scorecardresearch

Premium

पीरियड्सवरून होतेय तुमची ऑफिसमध्ये टिंगल?

दर महिन्याला मासिकपाळी येणं आणि त्याचा कमी अधिक त्रास प्रत्येक मुलीला, स्त्रीला होणं, ही खूपच सार्वत्रिक बाब आहे. मात्र आजही पुरुष मंडळींकडून यावर एकतर चुप्पी साधली जाते किंवा मग टिंगळटवाळी केली जाते. तुमच्याही ऑफिसमध्ये होते तुमची चेष्टा?

Women Periods, Physical mental stress, Office work culture teasing
पीरियड्सवरून होतेय तुमची ऑफिसमध्ये टिंगल? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“ या आठवड्यातच जास्त तास वेळ देऊन ही कामं निपटून टाक. पुढच्या आठवड्यात तुझे प्रॉब्लेम्स पुन्हा सुरू होतील. तेव्हा तू प्रोजेक्टमध्ये पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीस ना?” मानसीच्या बॉसनं असं म्हटल्यावर तिनं चमकून त्यांच्याकडे बघितलं. ते शांत होते. आपल्याला दर महिन्यात येणाऱ्या पीरिएडचा खूप त्रास होतो हे जरी खरं असलं तरी त्याचा उल्लेख बॉसकडून ऐकल्यावर तिला जरा लाजिरवाणं झालं. यांना आपल्या पीरिएडच्या तारखा लक्षात आहेत या विचाराने ती जरा ओशाळली, लाजण्यासारखं, लपवण्यासारख्या त्यात काहीही नाही तरीही.

ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया हे माहीत असतानाही तिला असा सरळ उल्लेख जरा खटकलाच. ओटीपोटात दुखणं हा त्रास सगळ्याच स्त्रियांना होतो असं नाही, पण काहींना असह्य त्रास होतो हेही तितकंच खरं. त्याकाळात आपले किमान दोन दिवस तरी खूप थकवा आणणारे असतात. कामावर परिणाम होतो मी मान्य करते. त्यावर उपाय करणं सुरू आहे, पण या विषयावरून ऑफिसमधील पुरुषांनी जरा सामंजस्य दाखवण्याची गरज आहे. निसर्गानेच ही जबाबदारी स्त्रियांवर टाकलेली आहे तर त्याचा विचार व्हायला हवा.

saarthak aneja weight loss story
Weight Loss Story : १३३ किलोच्या तरुणाने केवळ पाच महिन्यात केलं ४८ किलो वजन कमी, जाणून घ्या त्याचे फिटनेस सिक्रेट
Pitru Paksha Shradhh Dates Tithi Never Make These 5 Living Things Go Empty Hand From Home Pinddan Rules Tarpan Mahiti
पितृपक्षात कावळ्यासह ‘या’ ५ जीवांना रिकाम्या पोटी पाठवू नका; पूर्वजांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभू शकते
ganesh chaturthi 2023 konkani traditional fugdi grandmother enjoy konkani folk dance fugadi Ganpati Special fugadi Vide
हे फक्त कोकणातच पाहायला मिळेल! वयाचे भान विसरून आजीने लुटला फुगड्या खेळण्याचा आनंद; पाहा Video
Lucky Zodiac Sign
वयाच्या तिशीनंतर प्रचंड श्रीमंत होतात ‘या’ राशींचे लोक? शनिदेवाच्या कृपेने व्यवसायात मिळू शकतो भरपूर नफा

हेही वाचा… उचकीने हैराण

दोन महिन्यांपूर्वी ऑफिसमधील तिची मैत्रीण शेफाली सांगत होती, की लंच टाईममध्ये ऑफिसमधील तरुणांमध्ये स्त्रियांचे पीरियड यावर चेष्टा मस्करी चालू होती. एकजण म्हणाला, “ या बायकांचं बरं असतं पोट दुखतंय, बरं वाटत नाही या सबबी खाली दोन-तीन दिवस कामातून मस्त सुटका करून घेतात. खरंतर इतका त्रास नसतो होत बरं का! मलाही बहीण आहे ती नाही असली काही कारणं पुढे करत. ” दुसरा म्हणाला, ‘बाईपणाची जबाबदारी’ या सबबीखाली स्त्रिया खूप सहानुभूती गोळा करत असतात. आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त काम करतो खरंतर.”

हेही वाचा… शासकीय योजना: विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान

अनेक ऑफिसमध्ये स्त्रियांना पीरियड्सच्या काळात गरज पडल्यास विनातक्रार सुट्टी देण्यात येते. पूर्वीपेक्षा आजचा पुरुषवर्ग या बाबत बराच ‘साक्षर’ आहे. घरात आई किंवा बहीण मोकळेपणानं बोलत असतील तर या विषयावर त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजता असते. ती सहजता येणं गरजेचं आहे. त्याबद्दल बाऊ न करता थोडी संवेदनशीलता असणं आवश्यक आहे. या बाबतीत जान्हवी नशीबवान म्हणायची. एकदा ती ऑफिसमध्ये असताना तिच्या शेजारच्या डेस्क वरील अमोघने तिच्याजवळ येऊन तिला अगदी सौम्य शब्दात सांगितलं. “जान्हवी, तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही, पण तुला ताबडतोब ‘वॉशरूम’मध्ये जाण्याची गरज आहे. ओढणी गुंडाळून घे, आणि काही मदत लागली तर विनासंकोच मला सांग.” तिच्या डिपार्टेंटमध्ये ती एकटीच स्त्री असल्याने तिनं त्याचीच मदत घेतली आणि तारखेला न जुमानता अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाचा सामना केला. तिला आठवलं, की कॉलेजमध्ये कुण्या नालायक मुलाने वर्गातील मुलींची नावं आणि त्यांच्या संभाव्य पिरियड्सच्या तारखा बोर्डवर लिहिल्या होत्या. त्यावेळी प्रिन्सिपलांनी संपूर्ण कॉलेजला हॉलमध्ये एकत्र बोलावून एक माहितीपूर्ण लेक्चर दिलं होतं. तेव्हा पासून मुलांच्या वागण्यात खूपच फरक पडला.

हेही वाचा… ‘लिव्ह इन’ आणि बलात्काराच्या गुन्ह्याची गुंतागुंत!

मोठ्या शहरात ऑफिस आणि खासगी कंपन्यांमध्ये स्त्रियांसाठी स्वच्छतागृहात उत्तम सोय असते, पण इतर लहान शहरं आणि गावात अत्यंत वाईट अवस्था असते. या स्त्रियांना वाटतं, की आम्हाला जास्तीची सवलत नका देऊ, आम्ही वेदना सहन करत काम करू, सुट्टी नाही घेणार, पण किमान गरजा तरी पुरवल्या गेल्याच पाहिजेत. सहकर्मी पुरुषांची सहानुभूती आम्हाला नको, पण निदान टिंगल तरी करू नका.

सध्या एक आशेचा किरण म्हणजे पुरुषांच्या मानसिकतेत या हळूहळू बदल होत आहेत. आजची आई जागरूक होत असल्याने एक काळ असा येईल, की या विषयावर संपूर्ण समाजात सहजता येईल. त्यावर मोकळेपणाने बोललं जाईल. अगदी ऑफिसेसमध्येही तो दिवस नक्की येईलच.

adaparnadeshpande@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women periods physical and mental stress office work culture and teasing dvr

First published on: 26-09-2023 at 13:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×