‘‘काय तो स्टेज… काय ती सजावट… सगळ्या बायका कशा झकास तयार होऊन आल्या आण मी मात्र असं ध्यान… मला काय माहिती व्हतं इथं शीएम आणि बाकी येता… गावचा सरपंच, गावातील आमची बचत गटातील ताई चला म्हटलं की चालू लागायचं… या वेळेस तर गाडीभी होती फकस्त पैका नाही दिला… मला म्हणले, लाडक्या योजनेचा अर्ज भरला की खात्यावर पैसे जमा होतील… योजना वगैरे नाही माहिती, गाडी आणि सोबत होती त्यामुळे इथवर आले.. बाकी फारसं काही ठाऊक नाही…’’ अकोल्याच्या भीमाबाई तांबे सांगत होत्या.

‘‘बहिणीचं नुकतंच लग्न झालं आहे. ती माहेरी आली आहे. आईचं नाव यादीत होतं. पण ती म्हणाली, मी हिच्या जवळ थांबते. तू जावून ये. सगळे सोबत आहे तर… इथे आले तर खायलापण उशिरा मिळालं… स्वच्छता गृह नाही. फिरतं शौचालय दिसलं त्यात जावून आले. किती वेळ लागतो नाही माहिती.’’ २१ वर्षीय रुकसाना शेख सांगत होती..

Parents silent actions affect children
पालकांच्या निशब्द कृतीचा फटका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Working Women
Why Women Choosing to Stay Single : चूल आणि मूल सोडा, आता महिलांना लग्नच नकोसं झालंय, नव्या सर्वेक्षणातून २०३० ची सामाजिक स्थिती उघड!
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
NEW BORN GIRL
“मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

तर गावातील अंगणवाडी सेविका असलेल्या सीमा जाधव म्हणाल्या… ‘‘बायका गोळा करणं सोप्प नसतं, तेही या पावसात. शेतीची कामं सुरू आहेत गावा गावात, पण आणलं या महिलांना इथवर… घरी सुखरूप गेल्या की संपलं आजचंच काम… एक सांगते, मी आणलेल्या बायकांची संख्या पाहून माझी किती वट आहे गावात हे तर लक्षात येईल… याचा पुढे काही फायदा झाला तर…’’

आणखी वाचा-स्वप्न जगणारी ‘बाईक गर्ल’ झेनिथ इरफान

शासनाच्या ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात’ उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेच्या उपस्थितीमागे एक कारण होतं. बहुतेक महिला आपण कुठल्या तरी शासकीय योजनांचे लाभार्थी होऊ शकू या इ्च्छेने आलेल्या, तर काहींना आपण का आलो हाच प्रश्न पडलेला… त्यात कार्यक्रम सुरू असताना पावसानं हजेरी लावली तसं अनेकींनी मंडपातून काढता पाय घेतला…

खरं तर कुठलाही सार्वजनिक प्रशासकीय अथवा राजकीय कार्यक्रम म्हटला की गर्दी जमवण्याचं आवाहन आयोजकांसमोर असतं. अशा वेळी राजकिय सभा असल्या तर पैशाने प्रश्न सुटतो, पण प्रशासनाच्या चौकटीत राहत गर्दी जमवायची तर हे शिवधनुष्य पेलणं अवघड होऊन जातं. मग अशा काही कार्यक्रमांसाठी महिलांना एकत्र केलं जातं. त्या कितीही बडबड करत असल्या तरी त्यांना फारसे प्रश्न पडत नाही आणि पडले तर त्या विचारत नाहीत, याचाच फायदा या मंडळीकडून घेतला जातो. मग एखादी शासकीय योजना कशी भारी आहे, त्याला पात्र होण्यासाठी काय करावं लागेल, तुझं सरकारी कार्यालयात अडकलेलं काम हे करून देईल एवढी या कार्यक्रमाला ये… गावात तुमची वट आहे बाई-माई-आक्का-ताई, काम करा, पुढे निवडणुका आहेत. एखादं तिकिट नाही तर पद तुम्हाला सहज मिळून जाईल… अशी वेगवेगळी आमिषं दाखवली जातात. या आमिषांना बायका बळी पडतातच असं नाही, पण राजकारण आणि सार्वजनिक कार्यक्रमांत नेत्यांचा सहज असलेला वावर… त्यांनी आपलेपणाचे चढवलेले मुखवटे महिलांवर गारूड करतात आणि त्या या आभासी निव्वळ आश्वासनाच्या पावसानं चिंब असलेल्या कार्यक्रमात सहभागी होतात. त्या ठिकाणी पुरूष जसे सुटाबुटात नसले तरी टापटिप येतात तशा महिलाही अंगभर दागिने, भरजरी साड्या घालून टेचात वावरतात. बरोबरच्या सखींसोबत सेल्फीही होतो. जमलं तर त्या राजकीय नेत्यांसोबत किंवा आपल्या वरिष्ठांसोबत फोटो काढत आधी स्टेटस विथ, मग तो फोटो आणि काही ओळी समाजमाध्यमांवर पोस्ट होतात… आपली उठबस कुठल्या वर्तुळात हे दाखवून देण्याचा केविलवाना प्रयत्न होतो… पण पुढे काय?

आणखी वाचा-“मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!

सभा, राजकीय कार्यक्रम किंवा असे काही अन्य सार्वजनिक कार्यक्रम यांना महिलांची असणारी लक्षणीय गर्दी नेमंक काय अधोरेखित करते, हा प्रश्न अस्वस्थ करून जातो… कारण येथून परतणाऱ्या महिलांना तु्म्ही का आलात हे विचारलं की बऱ्याचदा उत्तर असतं की, अमुक एका व्यक्तीनं सांगितलं म्हणून… खरं तर राजकीय लोकांना जाहीरपणे प्रश्न विचारण्याचं हे एक व्यासपीठ असतं, तुम्ही निडरपणे इथे प्रश्न विचारू शकता, पण तसं होत नाही. राजकीय पुढाऱ्यांना वास्तव परिस्थितीची जाणीव करून देण्याची हीच नामी संधी असते. पण हे घडताना दिसत नाही. गर्दीचा एक भाग होणाऱ्या या स्त्रियांना आहे गरज आहे आत्मभान येण्याची…