मुक्ता चैतन्य

एखादी घटना वाचून जीवाचा थरकाप व्हावा, मन अस्वस्थतेने व्यापून जावं अशा घटना रोजच्या रोज ऐकू यायला लागल्या आहेत; विशेषतः स्त्रियांच्या शोषणाच्या. त्यांच्या हत्या आणि त्यातल्या विकृतीचे वर्णन. आफताब आणि श्रद्धाची केस ताजी असतानाच अशा आणखी दोन- तीन केसेस समोर आल्या. एकात ‘लिव्ह इन’ पुरुषाने, जोडीदार स्त्रीचा गळा चिरला त्याचा ऑनलाईन व्हिडीओ पोस्ट केला. आणि प्रतारणा केली तर अशीच शिक्षा मिळेल असंही छातीठोकपणे सांगितलं तर दुसऱ्या केसमध्ये पूर्वप्रेयसीने दुसऱ्या कुणाशीतरी लग्न केल्यामुळे घरच्या माणसांना हाताशी धरून तिचा खून पडून देहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तर आणखी एका भयानक प्रकरणात मुलगी न सांगता घराबाहेर गेल्याचा वडिलांना इतका राग आला की त्यांनी गोळी झाडून मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह बॅगेत कोंबून बॅग फेकून दिली.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

आणखी वाचा : मुलींना स्पर्श करण्यात कसलं सुख? तुमच्यासारख्या राक्षसांना तर…

या सगळ्या घटनांमधले पुरुष अत्यंत विकृत मनोवृत्तीचे आहेत आणि सर्व जातीधर्माचे आहेत. त्यामुळे विशिष्ट जाती धर्मातील पुरुष किंवा नवरा/ जोडीदार याच भूमिकेतला पुरुष असा विकृत वागतोय असं नाही. भारतीय पुरुषांच्या मानसिकतेचा त्यांनीच नव्हे तर सगळ्या समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ इथपासून घराच्या इज्जतीचा रक्षणाची जबाबदारी पुरुषांची आहे आणि त्यासाठी वेळप्रसंगी घरातल्या स्त्रीचा जीव घेतला तर चालू शकतो पण इज्जत वाचली पाहिजे इथपर्यंत, भारतीय पुरुषांवर ते जन्माला आल्यापासून जे भीषण संस्कार होतात त्या संस्कारांवर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उभं राहिलं आहे.

आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यातच होतंय लैंगिक शोषण?

माणूस मुळात हिंस्त्र प्राणी आहे, असंच मला अनेकदा वाटतं हिंसा करण्याचे विविध मार्ग तो सातत्याने शोधत असतो. काहीवेळा हे शारीरिक मार्ग असतात, तर काही वेळा मानसिक आणि भावनिक हिंसेचे. माणूस जर हिंसेच्या शोधात नसता तर शांततेसाठी काही हजारो वर्ष मानवाचा आटापिटा सुरु नसता. त्यामुळे हिंसा ही आदीम भावना आहे आणि ती सर्व्हायव्हलशी जवळून जोडलेली आहे असं अनेकदा दिसून येतं. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हिंस्त्र का असतात किंवा काही पुरुष इतर पुरुषांपेक्षा जास्त हिंस्त्र का असतात यावर जगभर अनेक संशोधने सुरु आहेत. प्रसिद्ध न्युरोफिझिऑलॉजिस्ट डेव्हिड ऍडम यांनी या विषयात प्रदीर्घकाळ काम केले होते. १९८६ साली बऱ्याच प्रदीर्घ संशोधनांनंतर त्यांनी विधान केलं की, युद्ध किंवा कुठलेही हिंसक वर्तन आपल्या डीएनएमध्ये असते हे अवैज्ञानिक आहे. याचाच अर्थ निसर्गतः माणूस हिंस्त्र आहे असं तोवर विज्ञानाने सिद्ध केलेलं नव्हतं. तर लिंग निवड सिद्धांत (सेक्स सिलेक्शन थेअरी) असं सूचित करते की पुरूष आदीम काळापासून पुढची पिढी उत्तम निपजावी यासाठी किंवा प्रजनन यशस्वितेसाठी झगडत आला आहे. त्यामुळे ते अधिक हिंसक असतात. तो मानवी स्वाभाव आहे. पण दुसरीकडे सामाजिक भूमिका सिद्धांतानुसार सामाजिकरणाच्या प्रक्रियेत लिंगभाव, भूमिका, अपेक्षित वर्तन या गोष्टी विकसित होत जातात. हार्वर्डचे संशोधक आणि मानसशास्त्रज्ञ स्टीवन पिंकेर यांनी २००२ मध्ये लिहिलेल्या ‘ब्लँक स्लेट’ या पुस्तकात म्हटलं आहे की, जितकं अधिक मानवी देह आणि मेंदू यांच्याकडे आम्ही बघतो आक्रमकतेच्या पाऊलखुणा आणि चिन्हे ठळकपणे सापडतात.

आणखी वाचा : आई न होणाऱ्या स्त्रीला स्वार्थी ठरवले जाणे दु:खद: – जेनिफर अ‍ॅनिस्टन

मानवी आणि विशेषतः पुरुषांच्या हिंसक मनोवृत्तीवर अजूनही संशोधन सुरू राहील आणि नवेनवे संदर्भ येत राहतील, पण एक मात्र खरं पुरुषप्रधान संस्कृतिक रचनेत पुरुषांचे स्त्रीला कमी लेखणे, तिच्यावर संस्कृती रक्षणाची, इज्जतीच्या रक्षणाची जबाबदारी टाकून त्याचा न्याय निवडा स्वतःच्या हातात घेण्याची मनोवृत्ती जी मोठ्या प्रमाणावर पोसली जाते त्याचे परिणाम म्हणजे आपल्या समाजात वरचेवर घडणाऱ्या दुर्दैवी घटना. पुरुषाने बाईला काबूत ठेवले पाहिजे, तिने पुरुषांच्या मर्जी व्यतिरिक्त काहीही करता कामा नये, तिने तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक पुरुषाचे ऐकलेच पाहिजे आणि तसे तिने केले नाही तर तिला शिक्षा करण्याचा अधिकार पुरुषांना असतोच हा जो काही विचार कळत नकळत आपल्या समाजात रुजला आहे; त्यातूनच अशा हिंस्त्र घटना घडतात. घरातल्या स्त्रीचा खून असो किंवा तिचा शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ असो हे सगळं करण्याचा अधिकार पुरुषांना आहे, अशीही मानसिकता अनेकदा पाहायला मिळते. ही मानसिकता फक्त पुरुष पोसतात असं नाहीये, अनेक कुटुंबातल्या स्त्रियाही ही मानसिकता पोसत असतात. ही मानसिकता रुजण्यासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे हातभार लावत असतात. त्यामुळे पुरुषप्रधानता हा फक्त पुरुषी मानसिकतेचा प्रश्न नाहीये तर पुरुषप्रधानतेच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेचाही तो प्रश्न आहे. आई, सासू, बहीण, बायको या भूमिकेतून या हिंसक मानसिकतेला पोषक वातावरण पुरवणाऱ्या स्त्रियांचाही तो प्रश्न आहे.

आणखी वाचा : पुरुषांना मोकळ्या विचारांची मैत्रीण चालते, पण मग बायको का नाही?

दुसरं, पुरुषांइतक्या स्त्रिया हिंसक नसतात हे विधान मला अनेकदा एकांगी वाटत आलं आहे. स्त्रियांना पुरुषप्रधान रचनेत तशी हिंस्त्र वागण्याची संधी मिळत नाही म्हणून त्या हिंसा करत नाहीत. त्यांना शारीरिक हिंसेची शक्यता कमी असल्यामुळे त्या शाब्दिक आणि मानसिक हिंसा सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर करत असतात. त्यामुळे या सगळ्याचं उत्तर मातृसत्ताक पद्धतीत शोधावं असंही मला अनेकदा वाटत नाही. या सगळ्याचं उत्तर फक्त समानतेच्या सामाजिक रचनेतूनच कदाचित मिळू शकेल!

muktaachaitanya@gmail.com