महिलांना सुंदर दिसण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ब्रा’चा योग्य वापर. जगभरात अनेक महिला ‘नो ब्रा’ मुव्हमेंटच्या समर्थक आहेत. पण तरीबी ब्राचा वापर हा गरजेचा आहे. त्यामुळे स्तनांना योग्य आकार आणि आधार मिळतो. मात्र जर याचा दीर्घकाळ वापर होत राहिला तर त्याचे गंभीर परिणामही उद्भवू शकतात. ब्रा घालण्यावरून महिलांमध्ये अनेक समज गैरसमज पाहायला मिळतात. यापैकीच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रात्री झोपताना ब्रा घालावी की घालू नये. अनेकदा या मुद्यावर चर्चा रंगताना दिसते. म्हणून याचे शंकानिरसन होणे गरजेचे आहे.

अनेकदा आजूबाजूला असणारी लोकं, गाऊन घालून चांगलं दिसणार नाही म्हणून अनेक स्त्रिया इच्छा असूनही ब्रा घालून झोपतात. तसंच ब्रा काढून झोपल्याने आपल्या स्तनाचा आकार तर बिघडणार नाही ना हा प्रश्न देखील काहीजणींच्या मनात येतो. त्यामुळे या भीतीपोटी ब्रा काढायची असून काढली जात नाही. मात्र तज्ञांच्या मते रात्री ब्रा घालून झोपणे अजिबात योग्य नाही. यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान पोहोचू शकते. तर नेमकी काय आहेत यामागची कारणे आणि ब्रा घालून झोपल्याने कोणते दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया…

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
  • रात्रीच्या वेळी ब्रा घालून तुम्ही झोपत असाल तर त्याचा सर्वात गंभीर दुष्परिणाम म्हणजे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत न होणे. होय, ब्रा घट्ट असेल तर रक्तप्रवाह नीट होत नाही आणि त्यामुळे स्नायूंवर दाब पडू शकतो. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा काढूनच झोपा. जर ते शक्य नसेल तर किमान ब्रा तरी सैल करा.
  • जर तुम्ही घट्ट ब्रा घालून झोपत असाल तर स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एका रिसर्चनुसार ही बाब सिद्ध देखील झाली आहे. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा काढून झोपणे कधीही चांगले. जर तुमचे स्तन मोठे असतील आणि ज्यांना ब्रा शिवाय जमत नसेल त्यांनी झोपतेवेळी ब्रा सैल करूनच झोपावे. असं केल्याने त्यांना कोणताही त्रास होणार नाही.
  • काही महिला नोकरी करत असल्याने दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना दिवसभर ब्रा घालावी लागते. यावेळी जर तुमची ब्रा घट्ट असेल तर घामाचे प्रमाण वाढू शकते. जर घाम जास्त वेळ तसाच राहिला तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरी आल्यावर रात्री ब्रा काढून झोपणे कधीही चांगले आहे.

( हे ही वाचा: उंचीनुसार महिलांचे वजन नेमके किती असावे? पाहा शासनाने जाहीर केलेला ‘हा’ सोपा तक्ता)

  • जर तुम्ही सतत ब्रा घालून वावरत असाल, तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर एकप्रकारचे डाग पडू शकतात. तुमची त्वचा एक प्रकारे काळी किंवा लालसर पडू शकते. यामुळे त्याठिकाणी खाजेचे प्रमाण वाढून इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जर तुम्ही घट्ट ब्रा वापरत असाल तर थोडी सैल ब्रा वापरा. किंवा रात्री झोपतेवेळी ब्रा काढून झोपा.
  • तुम्ही जर ब्रा घट्ट घालून झोपल्यास अनेकदा श्वास घेण्याचाही त्रास होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास झाला तर त्याचा परिणाम हा झोपेवर होतो. त्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते आणि पुन्हा झोप लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर ब्रा काढून झोपणे कधीही चांगले आहे. याने तुम्ही झोपही चांगली घ्याल आणि तुमच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होणार नाही.