडी इन अ ग्लोबलाइझ्ड वर्ल्ड’ या पुस्तकात व्हर्जिनिया ब्राउन यांचा एक युक्तिवादमांडला आहे. तो म्हणजे पोर्नोग्राफी मध्ये केवळ एकाच प्रकारचा योनीमार्ग दाखवला जातो. छोटा. केस नसलेला, लॅबियामाजोराच्या आत सुबकपणे घट्ट बसलेला योनीमार्ग.

ब्राउन यांच्या मते, पोर्नोग्राफी पाहून बहुसंख्य स्त्रियांच्या मनात त्यांच्या स्वत:च्या योनीमार्गाबद्दल तीव्र नावड निर्माण होते आणि त्या जननेंद्रियांच्या शस्त्रक्रियेचा विचार एक पर्याय म्हणून करू लागतात. मात्र, अन्य काहींच्या मते, स्त्रिया आपल्या शरीरातील इंद्रियांबद्दल जागरूक होत असल्यामुळे लॅबियाप्लास्टींची संख्या वाढण्यासारखे प्रवाह दिसत आहेत. “योनीमार्गाचे आरोग्य हा विषय अनेक पिढ्यांपासून लपवून ठेवण्याचाच होता. स्त्रियांच्या जननेंद्रियांची काळजी घेणाऱ्या प्रक्रिया किंवा पर्याय उपलब्धच नव्हते,”असे मत प्राध्यापक डॉ.ज्युलियाना हान्सेन यांनी एका स्त्रियांच्या आरोग्यावरील मासिकात व्यक्तकेले होते.डॉ.चिटणिसयांच्या मतेही,“लैंगिकस्वास्थ्य,आपलेदिसणे व काही वेळा आरोग्यही,सुधारण्याच्यासाधनांपैकी एक म्हणून ही प्रक्रिया स्त्रियांमध्ये लोकप्रिय होत आहे.”

आरोग्याचा विचार करता, लॅबिया प्लास्टी किंवा डिझायनर व्हजायना वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे?

“लॅबिया हायपर ट्रॉफी नावाच्या एका वैद्यकीय अवस्थेचा सामना करणाऱ्यांवर ही सर्जिकल प्रक्रिया नेहमीच केली जाते. यामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे त्वचेची अतिरिक्त वाढ होते. त्याचप्रमाणे काही जन्मजात समस्या आणि जुन्या झालेल्या युरिनरी इन्फेक्शनवर उपचार म्हणूनही ही सर्जिकल प्रक्रिया केली जाते, असे डॉ.चिटणीस यांनी सांगितले. काही स्त्रियांना योनी मार्गाच्या मुखाशी अतिरिक्त त्वचा असते आणि ही अतिरिक्त त्वचा घासली जाऊन किंवा दुमडली जाते. यामुळे खेळताना, अॅथलेटिककृतींदरम्यान किंवा जवळिकीच्या वेळेस अवघडलेपण निर्माण होऊ शकते, असेही डॉ.चिटणीस यांनी स्पष्ट केले.

अति विकसित लॅबियामुळे स्त्रियांचा योनीमार्ग कोरडा पडू शकतो किंवा लैंगिक संबंधांतून समाधान मिळू शकत नाही हे वैद्यकीयदृष्ट्या दिसून आले आहे, असे डॉ.शेट्टी यांनीही नमूद केले. २०२२ सालातील ‘डिझायनर वजायना’च्या कळसाला पोहोचलेल्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण दिले जाते. प्रख्यात प्लास्टिक सर्जन जॉन स्केवो फिलॅक्सयांच्या मते,घट्ट लेगिंग्ज व अॅक्टिववेअरमुळे डिझायनर व्हजायनासाठी शस्त्रक्रिया करवून घेण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.

“व्यायामाचेकपडे थोडे घट्टच असतात आणि ते या भागावर दबाव टाकतात,”असे त्यांनी ‘मेल ऑनलाइन’ला सांगितले. “या कपड्यांमुळे योनी मार्गाच्या भागात वेदना होतात, अवघडलेपणनिर्माण होते, त्वचा दुमडली जाते आणि अनेक स्त्रियांना अत्यंत त्रासदायक वाटते. त्यामुळे त्या अशा प्रकारचे कपडे घालणेच टाळतात. हे सगळे परस्परांशी जोडलेले आहे. लेगिंग्जमुळे योनीमार्गाच्या भागात अवघडलेपण येते आणि लॅबियाकडे लक्षही वेधले जाते. त्यामुळे लॅबियाप्लास्टी करवून घेण्याचे प्रमाण वाढते.”

प्लास्टिक सर्जन डॉ.रिचर्ड स्विफ्ट यांनी तर २०१५ सालीच’द पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत हे कारण नमूद केले होते. तेम्हणाले होते,“सगळीकडे सगळेजण घालत असलेल्या योगापॅण्ट्समुळेच लॅबिया प्लास्टीचाट्रेण्ड जोरात आहे.”

संभाव्य धोके

लॅबिया प्लास्टीशी निगडित धोके व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डॉ. शिवकुमार यांच्या मते, प्रादुर्भावव भूल याच्याशी निगडित गुंतागुंती हे संभाव्य साइड-इफेक्ट्स आहेत. योनीमार्ग संवेदनशील होणे किंवा अतिरिक्त ओरखडे येणे असे आणखी काही धोके डॉ.चिटणीस यांनी सांगितले. याशिवाय, काही विशिष्ट गटातील स्त्रियांनी ‘डिझायनर व्हजायना’चा पर्याय टाळावा, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

“लॅबियाप्रौढ वयातही विकसित होत राहतो हे तथ्य पाहता, १८वर्षांखालील मुलींनी लॅबियाप्लास्टीचा विचार करू नये,”असे डॉ.चिटणीस म्हणाल्या. शरीरात प्रत्यारोपित अवयव (इम्प्लाण्ट्स)असलेल्या, हृदयविकारी किंवा अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांनी ही शस्त्रक्रिया टाळावी,असे डॉ.शिवकुमार यांनी सांगितले.

धूम्रपानाची सवय असलेल्यांनाही ही सर्जिकल प्रक्रिया मानवणारी नाही. “धूम्रपानाची सवय असलेल्यांना लॅबिया प्लास्टी करायचीच असेल, तर शस्त्रक्रियेपूर्वी वशस्त्रक्रिये नंतर ४ आठवडे धूम्रपान पूर्णपणे बंद ठेवणे अत्यावश्यक आहे,”असे डॉ.शेट्टी यांनी सांगितले.

मानसिक स्वास्थ्याच्या अंगाचा विचार केला असता, प्युबमेड. जीओव्हीने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात असे आढळले की,‘डिझायनर व्हजायनामुळे स्त्रियांना जननेंद्रियांच्या बाह्यस्वरूपाबद्दल समाधान मिळणार असले, तरी यामुळे त्यांच्या मानसिकस्वास्थ्यावर किंवा लैंगिकसंबंधांच्या दर्जावर सकारात्मक परिणाम होईलच असे नाही. ‘मानसिकनैराश्यातून जाणाऱ्या रुग्णांवरही शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय व्यावसायिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, कारण यामुळे सर्जिकल प्रक्रियेच्या निष्पत्तीवर परिणाम होऊ शकतो’ असा इशारा या अभ्यास अहवालात दिला होता.

लॅबिया प्लास्टी करण्यापूर्वी कोणती माहिती करून घ्यावी?

तुम्ही’डिझायनर व्हजायना’ सर्जिकल प्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतलाच असेल, तर या काही बाबी लक्षात घेतल्याच पाहिजेत,असे डॉ.चिटणीस यांचे मत आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सामान्यपणे दोन किंवा तीन तास लागतात.

लॅबियाप्लास्टी करण्यापूर्वी सर्जनचा अनुभव व प्रशिक्षण यांच्याविषयी चौकशी करा.

जखम उघडी पडणे आणि हेमोटोमा या गुंतागुंती शस्त्रक्रियेनंतर निर्माण होऊ शकतात. त्यांचे मूल्यमापन आवश्यक असते. मात्र, यामुळे पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज क्वचितच भासते. ही प्रक्रिया कॉस्मेटिक प्रकारची असल्यामुळे, अंतिम निष्पत्ती मिळण्यास काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो आणि शस्त्रक्रियेची पुनरावृत्तीही करावी लागू शकते.

ही सुरक्षित व डेकेअर प्रक्रिया (यासाठी २४ तासांहून अधिक काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासत नाही) असून, त्यातून पूर्ण बाहेर येण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. सामान्य दिनक्रम लगेच सुरू होऊ शकतो व शस्त्रक्रियेचे परिणाम ४-६ आठवड्यांच्या काळानंतर दिसू लागतात, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर घेण्याची काळजी रुग्णाला पूर्वीपासून असलेले काही आजार किंवा घेत असलेली औषधे यांची संपूर्ण माहिती शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही सर्जिकल प्रक्रिया करवून घेतल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीसाठी लैंगिक समागम पूर्णपणे टाळणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योनीमार्गाचा भाग स्वच्छ व कोरडा राखणेही आवश्यक आहे, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

शस्त्रक्रियेनंतर योनीमार्गाचा भाग स्वच्छ ठेवणे व त्याला आराम देणे हे प्रादुर्भाव टाळण्यासाठी गरजेचे आहे, असे डॉ. चिटणीस म्हणाल्या. त्यांनी सांगितले, “शस्त्रक्रियेनंतर ६-१२ आठवडे टॅम्पून्सऐवजी सॅनिटरी टॉवेल्स वापरावेत व लैंगिक क्रिया टाळाव्यात.

वेदना, खरचटणे व सूज येणे या लॅबियाप्लास्टीनंतर होणाऱ्या सामान्य प्रतिक्रिया आहेत. यामुळे लघवी करताना किंवा बसताना वेदना होऊ शकतात. हे टाळण्यासाठी सर्जन वेदनाशामक औषधांची शिफारस करू शकतात.”

(अनुवाद- सायली परांजपे)