RCB साठी ९९ धावांची झुंजार खेळी करत सामना खिशात घालणारी सोफी डिव्हाईन कोण आहे?

RCB साठी ९९ धावांची खेळी करणारी सोफी डिव्हाईन चर्चेत

who is Bats man sophie devine? know about her personal life and Cricket career
जाणून घ्या सोफी डिव्हाईनबाबत माहित नसलेल्या गोष्टी

WPL मध्ये RCB च्या संघाने गुजरात जाएंट्सना हरवत विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाचा हा सलग दुसरा विजय होता. मात्र या सामन्यात झुंजार खेळी की ती सोफी डिव्हाईनने. सोफी ही किवी प्लेअर आहे. ३६ चेंडूंमध्ये तिने ९९ धावांची आतषबाजी केली. या ९९ धावा करताना सोफीने ९ चौकार आणि ८ षटकारांचे जे काही उत्तुंग फटके तिने लगावले त्यामुळे शनिवारची तिची खेळी ही खूप महत्त्वाची कामगिरी करणारी ठरली. आपण जाणून घेऊ कोण आहे सोफी डिव्हाईन?

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

कोण आहे सोफी डिव्हाईन?

सोफी डिव्हाईन ही न्यूझीलँडची प्लेअर आहे. सुरूवातीला ती न्यूझीलँडसाठी हॉकी खेळत होती. मात्र नंतर तिने क्रिकेट हेच आपलं करिअर निवडलं. बॅट्समन म्हणून ती काय कमाल करू शकते हे तिने RCB च्या गुजरातसोबतच्या सामन्यात शनिवारी दाखवून दिलं. ३३ वर्षीय सोफी डिव्हाईन न्यूझीलँड वुमन्स टीमची कर्णधार आहे. तिने मागच्या महिन्यात T20 वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला होता.

सोफीच्या नावावर वुमन्स टी२० मध्ये सर्वात वेगवान शतक झळकवण्याचा रेकॉर्ड आहे. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सुपर स्मॅश टूर्नामेंटमध्ये सोफीने फक्त ३६ चेंडूंमध्ये १०० रन केले होते.

वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत सोफीने न्यूझीलँडतर्फे १०५ एक दिवसीय सामने खेळले होते तर ९१ टी २० मॅचेस खेळल्या होत्या. दिवसागणिक यामध्ये भरच पडते आहे. एवढंच नाही तर सोफी हेल्मेट न घालता खेळण्यासाठीही प्रसिद्ध आहे. सोफीचा जन्म १ सप्टेंबर १९८९ ला झाला आहे. तिचं पूर्ण नाव सोफी फ्रान्सेस म्युनिक डिव्हाईन असं आहे. सोफी वयाच्या चौथ्या वर्षापासून क्रिकेट आणि हॉकी हे दोन खेळ खेळते आहे. सोफीचं शिक्षण न्यूझीलँडच्या Tawa College मध्ये झालं आहे. तिने वयाच्या १४ व्या वर्षी प्रोफेशनल हॉकी खेळण्यास सुरूवात केली. तसंच फर्स्ट क्लास क्रिकेटही तिने वयाच्या १४ व्या वर्षीच सुरू केलं. सोफीने University of Canterbury मधून सोशोलॉजीची डिग्री घेतली आहे. न्यूझीलँडच्या वुमन क्रिकेट टीमसाठी म्हणजेच द व्हाईट फर्न्ससाठी सोफी वयाच्या १७ व्या वर्षापासून खेळते आहे.

सोफीच्या शतकांचा रेकॉर्ड कसा आहे?

२०१२ कटकच्या Driems ग्राऊंडवरून साऊथ अफ्रिकेविरोधात खेळताना सोफीने १४५ धावा केल्या होत्या

२०१७ मध्ये शारजा क्रिकेट स्टेडियम UAE मध्ये तिने पाकिस्तानविरोधात झुंजार खेळी करत १०३ धावा केल्या होत्या.

२०१८ मध्ये बर्ट ओव्हल मैदान न्यूझीलँड या ठिकाणी वेस्ट इंडिज विरोधात खेळताना सोफीने १०८ धावांचा डोंगर उभा केला होता

२०१८ मध्ये आयर्लंड विरोधात खेळताना सोफीने १०८ धावा केल्या होत्या

तर २०१८ याच वर्षी सोफीने इंग्लंडविरोधात खेळताना ११७ धावा केल्या आणि नाबादही राहिली होती

न्यूझीलँडमध्यल्या बे ओव्हल ग्राऊंडवर खेळातना सोफीने वेस्ट इंडिजच्या विरोधात १२७ धावा केल्या होत्या.

T20 मधला शतकी खेळीचा रेकॉर्ड

२०२० मध्ये साऊथ अफ्रेकेविरोधात खेळताना सोफीने १०५ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडची झुंजार बॅट्समन सोफी ही सध्या RCB कडून खेळते आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 13:08 IST
Next Story
गच्चीवरच्या बागेसाठी नैसर्गिक खतनिर्मिती
Exit mobile version