सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या मागे घरातील कामाचे व्याप इतके असतात की, त्यांना घराबाहेर पडून काम करणं अवघड असतं. घरातील सर्व सदस्यांचं जेवण करणे, मुलांची तयारी करणे, कपडे धुणे अशी एक ना अनेक कामे या महिलांना करावी लागतात. या कामांमध्येच त्यांचा अर्धा दिवस जातो. त्यामुळे बाहेर जाऊन ऑफिसच्या वेळेनुसार काम करणं त्यांना शक्य होत नाही. पण चांगले उत्तम शिक्षण झालेल्या अनेक गृहिणी असतात. बाहेरच्या दुनियेत काय चाललंय याचं ज्ञान त्यांना असतं. शिवाय आपणही काहीतरी काम करुन पैसे कमवावेत अशी त्यांची इच्छा असते. पण कामाच्या व्यापातून त्यांना ते शक्य होत नाही.

मात्र, सध्याच्या डिजीटल जमान्यात अनेक महिला घरी बसून बाहेरची कामे करुन त्या पैसे कमवू शकतात. घरची जबाबदारी सांभाळत ज्या महिलांना काही बाहेरची काम करण्याची इच्छा असते. अशा गृहिणींना घरबसल्या पैसे कमवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी काही निवडक पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया घरबसल्या पैसे कमवण्याचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

हेही वाचा- गरोदरपणात तरी कमी श्रमाची कामं द्या!; महिला लोकोपायलट्सचा लढा

फ्रीलान्सिंग (Freelancing ) – हा गृहिणींसाठी जास्तीचे पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे. फ्रीलान्सिंगमध्ये तुमच्या आवडीच्या कामांचाही समावेश असतो. ज्यामध्ये लेखन, ग्राफिक डिझाइन, वेब डेव्हलपमेंट यासारख्या गोष्टी असू शकतात. फ्रीलान्सिंग हे असं काम आहे, जेघरातील कामं करुन महिला त्यांच्या स्वतःच्या वेळेनुसार पूर्ण करु शकतात.

ऑनलाइन सर्व्हे (Online Surveys) – अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर ग्राहकांची मतं जाणून घेण्यासाठी पैसे देण्यास तयार असतात. घरातून काम करणाऱ्या महिला असे सर्व्हे करणाऱ्या वेबसाइटवर साइन अप करुन काही प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवू शकतात.

ऑनलाइन विक्री – अनेक गृहिणींना विविध पदार्थ तयार करण्याची आवड असते. अशा महिला त्यांचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअर सुरू करू शकतात, ज्यामध्ये त्या काही गोष्टी स्वतः तयार करून त्यांची विक्री करू शकतात किंवा Etsy, Amazon, फ्लिफकार्ट आणि Ebay सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन काही वस्तूंची स्वस्तात खरेदी करून पुढे अधिक किमतीमध्येही त्या विकू शकतात.

हेही वाचा- लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : तांबीचा (copper T) वापर कसा करायचा?

शिकवणी – घरी राहणाऱ्या महिला एखाद्या कलेत किंवा विशिष्ट कौशल्यामध्ये पारंगत असतील तर त्या त्या विषयांची विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिकवणी घेऊ शकतात.

लहान मुलांना सांभाळणं – काही पालकांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे आपल्या मुलांना घरी ठेवून कामावर जावं लागतं. अशा मुलांची काळजी घेण्याचे कामही या महिला करु शकतात.

पाळीव प्राण्यांची देखभाल – ज्या गृहिणींना पाळीव प्राण्यांची आवड आहे, त्यांच्यासाठी पैसे कमावण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. तो म्हणजे पाळीव प्राण्यांची देखभाल करणे त्यांना फिरवण्यासाठी घेऊन जाणे.

हेही वाचा- लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!

ब्लॉगिंग – घरबसल्या पैसे कमवण्यासाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे. यामध्ये गृहिणी आपल्या आवडीचे काही ब्लॉग लिहायला सुरुवात करु शकतात. जसं की, स्वयंपाक किंवा तुमचे काही अनुभव तुम्ही लिहू शकता. तुमचा कॉन्टेन्ट उत्तम दर्जाचा असेल तर तुमच्या ब्लॉगला जाहिराती मिळतील ज्यातून तुम्हाला पैसे मिळू शकतात.

शॉपिंग आणि स्टाइलिंग – फॅशनची उत्तम जाण असेल तर ग्राहकांना वैयक्तिक खरेदी आणि स्टाइलिंग सेवा देऊनही गृहिणी पैसे कमवू शकतात.

घरबसल्या पैसे कमावण्याचे हे विविध मार्ग गृहिणींना उपलब्ध आहेत. हे पर्याय हे काही अधिकचे पैसे कमावण्यासाठीचे आहेत. त्यामुळे ते तुमच्या इतर ठिकाणांहून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी पर्याय ठरु शकत नाहीत. परंतु या कामातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तुम्ही तुमची बचत वाढवणं, कर्ज फेडणे अशा काही बाबींसाठी करु शकता. या कामांमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घरबसल्या थोडीफार आर्थिक मदत करु शकता. त्यामुळे आता घरातील कामे करुन उरलेल्या वेळेत तुम्ही आवडीचे काम करुन पैसे कमवू शकता.