हल्ली सर्वत्र महिला सक्षमीकरण, महिला किती खंबीर असतात यावर चर्चा रंगताना दिसते. ‘एक नारी सब पर भारी’ ही हिंदीतील म्हण ऐकली की स्त्री म्हणून अंगावर रोमांच उभे राहतात. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील एक डायलॉग अजूनही बऱ्याचदा चर्चेत असतो. ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन’ आता हेच विधान ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ वुमन’ असे असायला हवे, असे राहून राहून वाटते. आपल्या लहान भावाचा सांभाळ करण्यापासून ते मुलाला जन्म देणे, त्यांचा सांभाळ करण्यापर्यंत सर्वच गोष्टी महिलांना फार उत्तम पद्धतीने जमतात.

काल एका कार्यक्रमाला गेले होते. सगळ्यांची जेवणं झाल्यावर घरातल्या स्त्रिया जेवायला बसल्या. जेवताना आपसूकच गप्पा रंगत गेल्या. पाककृतीपासून सुरू झालेल्या या गप्पा स्त्री किती खंबीर असते इथपर्यंत येऊन थांबल्या. जुन्या आठवणीत रमताना मुलीची आजे सासू म्हणाली, “माझ्या जावयानंतरही माझी मुलगी खंबीरपणे उभी राहिली. तेव्हा काही पर्यायही नव्हता.” लगेचच त्यांची मोठी मुलगी म्हणाली आपण किती दिवस तेच धरून बसणार? मुलांसाठी, आजूबाजूच्या आपल्या लोकांसाठी आपल्याला पुढे जायलाच हवं. जाणारं माणूस अचानक निघून जात पण मागच्याना उभं राहून पुढे जावंच लागतं. त्यात स्त्री असेल तर ती उसनं अवसान आणून का होईना उभी राहतेच. या धर्तीवर स्त्रीला अबला नारी म्हणावं का? हा खरंच प्रश्न आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
working women

स्त्रीची शारीरिक शक्ती जरी कमी पडत असली तरी मानसिक दृष्टीने ती पूर्णपणे सक्षम असते. आज त्या मुलीच्या सासूने त्यांच्या लहान वयात नवरा गेल्यानंतरही मुलाला चांगलं शिक्षण देऊन, त्याचं लग्न करून दिलं. त्या स्वतःही तितक्याच आनंदी आणि उत्साही आहेत. ही कौतुकाची गोष्ट नाही का? नवरा गेला म्हणजे सगळं काही संपलं, आता आपलं जग बंद पडलं असं न करता अनेक स्त्रिया स्वतःचं वेगळं जग उभं करतात, सांभाळतात. सर्व कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात, छान नटतात सजतात, एखादी कला शिकतात आणि स्वतःला पुढे घेऊन जातात.

करोनाकाळात अनेक स्त्रियांनी केवळ आपला नवराच नाही तर आई -वडील, सासू -सासरे अशी जवळची लोकं गमावली. त्यातील कित्येकांना लहान लहान मुलं होती त्यांच्यासाठी त्यांना उभं राहणं भागचं होतं. त्या स्वतः तर लवकर सावरल्याचं पण आपल्या घरालाही त्यांनी सावरलं. एवढंच नाही तर आजूबाजूच्यांवर जेव्हा अशी वेळ आली तेव्हा त्यांनाही मदत करायला त्या तत्पर होत्या.

या स्त्रिया कोणी ‘सुपरवुमन’ होत्या का तर नाही. तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य होत्या. काही तर नोकरीदेखील करत नव्हत्या त्या नोकरीसाठी घराबाहेर पडल्या. काहींनी इन्शुरन्सची वगैरे काम कधीच केली नव्हती. आतापर्यंत नवराच सगळं पाहायचा. पण म्हणून आता वेळ आल्यावर त्या अडून न बसता गरजेचं आहे ते शिकत, करत एकखांबी तंबू झाल्या.

working women
working women

माझं असंही निरीक्षण आहे जर बायकोआधी नवरा गेला तर ती स्त्री पुढची अनेक वर्ष जगते, आपल्या आयुष्याला नव्याने अर्थ देते पण नवऱ्याचं असं होतंच असं नाही, एकतर तो कोलमडून पडतो किंवा मग खूप जास्त अवलंबून असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीतही गोंधळ करणं सुरु होतं. तर काही जण आयुष्यातून लवकर एक्झिट घेतात. कारण खूप कमी पुरुषांनी घर आणि घराबाहेरची काम बायकोच्या हयातीत सांभाळलेली असतात.

सांगण्याचा अर्थ एकच की स्त्री वयाने लहान असू दे किंवा मोठी, तीचं शिक्षण, आर्थिक अडचणी, नवरा, मुलं या सर्व जबाबदाऱ्या ती सबला होऊन सांभाळते, पुढे जाते. तसंच एखादी आर्थिक अडचण आल्यावर ती फार धीराने उभी राहते. तर सासू -सासऱ्यांसाठी ती त्यांची लेकही होते आणि नवरा -मुलांसाठी घराचा आधारही… ! यामुळेच ‘डोन्टअंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ वुमन हे वाक्य जगातील प्रत्येक मुलीला, महिलेला किंवा स्त्रीला हुबेहूब लागू होतं!