04 March 2021

News Flash

अफगाणिस्तानविरुद्ध वर्चस्वासाठी श्रीलंका उत्सुक

सलामीच्या लढतीत यजमान न्यूझीलंडकडून पराभूत श्रीलंकेला अफगाणिस्तानविरुद्ध दमदार वर्चस्वासह विजयाची अपेक्षा आहे.

| February 21, 2015 05:55 am

सलामीच्या लढतीत यजमान न्यूझीलंडकडून पराभूत श्रीलंकेला अफगाणिस्तानविरुद्ध दमदार वर्चस्वासह विजयाची अपेक्षा आहे. महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा मोठी खेळी करण्यासाठी आतुर आहेत. जबरदस्त फॉर्मात असलेल्या तिलकरत्ने, दिलशानकडून वेगवान खेळीची अपेक्षा आहे. अष्टपैलू आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
स्थिरावलेली भागीदारी फोडण्याचे काम करणारा आणि हाणामारीच्या षटकात आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध मॅथ्यूजला सूर गवसणे श्रीलंकेसाठी अत्यावश्यक आहे. गोलंदाजीत लसिथ मलिंगा, न्यूवान कुलसेकरा आणि रंगना हेराथ यांच्यावर भिस्त आहे. फसवे फुलटॉस आणि स्लोअरवन चेंडूवर विकेट मिळवणारा मलिंगा न्यूझीलंडविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाविरुद्ध फॉर्ममध्ये परतण्याची संधी मलिंगाकडे आहे.
अष्टपैलू थिसारा परेरा आणि जीवन मेंडिस श्रीलंकेसाठी उपयुक्त आहेत.
अफगाणिस्तानने बांगलादेशला विजयासाठी संघर्ष करायला लावला होता. गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य आणावे लागेल. अफगाणिस्तानच्या प्रमुख फलंदाजांवर संयमी खेळी करण्याची जबाबदारी आहे. अवांतर धावा आणि क्षेत्ररक्षणातल्या उणिवा सुधारण्याचे अफगाणिस्तानचे लक्ष्य आहे. मोहम्मद नबीसह गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स मिळवल्या होत्या. श्रीलंकेसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध धावा रोखण्याचीही जबाबदारी असणार आहे.

सामना क्र. : १२   श्रीलंका वि. अफगाणिस्तान
स्थळ : युनिव्हर्सिटी ओव्हल, डय़ुनेडिन   *वेळ : रविवारी पहाटे ३.३०
संघ
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), महेला जयवर्धने, कुमार संगकारा, लहिरु थिरिमाने, तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा, न्यूवान कुलसेकरा, दिनेश चंडिमल, दुश्मंथा चमीरा, रंगना हेराथ, दिमुथ करुणारत्ने, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके.
अफगाणिस्तान : मोहम्मद नबी (कर्णधार), अफसर झझाई, आफ्ताब आलम, अश्गर स्टॅनिकायझी, दावलत झाद्रान, गुलबदीन नईब, हमीद हासन, जावेद अहमदी, नजीबुल्ला झाद्रान, मिरवाइस अशरफ, नवरोज मंगल, नसीर जमाल, समीऊल्ला शेनवारी, शापूर झाद्रान, उस्मान

थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 5:55 am

Web Title: afghanistan vs sri lanka
Next Stories
1 विश्वचषकातील भारताचे सामने आता दूरदर्शनवरही
2 बंडोबांचा खेळ..
3 न्यूझीलंडला महत्त्व
Just Now!
X