Premium

Animal: कोण अल्फा मेल? फेमिनिस्ट मत तर राहूद्या पुरुषांवरही अन्याय करणारा अ‍ॅनिमल, नव्हे ‘राक्षस’!

Animal Portrays Sexist Side : प्रेमाची, पुरुषार्थाची, खोटी व्याख्या मांडणाऱ्या या चित्रपटात अनेक असे भाग आहेत ज्यामुळे तुम्हीही आयुष्यातील तीन तास इतक्या विषारी विचारांसाठी का व्यर्थ घालवलेत असा प्रश्न पडू शकतो. पण त्याहीपेक्षा

Why Animal Movie Review What Is Sexist Alpha Male Ranbir Kapoor Rashmika Mandana Toxicity Actresses Used For Adding Masala
रणबीर कपूरचा चित्रपट अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिसवर तुफान डरकाळ्या फोडतोय. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Animal Movie Sexism: रणबीर कपूरचा चित्रपट अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिसवर तुफान डरकाळ्या फोडतोय. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अभिनय व स्टंट्ससाठी या चित्रपटाला १०० गुण द्यायला हवेत पण लॉजिक, कथानक आणि प्रेक्षकांप्रती पार पाडलेलं कर्तव्य हे शून्याहुनही खाली आहे म्हणायला हरकत नाही. अगदी सिनेमाच्या नावाला साजेसं कथानक आहे असंही म्हणता येणार नाही कारण प्राणी सुद्धा कदाचित यापेक्षा जास्त लॉजिकल आणि प्रेमाने राहत असावेत. अ‍ॅनिमल ऐवजी या चित्रपटाचं नाव राक्षस वगैरे असतं तर आणखी चपखल बसलं असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेमाची, पुरुषार्थाची, खोटी व्याख्या मांडणाऱ्या या चित्रपटात अनेक असे भाग आहेत ज्यामुळे तुम्हीही आयुष्यातील तीन तास इतक्या विषारी विचारांसाठी का व्यर्थ घालवलेत असा प्रश्न पडू शकतो. पण त्याहीपेक्षा खूपच मनाला लागलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटात स्त्रियांना दिलेली वागणूक. केवळ पात्रांपुरतीच नव्हे तर एक अभिनेत्री म्हणूनही त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर न करून सर्वच जणींचा वेळोवेळी अपमान करण्यात आला आहे. या अभिनेत्रींना आयटम सॉंग्सवर नाचायला लावलं नसलं तरी त्यांचा चित्रपटातील वापर व वावर फक्त पदार्थात मसाला मिसळावा इतकाच केलेला आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why animal movie review what is sexist alpha male ranbir kapoor rashmika mandana toxicity actresses used for adding masala svs

First published on: 05-12-2023 at 17:46 IST
Next Story
तेराव्या वर्षी पदवीधर, तर २२ व्या वर्षी मिळवली पीएचडी; टेबल टेनिसपटू नयना जैस्वालची कामगिरी वाचून व्हाल थक्क!