Yoga Asanas for Women : पवन मुक्तासन
वाढत्या वयामध्ये मानसिक ताणांमुळे वा वापरामुळे सांधे व स्नायूंमध्ये भरपूर ताण जाणवतो. हा ताण कमी करण्यासाठी आसनसाधना सुलभ होण्यासाठी पवनमुक्तासन मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. देह साधनेमध्ये या शिथिलीकरणाला आत्यंतिक महत्त्व आहे. खूप कठीण आसने करता आली नाहीत, तरी अगदी चालेल. पवनमुक्तासने केली तरी पुरते असे परमहंस स्वामी निरंजनानंद म्हणतात. शरीरातील अगदी पायाच्या बोटाच्या हालचाली पासून सुरुवात करूया.

यासाठी प्रारंभिक स्थिती लक्षात घ्या.

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

बैठक स्थिती
पाय लांब, हात पाठीमागे, हातांचे कोपरे सरळ. पाठीमागच्या बाजूस किंचित रेलून बसा. कुठेही ताण नको. लक्ष फक्त श्वासावर एकाग्र करा. आता डोळे उघडून पायाचे पंजे सावकाश पुढे व मागे हलवा. कृती करताना श्वास घ्या. आसन सोडत असताना श्वास सोडा. घेतलेल्या प्रत्येक श्वासागणिक मी प्राण युक्त होत आहे व प्रत्येक उच्छवासागणिक मी तणावमुक्त होत आहे हा संकल्प करत राहा.  साधारण १० वेळा ही कृती केल्यावर पायाचे घोटे चक्राकार हलवा म्हणजे घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेने! हे करत असताना गुडघे व जांघेतील स्नायू व सांधे अत्यंत शिथिल ठेवा. दोन पायांमध्ये सुखावह असे अंतर ठेवा. पावले वरच्या दिशेला जाताना श्वास घ्यावा. पावले खालच्या दिशेने जाताना श्वास सोडा हे करताना सजगता अत्यंत महत्त्वाची!