गजर वाजला, दिवस उगवला. सकाळची धावपळ. घाईघाई. मात्र सगळं आवरायला घरच्यांनी आवर्जून मदत केली. त्यामुळं ठरलेली लोकल पकडून ती वेळेत कार्यालयात पोहचू शकली. ती बॉस होती तिच्या टीमची. सगळ्यांना सांभाळून घेत, कुणाला चुकचुकारत, कुणाला जरा आवाज चढवून तिनं प्रत्येकाला कामाला लावलं. तिला स्वतःलाही तिच्या कामावर लक्ष केंद्रित करता आलं आणि ते काम ठरल्या वेळापत्रकानुसार पूर्ण झालं. टार्गेट अचिव्ह म्हणत टीमनं थम्स अप केले. त्याच आनंदात स्टेशनवर आल्यावर लोकल उभी होती. पटकन चढली आणि चक्क विंडो सीट मिळाली. वाटभर आवडतं पुस्तक वाचता आलं. रिक्षावाल्यानं न कुरकुरता घरापाशी रिक्षा उभी केली.

आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

सोफ्यावर टेकल्याक्षणी वाफाळत्या कॉफीचा मग बाबांनी अर्थात सासऱ्यांनी तिच्या हातात ठेवला. मुलांनी मस्ती थांबवली नाही, पण आवरती घेतली. ती फ्रेश होऊन स्वयंपाकघरात गेल्यावर आईंनी अर्थात सासूबाईंनी कुकर लावलेला होता. तिनं पटकन भाजी निवडून फोडणीस टाकली. नवऱ्यानं पटापट पानं मांडली. मुलांनी सगळ्यांची ताटं वाढली. आपापले फोन बाजूला ठेवून, टीव्हीचा कान पिरगळून सगळे एकदम जेवायला बसले. दिवसभरच्या मोकळ्या गप्पाटप्पा झाल्या. मागचं आवरायला नवऱ्यानं मदत केली. मग मुलं निमूटपणं अभ्यासाला येऊन बसली. दोघांनी मिळून त्यांचा अभ्यास घेतला. त्यांच्या प्रकल्पांत त्यांना मदत नाही, पण योग्य ते मार्गदर्शन केलं आणि मुलांच्या कल्पना फुलायला वाव दिला. दरम्यान, दोघांच्या ऑफिसमधून कामाचे फोन्स, ईमेल्स सुरू होते, ते मार्गी लावले. घड्याळाचे काटे पुढं पुढं सरकू लागले. तिनं दुसऱ्या दिवशी सकाळची जुजबी तयारी करून ठेवली आणि ती झोपी गेली.

सकाळी गजर वाजला, दिवस उगवला. बाकी सगळ्या गोष्टी थोड्याफार फरकानं आदल्या दिवशासारख्याच घडल्या आणि घडत राहिल्या, घडत राहाव्यात. त्या तशा घडत राहिल्या तर मग कदाचित एखादं वर्ष असं येईल की, महिला समानता दिवस साजरा करण्याचं काही कारणच उरणार नाही. काहींना हे वरचं उदाहरण फार आदर्श-बिदर्श वाटेल. पण ते तसं नाही. कारण त्यात तीच्या जागी तो कल्पून पाहा. तो तर हे सगळं आत्ताही अनुभवतो आहे. सासू-सासरे किंवा आई-वडील, मुलं किंवा अगदी कार्यालयातले कर्मचारी हे सगळे आपापल्या जागी आहे तस्सेच आहेत. म्हणजे मग फक्त ती बदलते आहे की बाकीच्यांनी बदलायला हवं आहे? तिचं मन, तिचं मत, तिचे निर्णय, तिचे अधिकार, तिचा वेळ, तिचं काम, तिची उर्जा इत्यादी, इत्यादी आणि सगळ्यात महत्त्वाची ती स्वतः… ती स्वतः, तिचं अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं या भोवतालच्या सगळ्यांचं आहे.

आणखी वाचा : तंत्रज्ञान आणि असमानता : बाईला कशाला लागतो मोबाईल?

खरंतर असा महिला समानता दिवस वगैरे केवळ एका ठराविक कक्षेपुरता मर्यादित राहतो आहे. त्याचा परीघ विस्तारायला हवा. त्यासाठी प्रत्येकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणं, पूर्वांपार मानसिकता बदलणं अशा काही गोष्टी घडायलाच हव्यात. त्या तशा झाल्या तर मग कदाचित ही समानता सर्वदूर पाझरली तर खरं. खरंतर ती, तो, समानता याहीपेक्षा सध्याच्या काळात किमान माणुसकीनं समोरच्याशी वागणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण प्रत्येकानं त्याबद्दलचा विचार करून तो प्रत्यक्षात आचरायला हवा. गजर वाजला, दिवस उगवला… या गोष्टीतला हा दिवस आणि माणुसकीचा दिवस कधीतरी उगवेल, अशी आशा आहे आणि आशा अमर आहे…