‘चूल आणि मूल’ या चौकटीबाहेर पडून महिला विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत आहेत. घराचा उंबरठा ओलांडून महिला दिवसेंदिवस अधिकाधिक स्वावलंबी होत आहेत. जगातील अनेक देशांची धुरा महिलांच्या हातात आहे. बहुतांश कंपन्याचा कार्यभारही त्या समर्थपणे सांभाळत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्वच क्षेत्रात वरचढ ठरताना दिसत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, कला यासह अनेक क्षेत्रात स्रिया आघाडीवर असल्या तरी अशी काही क्षेत्रं आहेत ज्यात त्या पुरुषांपेक्षा जास्त वर्चस्व गाजवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!

शिक्षक/प्राध्यापक

स्त्रिया मूळात काळजीवाहू असल्यानं शिक्षक किंवा प्राध्यापक पदासाठी त्या योग्य ठरतात. जगात महिला शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बालवाडी, प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांसह विद्यापीठांमध्ये विविध विषय शिकवताना महिला दिसतात. या क्षेत्रातील वेतनश्रेणीही जास्त आहे.

‘हॉस्पिटॅलिटी’ क्षेत्रात आघाडीवर

हॉस्पिटॅलिटी क्षेत्र हे आणखी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, ज्याठिकाणी अनेक स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसून येतात. प्रादेशिक आणि कॉर्पोरेट व्यवस्थापन, महसूल व्यवस्थापन, वित्त आणि मानवी संसाधन व्यवस्थापन या भूमिकांचा या क्षेत्रात समावेश आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स आणि एअरलाईन क्षेत्रातील कंपन्या पर्यटकांचं आदरातिथ्य करण्यासाठी महिलांनाच प्राधान्य देतात.

सॅनिटरी पॅड्समधल्या ‘या’ रसायनामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

पारिचारिका

संगोपन करण्यात अथवा एखाद्याची काळजी घेण्यात महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळेच रुग्णालयांमध्ये रुग्णांची काळजी घेण्यासह त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महिला पारिचारिकाच अधिक प्रमाणात कार्यरत असतात. किंबहुना म्हणूनच नर्स असा शब्द उच्चारला तरी नजरेसमोर निळ्या-पांढऱ्या गणवेशातील महिलाच येतात.

विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्नाच्या बाजारात नेमकं काय विकलं जातं?

लेखापाल/अकाऊंटन्सी…

अकाऊंटन्सी हे पूर्णत: पुरुषाभिमुख काम आहे, असं मानणं चुकीचं आहे. पैशांचे उत्तम व्यवस्थापन करत महिलांनी याही क्षेत्रात छाप पाडली आहे. योग्य ठिकाणी, योग्य वेळी पैसा कसा गुंतवायचा किंवा काटकसर कुठे करायची? याचं ज्ञान उपजतच महिलांना अवगत असतं. पैसा चांगल्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता महिलांमध्ये खासकरुन दिसून येते.

समुपदेशन : बॉयफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड नात्यातला तोल

पशुवैद्यकीय क्षेत्रात महिलांची आगेकूच

प्राण्यांची भीती वाटत नसेल, तर एक स्त्री सर्वोत्तम पशुवैद्यकीय अधिकारी होवू शकते. स्त्रिया पाळीव प्राण्यांवर खूप वेगळ्या प्रकारे प्रेम करतात. प्राण्यांची तपासणी, त्यांना इंजेक्शन देण्यापलिकडे स्त्री पशूवैद्यक प्रेम आणि आपुलकीच्या ओलाव्यासह प्राण्यांवर उपचार करतात. त्यामुळे या भूमिकेसाठी स्त्रिया सर्वोत्तम मानल्या जातात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens are more dominant in teaching veternity hospitality nursing and accountancy fields rvs
First published on: 25-11-2022 at 07:30 IST