ज्ञानदेव बाबाराव नजान

मॅडम, कृपया उद्याच्या कार्यक्रमाचे फोटो ग्रुपवरपाठवा.”शाळेच्या व्हॉट्सॲपग्रुपवरआलेल्या या संदेशा नंतर काही वेळातच मुलांचे फोटो, व्हिडिओ आणि कार्यक्रमाची माहिती ग्रुपमध्ये शेअर होऊ लागली. एका आईने आपल्या मुलाचा फोटो पाठवला. दुसऱ्या पालकांनी तो फोटो पुढे एका वेगळ्या ग्रुपमध्ये शेअर केला. काही क्षणांतच तो फोटो अपेक्षेपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचला. दुसरीकडे, एका पालकांनी मुलाच्या शिक्षणासाठी नवीन MobileApp डाउनलोड केले. App सुरू करताना स्क्रीनवरकाही प्रश्न आले-

“AllowaccesstoCamera?”

“AllowaccesstoMicrophone?”

“AllowaccesstoLocation?”

“AllowaccesstoContacts?”

काम लवकर सुरू करण्याच्या घाईत त्यांनी प्रत्येक ठिकाणी“Allow” वर क्लिक केले.दोन्ही घटनांमध्ये एक समान गोष्ट होती- सोयीसाठी घेतलेला छोटासा डिजिटल निर्णय. मग प्रश्न असा आहे- शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपण किती माहिती शेअर करतो?आणि आपल्या मोबाइल मधील ॲप्सना आपण कोणत्या गोष्टींची परवानगी देतो? आज महिला, पालक आणिमुले शिक्षण, संवाद, बँकिंग, ऑनलाइन खरेदीआणि इतर अनेक कामांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करतात.शाळेचे गृहपाठ, सूचना, कार्यक्रम आणि इतर आवश्यक माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक ॲप्स मुलांच्या शिक्षणात मदत करतात.

मात्र या सुविधांचा वापर करताना गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षिततेची काळजी घेणे ही तितकेच आवश्यक आहे.शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये काय शेअर करावे? शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा मुख्य उद्देश शैक्षणिक आणि आवश्यक संवाद हा असतो. गृहपाठ, शाळेच्या सूचना, कार्यक्रमाची माहिती किंवा आवश्यक संदेश शेअर करणे योग्य आहे. मात्र मुलांशी संबंधित वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी.

उदाहरणार्थ-

मुलाचा पूर्ण घरचा पत्ता

वैयक्तिक मोबाइल नंबर

ओळखपत्रकिंवा इतर कागदपत्रांचे फोटो

शाळेच्याओळखपत्राची अनावश्यक माहिती

घराचीकिंवाकुटुंबाची संवेदनशील माहिती

अशी माहिती मोठ्या किंवा अनावश्यक ग्रुपमध्ये शेअर करणे टाळावे. मुलांचे फोटो किंवाव्हिडिओ शेअर करतानाही विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक फोटो चागैर वापर होईलच असे नाही; मात्र एकदा डिजिटल माध्यमातून माहिती शेअर केल्या नंतरती पुढे कुठेआणि किती लोकांपर्यंत पोहोचेल, यावर नेहमी पूर्ण नियंत्रण राहीलच असे नाही. म्हणूनच एक साधा नियम लक्षात ठेवा- गरजेपुरतीचमाहिती शेअर करा. व्हॉट्सॲपग्रुप मधील प्रत्येक संदेश खरा असेलचअसेनाही.

शाळेच्या ग्रुपमध्ये आलेला प्रत्येक संदेश अधिकृत आहे, असे गृहीत धरू नका.चुकीची माहिती किंवा अफवा एखाद्या सदस्या कडून पुढे पाठवली जाऊ शकते. विशेषतः फी, बँक खाते, युपीआयकिंवा इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित संदेश आल्यास अधिक सावध राहा.संशयास्पदलिंक वर तात्काळ क्लिक करू नका. गरज असल्यास शाळेच्या प्रशासनाशी थेट संपर्क करून माहितीची खात्री करा.

MobileAppPermissions म्हणजे काय?

एखादे मोबाइल ॲप्स डाउनलोड केल्यानंतर ते मोबाइलमधील काही सुविधा वापरण्यासाठी परवानगी मागू शकते.

उदाहरणार्थ-

CameraPermission – कॅमेरावापरण्यासाठी

MicrophonePermission – मायक्रोफोनवापरण्यासाठी

LocationPermission – स्थानाचीमाहितीवापरण्यासाठी

ContactsPermission – संपर्क क्रमांकांपर्यंतप्रवेशासाठी

PhotosandFilesPermission – फोटो किंवाफाइल्सवापरण्यासाठी

काही ॲप्सच्या कार्यासाठी विशिष्ट परवानग्या आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ, व्हिडीओ कॉलिंग ॲप्सला कॅमेरा आणि मायक्रोफोनची आवश्यकता असू शकते. मात्र प्रत्येक ॲप्यला प्रत्येक परवानगी आवश्यक असेलच असे नाही.त्यामुळे“Allow” वर क्लिक करण्या पूर्वी त्या परवानगीची आवश्यकता काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचेआहे. परवानगी मागितली म्हणजे ते ॲपधोकादायक आहे, असे निश्चित पणे म्हणता येत नाही. मात्र ॲप्च्याकार्याशी संबंधित आणि आवश्यक असलेल्या परवानग्यांचाच विचारपूर्वक स्वीकार करणे ही चांगली डिजिटल सवयआहे.

महिला आणिपालकांनी काय करावे?

आज अनेक महिला मोबाइलवरून बँकिंग, ऑनलाइन खरेदी, सोशल मीडिया आणि इतर महत्त्वाची कामे करतात.मुलांच्या मोबाइल किंवाटॅबमध्ये गेम्स आणि विविध ॲप्स असतात. म्हणून वेळोवेळी मोबाइलच्या Settings मध्ये जाऊन AppPermissions तपासणे उपयुक्त ठरते. विशेषतःमुलांच्या मोबाइलमध्ये कोणती ॲप्स आहेत आणि ती कोणत्या परवानग्या मागतात किंवा वापरतात, याची पालकांनी माहिती ठेवावी. मात्र याचा अर्थ मुलांवर सतत संशय घेणे असा नाही. विश्वास, संवाद आणि योग्य डिजिटल मार्गदर्शन हा अधिक प्रभावी मार्ग आहे. मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्यासवयी

ॲप्सशक्यतो अधिकृत AppStoreमधूनच डाउनलोड करा.

ॲप्स डाउनलोड करण्यापूर्वीत्याचाउद्देशआणि आवश्यक परवानग्या तपासा.

अनावश्यक परवानग्यादेण्यापूर्वी विचार करा.

वेळोवेळीAppPermissionsतपासा.

वापरतनसलेलीकिंवासंशयास्पदवाटणारीॲप्सकाढूनटाका.

मोबाइल आणिॲप्सनियमितपणेUpdateठेवा.

शयास्पद लिंक आणिअनोळखीसंदेशांवर क्लिक करू नका.

मुलांनाॲप्स डाउनलोड करण्या पूर्वी पालकांशी चर्चा करण्याची सवय लावा.

एक “Share”आणि एक “Allow”…

शाळेचा व्हॉट्सॲप ग्रुप असो किंवा मोबाइल मधील एखादे ॲप- डिजिटल सुविधा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. त्यामुळे त्यांचा वापर बंद करणे हा उपाय नाही; त्यांचा वापर समजून आणि सावधपणे करणे महत्त्वाचेआहे.

ग्रुपमध्येमाहिती शेअर करण्यापूर्वीस्वतःला विचारा-

“हीमाहिती या सर्व लोकांनादिसणे आवश्यक आहेका?”

आणिएखाद्या ॲप्सला परवानगीदेण्यापूर्वी विचारा-

“याॲप्सच्याकामासाठी ही परवानगीखरोखर आवश्यक आहेका?”

आजच्या डिजिटल जगात प्रत्येक “Share”आणि प्रत्येक “Allow” हा छोटासा निर्णय आहे.

सायबर फॉरेन्सिक विश्लेषक

dnyandev.najan@yahoo.in