वर्ल्ड इकनॉमिक फोरमच्या लिंगसमानता राखणाऱ्या १४६ देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक १३५ वा लागतो. याचाच अर्थ असा की, लिंगसमानतेच्या बाबतीत भारत खूप मागे आहे. मात्र एक विषय किंवा क्षेत्र असे आहे की, ज्यामध्ये भारताने अमेरिका, युनायटेड किंगडमसारख्या विकसित देशांनाही मागे सारून थेट पहिला क्रमांक मिळवला आहे. महिला वैमानिकांची जगातील सर्वाधिक टक्केवारी केवळ भारतातच असून ही टक्केवारी जगाच्या तुलनेत १२.४ टक्के एवढी आहे. भारतानंतर अमेरिका आणि युनायटेड किंगडमचा क्रमांक लागतो त्यांच्याकडील महिला वैमानिकांची टक्केवारी अनुक्रमे ५.५ आणि ४.७ एवढी आहे. साहजिकच आहे की, जगाला प्रश्न पडलाय, सर्वाधिक महिला वैमनिकांच्या टक्केवारीत भारताचा क्रमांक पहिला कसा काय येऊ शकतो?

आणखी वाचा : नातेसंबंध: बॉयफ्रेण्डनं ‘डीच’ केलं तर?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

महिला अत्याचारांच्या घटना भारतामध्ये वाढत आहेत. असे असतानाही महिला वैमानिकांची अधिक टक्केवारी असलेल्या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर येणे हा सुखद धक्काच आहे. भारताचा पहिल्या क्रमांकापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. १९८९ साली निवेदिता भसिन ही जगातील सर्वात तरुण महिला वैमानिक ठरली, त्यावेळेसही तिला कॉकपिटच्या बाहेर फारसे येऊ दिले जात नव्हते. महिला वैमानिक असेल तर प्रवाशांच्या मनात अनेक शंका येऊ शकतात म्हणून तिला प्रवाशांच्या समोर कॉकपीटमधून बाहेर येणे टाळावे, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भारतात आणि जगात दोन्ही ठिकाणी परिस्थिती बदलली आहे. तरीही काही वेळेस महिला वैमानिक पाहिल्यावर आजही आश्चर्याने भुवया उंचावल्या जातात, तेव्हा ‘आता असे पाहण्याची सवय ठेवा’, असे रोखठोक उत्तर कॅप्टन झोया अगरवालसारखी महिला वैमानिक देते.

आणखी वाचा : विधवा आहे आणि पैठणी नेसून मिरवतेय बघ कशी?

गेल्याच वर्षी कॅप्टन झोयाने सांगते, सर्व महिला वैमानिकांच्या चमूसह बंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्को असा आजवरचा जगातील सर्वात मोठा तब्बल १६ हजार किलोमीटर्सचा प्रवास पल्ला यशस्वीरित्या पार करत जागतिक विक्रमही नोंदवला. बोईंग 777 या जगातील सर्वात मोठ्या विमानाचीही सर्वात तरुण वैमनिक तीच होती. झोयासाठीही हा प्रवास काही सोपा नव्हता. लग्न करा, मुलं वेळत होऊ द्यात, असंच तिच्या आई- वडिलांनाही वाटत होतं. वैमानिक प्रशिक्षणासाठी पैसे कुठून आणणार हाही प्रश्नच होता. सुरुवातीला घरातून पाठिंबा मिळालाच नाही. बालपणीही तिला खेळण्यांमध्ये बाहुली दिली जायची त्यावेळेस तिला मात्र टेलिस्कोप हवा असायचा, झोया स्वतःच सांगते. ती वैमानिक होणार असे सांगितल्यावर तर ‘अरे बापरे हे काय झालं’ असं वाटून आईला रडूच कोसळलं. आज मात्र अनेक मुलींना असं वाटतं की, झोयाला जमलं तर त्यांनाही जमेलचं, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो, झोया सांगते.

आणखी वाचा : U19 Women T20 WC: कर्करोगाने पतीला तर सर्पदंशाने मुलाला गमावले; जगाने दुर्लक्षित केलेल्या आईच्या लेकीने टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन 

भारताने साध्य केलेल्या या महिला वैमानिकांच्या सर्वाधिक टक्केवारीच्या विक्रमाबाबत विचारता झोया म्हणते, वैमानिकांच्या सीटला माहीत नसते विमान चालवणारा पुरूष आहे की, महिला. मग आपण का एवढा विचार करतो? भारतासारख्या देशात महिलांसाठी उत्तम गोष्ट म्हणजे अनेक विमान कंपन्या महिला वैमनिकांच्या सुरक्षेची चांगली काळजी घेतात. विदेशातील कंपन्या महिलांना गरोदरपणाची रजा देत नाहीत. भारतीय कंपन्या मात्र अशी रजा देतात. किंबहुना गरोदर आहेत, असे लक्षात आल्यानंतर महिला वैमानिकांना कमी दगदगीचे काम दिले जाते. भारतात अद्याप एकत्र कुटुंब पद्धती आहे, त्याचा फायदाही महिला वैमानिकांना होतो, त्यांना मुलांची काळजी करत बसावे लागत नाही. त्या मुलांबाबत निश्चिंत असतात आणि करिअर करू शकतात. तुम्हाला वैमानिक व्हायचं आहे तर शिष्यवृत्तीही उपलब्ध आहेत आणि कर्ज देण्यासाठी बँकाही तयार आहेत. भारतात विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आदी विषयांकडे महिलांनी वळावे, यासाठी विशेष लक्षही दिले जात आहे. एकूणच या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे या क्षेत्रातील महिलांची टक्केवारी विकसित देशातील महिला वैमानिकांच्या टक्केवारीच्या दुपटीहून अधिक आहे.

आणखी वाचा : ICC U-19 Womens T20 WC: फायनल जिंकल्यानंतर कर्णधार शफाली वर्मा झाली भावूक, पाहा VIDEO

सध्या भारतात २१० महिला वैमानिक त्यातील १०३ कॅप्टन्स आणि तब्बल ५०७ महिला एअर ट्रॅफिस कंट्रोलर्स आहेत. १९४८ साली नॅशनल कॅडेट कोअरची एअर विंग सुरू करण्यात आली त्यात मायक्रोलाइट एअरक्राफ्ट चालविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत होती, यात विद्यार्थिनींचाही समावेश होता. शिवाय भारतातील काही राज्य सरकारे मुलींना वैमानिक होण्यासाठी आर्थिक मदत करतात तर होंडा मोटर कॉर्प सारख्या कंपन्याही १८ महिन्यांची पूर्ण स्कॉलरशिप देतात या व अशा अनेक प्रोत्साहनपर योजनांमुळेच भारतात महिला वैमानिकांची टक्केवारी वाढली आहे, असे या क्षेत्राशी संबधित तज्ज्ञांना वाटते.

Story img Loader