पाचवा आणि खूप महत्त्वाचा नियम म्हणजे ‘अपरिग्रह’! ‘परिग्रह’ म्हणजे साठा करणे! आज आपले घर मोठे असो अथवा छोटे असो, आपल्याला जागा कमी पडते. याचे कारण आपल्याला खूप गोष्टी जमविण्याची सवय असते. ज्याप्रमाणे आपल्या मोबाइलमध्ये असंख्य फोटो, असंख्य मेसेजेस, कॉन्टॅक्ट्स यांनी मेमरी भरून जाते, त्याचप्रमाणे नको असलेल्या गोष्टींनी घर भरून जाते. नको असलेले विचार, आठवणी, कटू प्रसंग, परिचित नातेवाईक या साऱ्यांच्या चांगल्या व वाईट स्मृती याने मेंदू पूर्ण व्यापलेला असतो. हे रिकामे करायला, डीलिट करायला शिकणे खूप अवघड काम आहे. दिवाळीची स्वच्छता रोजच करायला हवी व नवीन आणण्याचा मोह टाळायला हवा. हे झाले तर ‘जन्मकथांत संबोध’ म्हणजेच पुढे जन्म कसे कसे येतील याचे ज्ञान होते, असे पतंजली म्हणतात. यात खोलवर विचार केला तर खरेच असे होऊ शकते का, याविषयी मनात शंका उपस्थित होते. परंतु अनुभव येईलच या विश्वासाने पावले टाकली तर कदाचित आपणच आपले शंका निरसन करू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा :मनाचा तोल सांभाळण्यासाठी उपयुक्त आसन

असे करा आसन
आज आपण एकपाद तोलासनाचा अभ्यास करूया. एका पायावर शरीराचा तोल सांभाळणे म्हणजे एकपाद तोलासन! हे करण्यासाठी प्रथम विश्राम अवस्था घ्या. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडा अथवा दोन्ही पायात अंतर घ्या. आता एकाच वेळी एक पाय गुडघ्यात दुमडून जमिनीपासून साधारणत: नऊ ते दहा इंच वर घ्या. त्याचप्रमाणे हातही वर उचला दोन्ही हातांचा पायांशी ९० अंशांचा कोन करा. आता एका पायावर दोन्ही हात बाजूला ठेवून शरीराचा तोल सांभाळा. पाऊल जमिनीला समांतर अथवा थोडे खाली झुकलेले ठेवा. सवय होईपर्यंत डोळे मिटू नका. अंतिम स्थितीत चार ते पाच श्वास थांबल्यावर विरुद्ध पायाने हीच कृती करा.

आणखी वाचा : शरीर व मनाचे संतुलन राखणारे आसन

आसनाचे फायदे
गुडघे, पायाचे घोटे यांचे आरोग्य सुधारते. मनावर ताबा आणता येतो. अर्थात व्हर्टिगो, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन जपून करावे.

ulka.natu@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogasan how control mind beneficial for brain concentration knee vp
First published on: 21-09-2022 at 09:00 IST