विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताबरोबर बांगलादेश असेल, हे आता निश्चित झाले आह़े अर्थात सट्टेबाजार (भारतीय व आंतरराष्ट्रीय) सध्या भारताच्या कामगिरीवर भलताच खूश आह़े  त्यामुळे बाद फेरी संपायच्या आतच सट्टेबाजांनी भारताचा भाव चांगलाच वधारून ठेवला आहे. उपांत्य फेरीत भारताची धडक कोणाशी होईल, यावर आता सट्टेबाजारात तर्क लढवले जात आहेत़  त्यासाठीही भाव देऊ करण्यात आले आहेत़  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड की अन्य कोणी असा अंदाज वर्तवण्यात आला आह़े  शिखर धवन आणि मोहम्मद शमी हे दोघेही आपले स्थान टिकवून आहेत़  सट्टाबाजारात सध्या भारताचा भाव चांगलाच वधारला आह़े  बांगलादेशबरोबरच्या सामन्यात भारताला सहज विजय अपेक्षित आह़े  सध्याचा भाव भारतासाठी २५ पैसे आणि बांगलादेशसाठी सव्वादोन रुपये आला आह़े  ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड तसेच वेस्ट इंडिज-संयुक्त अरब अमिराती या दोन सामन्यांबाबत सट्टेबाजारात फारशी उत्सुकता नाही़
सामन्याचे भाव
ऑस्ट्रेलिया : १० पैसे, स्कॉटलंड : पाच रुपये
वेस्ट इंडिज : ३५ पैसे, अमिराती : तीन रुपये.