Women Need More Sleep Than Men: घरात सगळ्यात पाहिले उठून सगळ्यात शेवटी झोपणारी कुटुंबातील एकमेव सदस्य म्हणजे आई. प्रत्येक सदस्याला त्याच्या ऑफिस, शाळेच्या वेळेत उठणे, त्यांचा डबा करून देणे, घर आवरणे, स्वयंपाक करणे आदी अनेक गोष्टी करण्यात तिचा पूर्ण वेळ निघून जातो. दिवसभराच्या या धावपळीत तिला रात्रीच्या झोपेव्यतिरिक्त फक्त दुपारची झोप निवांत घ्यायला मिळते. तर आज आपण या लेखातून पुरुषांपेक्षा महिलांनी किती वेळ जास्त झोपावे? त्याचे कारण व आरोग्यदायी फायदेसुद्धा जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्रियांना अतिरिक्त झोप आवश्यक असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. अभ्यास असं दर्शवितो की, स्त्रियांना पुरुषांपेक्षा सरासरी ११ मिनिटे जास्त झोप लागते. जरी हा एक लहान फरक वाटत असला तरी एकूणच आरोग्यावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. स्लीप फाउंडेशननुसार हे तर्क महिलांच्या हार्मोन्सकडे लक्ष्य केंद्रित करत असतात. कारण स्त्रियांना आयुष्यभर हार्मोनल बदलांचा अनुभव येत असतो – मासिक पाळी, गर्भधारणा, रजोनिवृत्ती यापैकी प्रत्येक टप्पा झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणू शकतो, त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांना इन्सोमनिया (निद्रानाश) होण्याची शक्यता ४० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

जेव्हा शरीरविज्ञानाचा विचार केला जातो, तेव्हा झोप हे स्त्रियांच्या हार्मोन्सची खूप मोठी भूमिका बजावतात. महिला आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर आयलीन अलेक्झांडर यांनी ग्लॅमर मासिकाला सांगितले की, “एकंदरीत याचा अर्थ असा आहे की, स्त्रियांना झोपेची जास्त गरज आहे. यातच दिवसा झोपण्याची त्यांची शक्यता जास्त आहे. “

हेही वाचा…Mumbai Influencer: सीए होती इन्फ्ल्युएन्सर अन्वी कामदार; दरीत पडून झाला मृत्यू; मुंबईच्या रील स्टारबद्दल जाणून घ्या ही माहिती

सात ते नऊ तास झोपावे :

जैविक घटकांच्या पलीकडे सामाजिक अपेक्षा, जबाबदाऱ्यादेखील स्त्रियांच्या झोपेच्या गरजांमध्ये अडथळे आणतात. ग्लॅमर मासिकाच्या म्हणण्यानुसार संशोधनात असे दिसून आले आहे की, स्त्रिया बहुतेक वेळा घरगुती कामे, इतरांची काळजी घेण्याची कर्तव्ये पार पाडत असतात; ज्यामुळे त्यांच्या शरीरात थकवा, तणाव वाढतो. महिला आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर आयलीन अलेक्झांडर म्हणाल्या की, अनेकदा महिला रात्रभर उठून मुलांना किंवा वृद्ध पालकांना आधार देतात. या सर्व गोष्टींमुळे संज्ञानात्मक कार्य पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि राखण्यासाठी अधिक झोपेची आवश्यकता असू शकते.

वैयक्तिक झोपेच्या गरजा व्यक्तीनुसार म्हणजेच वय, जीवनशैली, त्यांचे आरोग्य यांसाख्या घटकांवर अवलंबून असतात. पुरुष व महिलांच्या झोपेची आवश्यकता समजून घेण्यासाठी तज्ज्ञांनी संशोधन केलं. पुरेशी झोप न मिळाल्याने पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे महिला आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर आयलीन अलेक्झांडर म्हणाल्या. तुम्हाला योग्य विश्रांती मिळण्यासाठी तज्ज्ञांनी प्रौढांना रात्री सात ते नऊ तास झोपण्याची शिफारस केली आहे. तुम्हाला अजूनही पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचे आढळल्यास, तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही संवाद साधून घ्या.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women need eleven minutes more sleep than men do expectations and responsibilities also contribute to women sleep needs asp
Show comments