ज्ञानदेव बाबाराव नजान
आज शेरेंटिंग (Sharenting) हा शब्द जगभर चर्चेत आहे. म्हणजे पालकांकडून मुलांबद्दल अतिप्रमाणात ऑनलाइन माहिती शेअर करणे. सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारी ही सवय पुढे मुलांच्या गोपनीयतेवर परिणाम करू शकते. आज प्रत्येक आनंदाचा क्षण मोबाइलमध्ये कैद होतो आणि काही सेकंदांत सोशल मीडियावर पोहोचतो.बाळाचा जन्म, पहिला वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस, परीक्षेतील यश, सहलीचे फोटो, नृत्याचे व्हिडिओ, आजारपणातील छायाचित्रे, अगदीमुलांच्या दैनंदिन सवयीदेखील अनेक पालक अभिमानाने सोशल मीडियावर शेअर करतात. हे करताना त्यांचाहेतू आनंद व्यक्त करण्याचाअसतो; परंतु नकळत ते आपल्यामुलांचे डिजिटल भविष्य जगासमोरउघडे करत असतात.

प्रत्येक फोटो, व्हिडिओ, पोस्ट, कमेंट किंवा ऑनलाइन माहिती हा त्यामुलाच्या‘DigitalFootprint’चा भाग बनतो.म्हणजेच इंटरनेटवर त्यामुला बद्दल कायमस्वरूपी तयार होणारा डिजिटल ठसा. एकदा इंटरनेट वर गेलेली माहिती पूर्ण पणे हटवणे अनेकदा अशक्य असते.ती कॉपी होऊ शकते, डाउनलोड केली जाऊ शकते, इतर प्लॅटफॉर्मवर पुन्हा अपलोड केली जाऊ शकते किंवा भविष्यात अनपेक्षित कारणांसाठी वापरली जाऊ शकते. अनेक पालकांना वाटते की त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया खात्यावर‘FriendsOnly’ पर्याय निवडला आहे, त्यामुळे धोका नाही. पण वास्तव वेगळे आहे.मित्रांच्या खात्यांमधून स्क्रीन शॉट घेतले जाऊ शकतात, फोटो पुढे पाठवले जाऊ शकतात किंवा खाते हॅक झाल्यास ही माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकते.

आज ‘Sharenting’(Share शेअर आणिParentingपालकत्व या दोनशब्दांचामेळ) हा शब्द जगभर चर्चेत आहे. म्हणजे पालकांकडून मुलांबद्दल अतिप्रमाणात ऑनलाइन माहिती शेअर करणे. सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारी ही सवय पुढे मुलांच्या गोपनीयते वर परिणाम करू शकते. कल्पना करा, एखाद्या मुलीचे बालपणीचे अनेक वैयक्तिक फोटो, शाळेचे नाव, वाढदिवसाची तारीख, घरा जवळील ठिकाणे आणि कुटुंबाची माहिती अनेक वर्षे सोशल मीडियावर उपलब्ध आहे.पुढे ती मोठी झाल्यानंतर ही माहिती तिच्यान कळत बनावट प्रोफाइल तयार करण्यासाठी, सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांसाठी, ओळख चोरी साठी किंवा इतर सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाऊ शकते.

काही वेळा लहानपणी विनोद म्हणून पोस्ट केलेले फोटो किंवा व्हिडिओ मोठे झाल्या वर मुलांसाठी लाजिर वाणे ठरू शकतात. शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा व्यावसायिक आयुष्यात अशा पोस्ट पुन्हा समोर येऊ शकतात. अनेक कंपन्या उमेदवारांच्या सार्वजनिक ऑनलाइन उपस्थितीची पाहणी करतात. त्यामुळे बालपणी ची डिजिटल प्रतिमा देखील भविष्यावर परिणाम करू शकते.

विशेषतः मुलींबाबत अधिक काळजीघेणे आवश्यक आहे. शाळेचा गणवेश, रोजचा प्रवास, शिकवणीचे ठिकाण, खेळाचे मैदान किंवा वारंवार भेट दिली जाणारी ठिकाणे दर्शवणारे फोटो अनोळखी व्यक्तींना त्यांच्या दिनक्रमाची माहिती देऊ शकतात.अशा माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पालकांनी काही साधे नियम पाळले तर मुलांचे डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित राहू शकते.मुलांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, शाळेचे नाव, ओळखपत्रे, वैद्यकीय कागद पत्रे किंवा लोकेशन दर्शवणारे फोटो सार्वजनिक पणे शेअर करणे टाळावे. शक्य असल्यास सोशल मीडिया खात्यांवरील गोपनीयता (PrivacySettings)नियमितपणे तपासावी.

मोठी मुले असल्यास त्यांची परवानगी घेऊनच त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करावेत. यामुळे त्यांच्या मध्ये गोपनीयतेबाबत जागरूकता निर्माण होते आणि त्यांच्या मताचाही आदर केला जातो. प्रत्येक फोटो सोशल मीडिया वर टाकणे आवश्यक नसते; काहीआठवणी फक्त कुटुंबापुरत्याच जपल्या तर त्या अधिक सुरक्षित राहतात. मुलांनाही लहान वयापासून डिजिटल जबाबदारी शिकवणे आवश्यक आहे. इंटरनेटवर टाकलेली माहिती कायमस्वरूपी राहू शकते, प्रत्येक पोस्टचा परिणाम होऊ शकतोआणि वैयक्तिक माहितीचे महत्त्व काय आहे, हे त्यांना समजावून सांगणे ही आजच्या पालकांची जबाबदारी आहे.

तंत्रज्ञानाने आठवणी जपणे सोपे केले आहे, पण त्याआठवणी कोणापर्यंत पोहोचतात याची जबाबदारीही आपलीच आहे. आज पोस्ट केलेला एक फोटो किंवा व्हिडिओ अनेक वर्षांनीमुलाच्या शिक्षणावर, करिअरवर, सामाजिक प्रतिमेवरकिंवा वैयक्तिक सुरक्षिततेवर परिणाम करू शकतो.म्हणून प्रत्येक पालकाने सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारावा- “ही माहिती माझ्या मुलाच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे का?” जर उत्तर निश्चित नसेल, तर तो फोटो किंवा माहिती पोस्ट न करणे हाच सर्वात सुरक्षित निर्णय आहे. कारण मुलांच्याआयुष्यातील सर्वात मौल्यवान वारसा केवळ चांगले शिक्षण किंवासंपत्ती नसून, त्यांची सुरक्षित आणि स्वच्छ डिजिटल ओळख देखीलआहे.

(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)

dnyandev.najan@yahoo.in