गुजरातच्या एका तरुणीनं स्वत:शी लग्न केलं, कारण तिला कुणा पुरुषाशी लग्न न करताही नववधू होण्याचा अनुभव घ्यायचा होता. आयुष्यभरासाठी हा निर्णय घेता येतो? एकटीलाच स्वत:ला सुखावता येतं? की वेगवेगळी नाती हवीच असतात प्रत्येक माणसाला?

“ लो कर लो बात! लॉस एंजेलिसच्या लिंडा बेकरच्या पायावर पाय ठेवून भारतातही सोलोगॅमीची संकल्पना आली म्हणायची!” कृत्तिकानं आपली नजर लॅपटॉपवरून न हटवता नवऱ्याला म्हटलं.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?

“सोलोगॅमी? आता हे काय नवीन खूळ?” नवरोजीचा प्रतिप्रश्न.

“तुला माहीत नाही? म्हणजे स्वतःचं स्वतःशीच चार लोकांसमोर लग्न लावणं. अरे, या लिंडा बेकरनं पंचवीस वर्षांपूर्वीच ही संकल्पना मांडली. आपल्या सगळ्या मित्रमंडळीस आमंत्रण दिलं आणि त्यांच्या समक्ष स्वतःशी लग्नही केलं.”

“ कमाल आहे. पण… असं कशासाठी? नात्याची जबाबदारी नको म्हणून? आणि लग्न न करता एकटं राहायचं तर पुन्हा लग्नाचा फार्स कशासाठी?”

आणखी वाचा : नातेसंबंध : “मला बाबा नकोय”

“सेल्फ लव्ह, स्वातंत्र्य आणि स्वतःप्रतिची जबाबदारी व्यक्त करण्याचा एक मार्ग असं म्हणून शकतो आपण.”

“असेल बुवा, पण आपल्याकडे कुणी आणि का म्हणून केलं हे असं?”

“गुजरातमधील एका तरुण मुलीला लग्न नव्हतं करायचं, पण मांडवात नवरी होण्याचा ‘फील’ मात्र अनुभवायचा होता म्हणे. म्हणून तिनं असं केलं म्हणतात. अर्थात कायद्याच्या चौकटीत असं काही बसत नाही, फक्त एक समारंभ म्हणून ठीक आहे.”

“म्हणजे कृत्तिका, बघ नं गंमत. लग्न तर करायचं, पण ब्लेम गेम नाही, जबाबदारी ढकलणं नाही… अपेक्षा नाही, अपेक्षाभंगही नाही. आपणच आपले पार्टनर. श्या! मग भांडायचं कुणाशी? मजा नाही बुवा त्यात!” तिला चिडवत तो म्हणाला.

“लग्नबंधन म्हणजे दोन जीव आणि पर्यायानं दोन कुटुंबं एकत्र येणं. किती तरी नवीन नाती जोडली जातात. शिवाय असंख्य जबाबदाऱ्याही आल्या यात. म्हणजे व्यक्तीचं आयुष्य बदलवून टाकणारा प्रसंग…”

आणखी वाचा : नातेसंबंध : ‘चिल’ मॉम!

“पण कृत्तिका, आता बघ नं, वर पक्ष, वधू पक्ष वगैरे भानगडच नाही! आहेर, देणं-घेणं काहीच नाही. मग हे कशासाठी?”

“अरे, आपण नवरा-बायको कशी एकमेकांची काळजी घेतो, अडचणीला सोबत असतो… तसं एकटं राहणारी व्यक्ती करू शकते का? ते अशा प्रसंगातून सगळ्यांच्या समोर एक वचन देत असतील, स्वतःला दिलेलं वचन – मी माझी उत्तम काळजी घेईन. हेळसांड होऊ देणार नाही… माझ्या आत दडलेला पती मला आयुष्यभर साथ देईल… माझ्यातील रोमान्स जिवंत ठेवेल… जगणं सुंदर होण्यासाठी मला त्याची गरज आहे… माझ्यातील रसरशीतपणा टिकवण्यासाठी मला ही प्रेमभावना जपायची आहे. असंच असेल नं काहीसं?” आपले हात नवऱ्याच्या गळ्यात टाकत कृत्तिकानं प्रश्न केला.

“म्हणजे शेवटी नातं निर्माण करण्याची गरज असतेच नाही माणसाला? भलेही ते नातं आपलं आपल्याशीच का असेना!”

“आणखी एक गंमत सांगू? ब्राझीलमध्ये मॉडेल आहे… क्रिस गेलेरा तिचं नाव तिनंही असं चार लोकांसमोर स्वतःशी लग्न लावलं …आणि तीन महिन्यांत एकाच्या प्रेमात पडली. मग तिनं जाहीरपणे सांगितलं, की मी आता स्वतःशी डिव्होर्स घेतेय …म्हणजे माझं सोलोगॅमी आयुष्य संपवून दोनाचे चार करतेय. आहे की नाही गंमत?”