आपल्या शरीराची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण महिला मात्र त्यांच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. नोकरी करणाऱ्या महिला असोत किंवा घरी राहणाऱ्या स्वत: कडे पाहण्यासाठी, स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अगदी अंघोळीसारखं साधं उदाहरण घ्या. घरातल्या बाईची अंघोळ अनेकदा घाईघाईतच उरकली जाते. गरमागरम पाणी, आपला आवडता साबण किंवा बॉडी वॉश याचा मनासारखा आनंदही कित्येकजणी घेऊ शकत नाहीत. हात -पाय किंवा डोकं दुखणं, सर्दी खोकला, पोटदुखी या सगळ्याला सर्वसामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. असंच सर्रास दुर्लक्ष होतं ते स्त्रियांच्या स्वत:च्या नाजूक म्हणजेच इंटिमेट भागाकडे. खरंतर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणचे या नाजूक भागांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

इंटिमेट म्हणजेच प्रायव्हेट भाग (Intimate Parts) स्वच्छ राखणं अत्यंत आवश्यक आहे. हे भाग स्वच्छ राहिले तर जंतुसंसर्ग अर्थात इन्फेक्शनचा धोका कमी असतो. विशेषत: जननेंद्रियांच्या (Vagina) स्वच्छतेकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मुलींना लहानपणापासूनच या भागांची निगा राखण्याची सवय लावली पाहिजे. टीनएजर मुलींनाही या भागाच्या स्वच्छतेचं महत्त्व समजून देणं गरजेचं आहे. जर योग्य ती स्वच्छता राखली गेली नाही तर मासिक पाळीच्या दरम्यान योनीच्या आसपास जंतुसंसर्ग (Bacterial Infection) होण्याची शक्यता खूप जास्त असते. अगदीलहान मुलींनाही, ज्यांची मासिक पाळी सुरु झालेली नाही त्यांनाही त्या भागाची स्वच्छता करण्याची सवय लावणं गरजेचं आहे. शौचाला जाऊन आल्यावर ती जागा पुढून मागे अशी धुणे गरजेचे आहे. यामुळे जंतूसंसर्ग आणि विशेषत:युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते. बघूयात याच महत्त्वाच्या भागाच्या स्वच्छतेबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी-

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

१) रसायनयुक्त/ सुगंधी साबणाचा वापर टाळा-

सुगंधी साबण किंवा सुगंधी बॉडी वॉशनं अंघोळ करणं सगळ्यांनाच आवडतं. पण ‘त्या’ जागेच्या स्वच्छतेसाठी मात्र सुगंधी साबण टाळावा, असं तज्ञांचं मत आहे. ग्लिसरीन, परफ्युम्स आणि अँटीसेप्टीक्स सारख्या केमिकल्समुळे योनीतील जंतुंचं हेल्दी संतुलन बिघडू शकतं. त्या जागेची जळजळ होऊ शकते आणि हानिकारक जंतुंची वाढ होऊ शकते. शरीराच्या अन्य भागांसारखं तुमच्या योनीला अतिरिक्त सुरक्षा कवच नसतं. त्यामुळे जास्त रसायनं असलेल्या साबणानं कोरडेपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सतत असे साबण वापरू नये.

२) सॅनिटरी पॅड्स बदलणं महत्त्वाचं (Change Sanitary Pads)

मासिक पाळी सुरु असताना दर तीन ते चार तासांनी सॅनिटरी पॅड बदलणं अत्यंत आवश्यक आहे. रक्तस्त्राव खूप जास्त होत नसेल तरीही पॅड काही ठराविक वेळानं बदलायलाच हवेत. तुम्ही पॅडऐवजी टॅम्पून्स वापरत असाल तर तेही दर तीन तासांनी बदलायला हवेत.
मेन्स्ट्रुअल कप वापरत असाल तर त्याची योग्य ती निगा राखणं गरजेचं आहे. तो वापरण्याआधी डिस्इन्फेक्टेड करून घेणं गरजेचं आहे. पाळीच्या दरम्यान कॉटन पँटीचाच वापर करणं योग्य आहे.

३) स्नान करताना काळजी घ्या –

रोज सकाळी अंघोळ करताना प्रायव्हेट जागाही स्वच्छ करणं आवश्यक आहे. योनीची रचनाच अशी आहे की ती फक्त पाण्यानं स्वच्छ केलं तरी पुरेसं आहे. शक्यतो योनी स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही साबणाचा वापर करु नये, अगदीच केला तरी कमीत कमी रसायनं असलेला साबण वापरावा.
४) सेक्सनंतर बाथरुमला जाऊन येणं गरजेचं आहे. शक्यतो युरीन पास करणं चांगलं असं तज्ञांचं मत आहे. झाल्यानंतर त्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवायला विसरुन नका.
५) सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आतल्या कपड्यांची योग्य निवड. फक्त फॅशनच्या आहारी न जाता आपल्याला जे कपडे आरामदायी वाटतील तेच निवडावेत. अतिघट्ट कपडे वापरू नयेत. शक्यतो कॉटनच्याच कपड्यांचा वापर करावा. त्या जागी जास्त घाम येणं, ती जागा ओलसर राहणं चांगलं नाही. त्यामुळे तिथे हवा मिळू शकेल असे सैलसर कपडे घालावेत.
६) व्यायाम केल्यानंतर पँटी ओली झाली असेल तर ती बदलणं आवश्यक आहे. स्वच्छ धुतलेले आणि कोरडेच कपडे वापरावेत. पँटीसारखे कपडे ओलसर राहिले तर त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
७) सार्वजनिक ठिकाणी लघवी किंवा शौचास जाणार असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर जंतुनाशक लिक्विड सोपनं हात धुणं गरजेचं आहे. हल्ली छोटे आणि पोर्टेबल जंतुनाशकं मिळतात. तुम्ही प्रवास करत असताना अशी जंतुनाशकं जवळ ठेवायला विसरु नका.
८) वयाच्या चाळीशीनंतर नियमित हेल्थ चेकअप करणं तर गरजेचं आहेच. पण त्यातही मेमोग्राफी आणि PAP SMEAR PELVIC EXAMINATION करणंही गरजेचं आहे.
९) प्युबिक हेअर म्हणजे ‘त्या’ जागी असलेले केस काढण्याचा ट्रेण्ड अलिकडे वाढत आहे. पण शक्यतो असे केस काढले जाऊ नयेत असं तज्ञांचं मत आहे. तुम्हाला जर प्युबिक हेअर शेव्हिंग करायचं असेल तर त्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.